Skip to main content

माझे शब्द

लेखक Rajvardhan यांनी मंगळवार, 21/04/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी शब्दच हरवून बसलो आज शोधतो आहे तेच स्वप्न स्वप्नात माझिया मीच हरवलो आहे माझेच शब्द नि माझीच वाचा एक वेडी आशा मिळतील का मला माझे शब्द शोधतो आहे किनारे नि आधारसाठी धरलेले ते सृजनाशील हात आज इनद्रधनुत पुन्हा तेच रंग भेटतील का मला शोधतो आहे मी माझेचे शब्द नि माझीच स्मृतिपटले एक समग्र व्यासपीठ तिथे मिळतील का मला माझेच शब्द जे कीं हरवले आहेत व्याखानात दबले गेले आहेत घुसमटातात ते आता प्राप्तानात कधी काळी त्यांचाही जरब होता चळवळीतून ,आंदोलांतून ,उठावातून आता हरवले आहेत माझेच शब्द नि माझा आवाज एक विष्णन आभाळ तिथे भेटतील का मला माझेच शब्द नि माझेच आर्तव निर्विवाद गाजवतायात क्षितिजे आपले आधिराज्य खु

न्याय मला दिसला होता......

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 21/04/2015 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय मला दिसला होता...... लोकशाहीच्या, दुर्गंधी पसरवणाऱ्या, सडक्या प्रेताचे, उघडे बटबटीत डोळे, आपल्या अणकुचिदार चोचीने फोडणाऱ्या, धनिक, राजकारणी गिधाडांच्या नख्यांच्या, धारदार अचूक पकडीत, न्याय मला दिसला होता. भ्रष्ट, रक्तपिपासू लांडग्यांनी बनवलेल्या, क्रूर परिस्थितीच्या फासात अडकून मेलेल्या, स्वाभिमानी माणसांच्या मढ्यावरचे प्रसिद्धीचे लोणी खाऊन, करपट ढेकर देणाऱ्या, विकाऊ माध्यमांच्या कावीळ झालेल्या पिवळ्या डोळ्यांत, न्याय मला दिसला होता. आपल्या विचारांच्या टोकदार लेखणीत, जळजळीत अनुभवाची शाई भरून, रखरखीत सत्याची कविता रेखणाऱ्या एका साध्या नि:शस्त्र म्हाताऱ्या कारकूनाला

गेम ड्रोम - २

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 21/04/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा प्लान होता चांगला . अगदी माझ्या आवडीचा होता . पण सध्या कशातच मन नवतं . गेल्या २५ वर्षाच्या आयुष्यात फक्त तेच ५-६ दिवस होते . जेव्हा मला पूर्ण हरल्यासारखं वाटत होतं . नापास होणं मोठी गोष्ट नवती . आधी हि मासिक परीक्षेत झालो होतो . पण लगेच पुढच्या परीक्षेत त्याची भरपाई हि केली होती . एक तर पुस्तकि किडा नवतो . जमेल तेवढ्या स्पर्धा आणि खेळ खेळायचो . त्यामुळे मासिक परीक्षा कधीच गृहीत धरली नवती . सहामाही आणि वार्षिक परीक्षेलाच काय तो अभ्यास करायचो .त्यामुळेच कोणत्याही परीक्षेत नापास होण्याने कधीच एवढं वाईट वाटलं नसतं . पण . त्या रात्री आई बाबांना बोलताना ऐकलं मी . बाबा रडत होते .

झाडपण

लेखक नाखु यांनी मंगळवार, 21/04/2015 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी खंत करी कधी ते एकटे झाड.. नक्की झाड वाकडे-तिकडे म्हणून वेगळे ! का गेंड्याच्या नाकावरच्या शिंगासारख्या टेकाड्-फोडावर आले म्हणून आगळे ! नक्की माहीत जरा जास्त्च तिरके उगवले होते ते जणू एअर इंडीयाचा महाराजा. हे तिरके म्हणून कुणी सरळमार्गी त्याच्या जवळ येत नसे. अगदी पायवाटही त्याचा अगदी सावलीचाही विटाळ नको म्हणून थोड्या अंतरावरून वळसा घालून उतरायची खालच्या वाडी-वस्तीत. त्या झाडाला जर बोलता आले अस्ते तर तेही ओरडून म्हणाले असते मी तुमच्यातलाच आहे.. गर्द देवराईला, ओढ्याच्या पांदीला आणी पिंपळपाराच्या फांदीला पण. मुकाट वरून बघायचे मी सगळ्या झाडांपाशी,झाडावर,झाडाखाली चैतन्यझरा सळसळताना... शा

रसपोळी आणि आभार

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 21/04/2015 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
रसपोळी आणि आभार !! सर्वप्रथम मिसळपाव या संकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादकांचे मनापासून आभार. मिपाने आम्हा संगणक कामगार लोकांचे रोजचे यांत्रिकी जगणे खूपच सुसह्य केले आहे. कामे आटोपून थोडा निवांत वेळ मिळाला की लगेच आम्ही मिपाच्या आसऱ्याला (किंवा आश्रयाला) येतो. इथले लेख, कथा, कविता, भटकंती, पाककला, छायाचित्रण इ.

रात्र...!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 20/04/2015 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
केली लाख आर्जवे तरी सांज हात सोडवून गेली नको नको म्हणताना मला ह्या रात्रीस बांधुन गेली मिटले सारे नकाशे सार्‍या दिशा विझुनी गेल्या होता जिचा दिलासा ती सावलीही पळून गेली येई काळोख अंगचटीस लोचट वारा झोंबे तनामनास उडताना घरावरी टिटवी अंगभर शहारा टाकित गेली मेघ नौबती झाडती आसमंत गडगडाटी हासे तो पोहचला वेशीवर वर्दी दामिनी देऊन गेली वाटे पळुनी जावे तर तो दारी उभा ठाकला मदतीस मारली आरोळी त्याच्या हसण्यात विरुनी गेली मग लेवुनी त्याची वासना रात्र पसरली या माळराना तो तोडित असता लचके चांदणी हुंदका दाबित गेली चंद्र लपला ढगाआड आसमंत निशब्द झाला मी फ़ोडित राहिले टाहो अन वैरी रात्र रंगात आली अखेर झाली

नावात काय आहे ????

लेखक नितिन शेंडगे यांनी सोमवार, 20/04/2015 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !! नावात काय आहे , असे कुणीतरी म्हणून गेले आहे. पण खरेच का हो नावात काहीच नाही ???? खूप लोकांना आपल्या नावाचा अभिमान असतो, कारण काही ना काही असतेच हो. तसेच आपल्या गावाचा हि अभिमान असतोच, कितीही लहान गाव असू देत पण परमुलुखात त्याचे नाव निघाले की लई म्हणजे लई भारी वाटते . ह्या सोमवारी मुंबई वरून येताना गावाला जाणारी येष्टी मिळाली, म्हटले चला जावू त्याच गाडीने. लहानपण आठवले हो लगेच, प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच गाडीने गावाला जाणे होत होते. एकदम भन्नाट प्रवास असायचा, तो खंडाळ्याचा घाट, लोणावळा चिक्की आणि भिगवण ला जेवायला थांबणे… नुसता सुवर्णकाळ आठवत होतो.

अनाहिता इन रसायनी

लेखक मितान यांनी सोमवार, 20/04/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा कट्टा होऊन तीन चार महिने होऊन गेले. सर्व अनाहितांना पुन्हा भेटण्याचे वेध लागले. मग प्रस्ताव आला. निमंत्रक मुंबईकर अनाहिता. चर्चा झाल्या. ठिकाणं चाळली गेली. तारखांसाठी पानं फडफडवून झाली. कुठून कोण कोण येणार याची यादी झाली. आणि शेवटी कट्टा ठरला. बहारीनहून विशाखाताई आणि जर्मनीहून स्वातीताई याच काळात पुणे मुंबईत येणार होत्या. त्या दोघींनीही यायचं नक्की केलं. उत्साह अजून वाढला. ठिकाणाच्या बाबतीत अजून गोंधळ होते. त्या चर्चांचा कंटाळा येऊन अजयाने तिचं घर हे ठिकाण फायनल केलं ! आणि काउंटडाऊन सुरू झाला. तेवढ्यात ते मेलं अनाहिता बंद पडलं. मग कसंकाय वर भागवलं.

अकादमी 7 :- रगड़ोत्तम भारती बापूसाहेब

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 20/04/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
अकादमी मधे आता जवळ जवळ 8 महीने झाले होते, गेट च्या आत यायच्या आधी जो एक होमसिक हळवा बापूसाहेब होता तो 8 महिन्यात कुठे अन कधी गेला हे आजकाल मला पडलेले कोड़े होते, जवळपास सगळ्यांचीच अवस्था तशीच होती , आलो तेव्हा फिजिकल करताना आमची होणारी अवस्था आठवुन आम्ही आपापसात हसत असु त्या दिवसांत. आमच्या ट्रेनिंग चा एक एक पदर हळुहळु उलगडत होता. आता जे मोड्यूल होते ते होते बेसिक माउंटेनियरिंग उर्फ़ प्रार्थमिक गिर्यारोहण. वेगवेगळी गिर्यारोहणाची इक्विपमेंट त्याचे उपयोग इत्यादी ह्यात शिकवले जात असे. कारण मैक्सिमम ड्यूटी तिकडेच असणार होती आयुष्यभर. ह्यात नैसर्गिक प्रेरणे ने हीरो होता आमचा सांगे.