Skip to main content

मला पडलेले काही YZ प्रश्न

लेखक NiluMP
मंगळवार, 21/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
1. इग्रजांनी आपल्यावर राज्य केले नसते तर भारतात रेल्वे, दुरध्वनी आणि टपाल व्यवस्था सुरु होण्यास कोणते साल उजाडले असते? 2. भारतातील प्रमुख शहरांवर अणुबाॅम्ब हल्ला झाला तर ती शहरे परत पुर्ववत होण्यास किती कालावधी लागेल? 3. कोण सर्वउच्च न्यायव्यवस्था की धर्म व्यवस्था? 4. अनअधिकृत बांधकामाची deadline काय असेल की हे पण आरक्षणसारखे मारुतीच शेपूट होणार? 5. बोरिवली आणि विरार दरम्यान चैपदरीकरण होउन देखील त्या पटटयात जलद वसई, विरार लोकल सुध्दा स्लो का धावते? 6. भारत महासत्ता होणार अशी पुडी अधुनमधुन सोडली जाते हे खरंच शक्य आहे का? 7. जगात असा कोणता लोकशाहीप्रधान देश आहे का जेथे नेते निवडणूक सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण येतात कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक आणि व्होटबॅंक म्हणजे समस्या झोपडपटया, आरक्षण, घराणेशाही.

वाचने 7963
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

अजून एक YZ प्रश्न तुम्हाला पडायला पाहीजे "इतके YZ प्रश्न मला एकट्यालाच का पडतात.?" :) जोक्स अपार्ट, सगळ्यांनाच पडतात, काहींची उत्तरे नाहीत, आणि काहींची उत्तरे माहित असूनही त्यांच काही करण्याची हिंमत किंवा उत्साह बर्याच लोकांकडं नसतो.

कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक आणि व्होटबॅंक म्हणजे समस्या झोपडपटया, आरक्षण, घराणेशाही.
हे सगळीकडेच असते असे कोणी सांगितले तुम्हाला ??
जगात असा कोणता लोकशाहीप्रधान देश आहे का जेथे नेते निवडणूक सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण येतात
नै म्हंजे तुम्ही जगातल्या इतर देशांबद्दल विचारताय म्हणून वरील प्रश्न.

In reply to by हाडक्या

मी भारतातील समस्या बद्दलच बोलतोय कारण ईतरत निवडणुका दोन पक्षात होते (अशी माहिती आहे) भारतात अनेक पक्ष आहेत.

In reply to by NiluMP

तुमच्या जगात इतरत्र फकस्त आम्रिकाच दिसतेय मग ? ;) अहो, उदा. ७ मे ला युकेच्या निवडणुका आहेत.. तिथे किती पक्ष आहेत ते तरी गुगलून पहा. इतर जगात अशी अनेक उदाहरणे आहेत त्याबद्दल आधी शोधून तरी पहा की.

In reply to by हाडक्या

देश कुठ्लाही असो. जेवढे पक्ष अधिक तेवढी मतविभागणी अधिक. शिवाय प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारसरणी ह्यामुळे स्थिर सरकार मिळेलचं असं नाही.

In reply to by टवाळ कार्टा

लोकशाहीत सरकार कसे असते हे जनता किती प्रगल्भ आहे त्यावरच ठरते
अगदी अगदी.
जगात असा कोणता लोकशाहीप्रधान देश आहे का जेथे नेते निवडणूक सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण येतात कारण मतदान म्हणजे व्होटबॅंक आणि व्होटबॅंक म्हणजे समस्या झोपडपटया, आरक्षण, घराणेशाही.
पण त्यांच्या या प्रश्नावरुन असं वाटतंय की त्यांच्या मते भारतात जे चालतंय ते सगळ्याच जगात चालतंय आणि त्या व्यतिरिक्त जी लोकशाई आहे ती फक्त आम्रिकेत (अथवा द्विपक्षीय अध्यक्षीय लोकशाही असलेल्या राष्ट्रात) म्हणून बोललो. नै म्हंजे, स्वीडन, वगैरे असले देश तर खिजगिनतीतच नसतील, भले कितीही आदर्शवत लोकशाही असेल तिथे. अन मग जगात असंच चालतंय म्हणायच वरुन..

Reason for my 1st ? [...first train journey in India between Bombay and Thane on 16 April 1853 in a 14 carriage long train drawn by 3 locomotives named Sultan, Sindh and Sahib. It was around 21 miles in length and took approximately 45 minutes....] extract from Wiki. 150+ वर्षा नंतरही हे अंतर कापण्यासाठी तेवढाच वेळ लागतो

In reply to by NiluMP

४५ मिनिटे लागतही असतील. पण तेव्हाच्या मुंबई आणि ठाण्यामधे किती स्थानके होती? तेव्हा मुंबई आणि ठाण्याच्या मधे किती सिग्नल होते? लोहमार्गाच्या आजुबाजुला झोपडपट्टी होती का? तेव्हाच्या आणि आत्ताच्या स्थानकांच्या संख्येमधे दहापटीने वाढ झाली असेल असे जर ग्रुहीत धरले तर आताची लागणारी ४५ मिनिटे म्हणजे जलद सेवा म्हणावी लागेल.

In reply to by NiluMP

जवळ जवळ असणारी स्थानके आणी रुळांच्या बाजुला झालेली बांधकामे/झोपडपट्ट्या लक्षात घेता आताच्या लोकलचा कमाल वेग गाठता येणे शक्य नाही.

In reply to by NiluMP

तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं कारण सांगीतले. आता याला जबाबदार आपण सारेच. हे सगळे खपवून घेणारे सरकार आपणच निवडून देतो. सुधरेल हळू हळू. थोडा वेळ लागेल पण सुधारणा होणार हे नक्की. नवी पीढी हे सगळं खपउन घेईल असं वाटत नाही.

In reply to by खटपट्या

आणि म्ह्णूनच माझ असे मत मतदान (निवडणूक) सोडून इतर कोणत्यातरी वेगळया पध्दतीने नेते निवडूण यावेत. यामुळे ह्या समस्या ५०% तरी कमी होतील कारण कोणत्याही व्होटबॅंकचे लाड खपवून घेतले जाणार नाही.

+१ खटपट्या अरे त्यांना (NiluMP यांना)संध्याकाळची ५.१३ मि. ची अंबरनाथ गाडी पकडायला सांगा जी दादरहुन सुटते ती ठाण्यालाच थांबते. मोजुन फक्त २६ मि. लागतात.

In reply to by प्रमोद देर्देकर

म्हमै म्हंजे सी एस टी

पुढील वाक्याचा धाग्याशी काहीच संबंध नाही. पण असे प्रतिसाद हल्ली सगळ्याच धाग्यांवर दिसतात. या धाग्यावर दिसला नाही म्हणून जर रुखरुख वाटली. "हे असले YZ प्रश्न विचारणं म्हणजे हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटायचं कारस्थान आहे !!!"

तसे हि णेफळे वस्ति कुठे उछाद घालत नाहित्...ते हि पाकड्यां सारखे आता अंगवळणी पडलेयत. हि सगळि वस्ति आर.एन्.आय (रेसिडेंट नॉन इंडियन) आहे.