डब्यातलं तत्त्वज्ञान भाग २
डब्यातलं तत्त्व्ज्ञान भाग १
आम्ही दोघंजण जिना उतरलो कमी, आणि उड्या मारत जास्त आलो. ट्रेन कधी निघेल काही सांगता येत नव्हतं. उशीर झाला होता तिला. मला उशीर झाला नव्हता, पण मी आपला उगाचच गंमत म्हणून तिच्याबरोबर धावत निघालो. लेडीज डबा बराच पुढे होता. त्यामुळे ती साहजिकच जास्त जोर लावून पळत होती. पण तिची मजल ट्रेन निघायच्या आत जास्त पुढे गेली नाही. मी तिच्या पुढून धावत होतो. ट्रेन निघाली तेव्हा मी जवळ जवळ फर्स्ट क्लासपर्यंत पोचलोच होतो. पण ती चढल्याशिवाय मी चढणार नव्हतो. मला चढायचंच नव्हतं. तिच्याबरोबर थांबायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं.
मिसळपाव