माझी इटलीची भ्रमणगाथा! भाग १-उपोद्घात!!
खूप दिवसांपासून युरोप ट्रिप करायचं डोक्यात घोळत होतं.निरनिराळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या सफरींचे कार्यक्रम बघत होते.तो पंधरा वीस दिवसात अक्खा खंड पहायचा चिवडा काही पसंतीला येईना.मला चित्र,शिल्प,संस्कृती,निसर्ग सगळंच अनुभवायचं होतं.त्यातच मीना प्रभूंचं रोमराज्य वाचण्यात आलं आणि मायकेल अॅन्जेलो लिओनार्दो बरोबरच अजून काही चित्रकार शिल्पकारांची माहिती झाली.त्यातल्या कार्व्हाज्जीओच्या चित्रांनी तर वेडंच केलं.आणि इट्लीला जायचं नक्की केलं.मग ऑनलाईन हॉटेल बुकिंग करू,तिथलीच लोकल ट्रीप बूक करू असे मनात मांडे रचायला सुरुवात केली.माझ्या सख्ख्या मैत्रीणीला प्लॅन सांगितला आणि नवर्याला!
मिसळपाव