मित्रहो,
मिसळपाव हे संकेतस्थळ व इथले सदस्य यांचा मी बराच ऋणी आहे. एका विशेष अडचणीच्या काळात काहीही ओळखपाळख नसतांना मिपाकरांनी जमेल ती मदत केली. त्याचा मला खूप फायदा झाला. त्याचे परिणाम पुर्ण व्हायला अजून ३-४ महिने लागणार आहेत. त्यामुळे त्याबद्दलचा सविस्तर धन्यवादाचा लेख मी अजून लिहिला नाही. माझ्या मते कार्यक्रम संपल्यावर आभारप्रदर्शन बरं असतं.
आज मला एका वेगळ्या बाबतीत मदत हवी आहे. मिपाकर योग्य त्या प्रकारे मदत करतील अशी खात्री आहे.
भरपूर विचारविनिमय, अभ्यासांती आम्ही (मी+बायको) एक नवीन व्यवसाय सुरु करायचे ठरवले आहे. तयार मसाल्यांचा उद्योग. यात नविन काहीच नाही पण अभ्यासांती असे लक्षात आले की बाजारात मिळणार्या तयार मसाल्यांमधे दर्जा नाही. त्यात बरेच फीलर्स असतात. चव येत नाही. अगदी मिरची, हळद, धणे यांच्या पावडरींमधे फीलर्स वापरून वजन व आकारमान वाढवले जाते. त्यामुळे कदाचित आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. यावर उपाय म्हणजे घरीच मसाले तयार करणे. आजकालच्या जीवनशैलीमुळे बहुसंख्य गृहिणींना हे घरी शक्य होत नाही. बरेचदा मसाल्याची योग्य पाककृतीही मिळत नाही. मिळाली तरी त्याच्यावर प्रभुत्व यायला वेळ जातो.
या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून आम्ही घरगुती रोजच्या जेवणासाठी लागणारा मसाला तयार करून विकण्याचे ठरवले आहे. त्याचे नाव 'मसाला सुप्रीम' असे ठेवायचे ठरले आहे. याच 'मसाला सुप्रीम'च्या उपभोक्ता परिक्षणासाठी स्वयंसेवक हवे आहेत. ज्या सदस्यास या उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी मला व्य नि करून कळवावे. त्यांच्यासाठी २० ग्रॅम मसाला उपयोग व परिक्षणासाठी कुरीअरने पाठवला जाईल. यासोबत मसाला वापरण्यासंबंधी सूचना व फीडबॅक-प्रश्नतालिका देण्यात येइल. सहभागी सदस्यांनी रोजच्या जेवणात तसेच विविध व्यंजनांमधे वापरून या मसाल्याची उपयुक्तता, दर्जा, चव, सुगंध इत्यादी मानकांवर परिक्षण करावे अशी अपेक्षा आहे. हे परिक्षण, फीडबॅक व काही विशेष सूचना असतील तर जो ईमेल-आयडी देण्यात येइल त्यावर पाठवावे.
बर्याच शेजारी-ओळखीतल्या लोकांना हा मसाला आवडला आहे. व्यावसायिक पातळीवर उत्पादन व विक्री केल्यास चांगला प्रतिसाद लाभण्याचे चिन्ह दिसत आहे. तरी पुढचे पाऊल टाकण्यापुर्वी या उत्पादनावर तटस्थ व्यक्ती म्हणून मिपाकर सदस्यांचे मत मला आवश्यक वाटत आहे. त्यामुळे मदतीचे आवाहन करत आहे.
मसाला सुप्रीम बद्दल थोडे:
१. एकविस उच्चप्रतीच्या मसाल्यांचे योग्य मिश्रण. दर्जाच्या बाबतीत कुठेच तडजोड नाही.
२. प्रत्येक भाजी, डाळी, फळे यांची स्वतःची विशेष चव कायम ठेवतो.
३. रोजच्या स्वयंपाकात कोणत्याही भाजीत, आमटीत, भाताच्या प्रकारात वापरू शकता.
४. बाजारात मिळणार्या इतर मसाल्यांच्या तुलनेत उत्तम चव व सुगंध.
५. नेहमीच्या मसाल्यांपेक्षा कमी लागतो. जेवण जास्त मसालेदार होत नाही जे आरोग्यास चांगले आहे.
६. पावभाजी, छोले, बिर्यानी, राजमा, पुलाव यांच्यासाठीच्या मसाल्यांसोबत १ चमच्यास पाव चमचा प्रमाण वापरल्यास चव व सुगंधात चांगलाच फरक पडतो.
७. चव, रंग, सुगंध आणि दर्जा कायम ठेवत किमान चार वर्षे शेल्फ-लाईफ. फ्रीजमधे ठेवायची गरज नाही. हवाबंद डबा आवश्यक.
वरील पॉईंट्स जाहिरातीसारखे वाटत असले तरी मी त्यांचा रोज अनुभव घेतो. याच मसाल्यात घरी रोज केली जाणारी वेगवेगळ्या पदार्थांची भाजी वेगवेगळी चव देते. तसेच प्रत्येकाच्या हाताची चव कायम ठेवत व्यंजन मस्तच होते हा नेहमीचा अनुभव.
आता दुसरा भागः
या व्यवसायावर मी बरेच संशोधन केले आहे. बाजाराची स्थिती, सरकारी योजना, नियम व कायदे वैगेरे. पण एकट्याने मिळवलेले ज्ञान/माहिती कधीही कमीच असते किंवा घातक असू शकते. कल्पना सुचल्याच्या आनंदात महत्त्वपूर्ण अशा काही बाबींकडे दुर्लक्ष होऊ शकते असे मला वाटते. तेव्हा निर्मिती, वितरण, मार्केटींग बद्दल कुणालाही काही माहिती, अनुभव असल्यास जरुर मार्गदर्शन करा. निदान एक उपभोक्ता म्हणून अशा एखाद्या उत्पादनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि अशा उत्पादनास तुम्ही कसा प्रतिसाद द्याल ते जरी सांगितले तरी भरपूर मदत होईल. तसेच बाजारात मिळणारे खुले मसाले, ब्रँडेड मसाले यांचे काही चांगले-वाईट अनुभव असतील तर तेही सांगावे.
धन्यवाद!
संपादकांस नम्र विनंती: मिपाधोरणानुसार हा धागा जाहिरात वाटत असल्यास व तसा काही आक्षेप असल्यास उडवावा.
वाचने
9991
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन व शुभेच्छा
+१
In reply to अभिनंदन व शुभेच्छा by श्रीरंग_जोशी
+1 अभिनंदन आणी शुभेच्छा..
In reply to +१ by एस
भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि करा.
धन्यवाद कप्तानसाहेब, उद्या
In reply to भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि करा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
फीडबॅक प्रश्नतालिकेतून
तुमच्या चार आण्यांसाठी
In reply to फीडबॅक प्रश्नतालिकेतून by आदूबाळ
छेछे. परीक्षक स्वयंपाकतज्ञ
In reply to तुमच्या चार आण्यांसाठी by संदीप डांगे
ओके. गॉट इट. :-)
In reply to छेछे. परीक्षक स्वयंपाकतज्ञ by आदूबाळ
प्रथम अभिनंदन
अतिशय उत्तम प्रतिसाद, धन्यवाद
In reply to प्रथम अभिनंदन by खंडेराव
मनापासून अभिनंदन..... लवकरच
कॉलिंग जागू ताई
शुभेच्छा डांगे साहेब
शुभेच्छा डांगेसाहेब
खुप शुभेच्छा!!
उपक्रमास शुभेच्छा!
उपक्रमास शुभेच्छा. पण २०
छान
सर्वप्रथम शुभेच्छा आणि ऑल दी
धन्यवाद क्रेझी,
In reply to सर्वप्रथम शुभेच्छा आणि ऑल दी by क्रेझी
@निशदे, धन्यवाद. सर्व निकष
जे
स्पर्धा
मुनिवर, बातमी आणि दुव्याबद्दल
In reply to स्पर्धा by कपिलमुनी
अभिनंदन आणि शुभेच्छा.
डांगे साहेब... काय योग्य बाजारपेठ हेरलीत तुम्ही.......
बाजारपेठ योग्य आहे हे तुमचे
In reply to डांगे साहेब... काय योग्य बाजारपेठ हेरलीत तुम्ही....... by माम्लेदारचा पन्खा
घरगुती मसाला तयार करणे
धन्यवाद! तुमची रेसीपी
In reply to घरगुती मसाला तयार करणे by जयन्त बा शिम्पि
घरगुती मसाला तयार करणे
In reply to धन्यवाद! तुमची रेसीपी by संदीप डांगे
काळा मसाला
In reply to घरगुती मसाला तयार करणे by जयन्त बा शिम्पि
'चव' ही व्यक्तीसापेक्ष असते
एवढ्या सुंदर आणि माहितीपूर्ण
In reply to 'चव' ही व्यक्तीसापेक्ष असते by प्रभाकर पेठकर