Skip to main content

वैनी ……… १

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 21/05/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
. गावकरणीची पाणंद आता ओळखू येत नाही . दोन्ही बाजूच्या कडवीच्या झुडुपांची गच्च कमान जाऊन तिथं चिरेबंदी भिंत झाली . चिंचेचं झाड आणि मैदानाच्या जागी श्री रामेश्वर कॉम्प्लेक्स उभं राहिलं . पाणंदीच नावही बदललं .आता तिला श्री रामेश्वर गल्ली म्हणतात. गावाचं शहर होताना झालेल्या असंख्य बदलातील हा एक . . जुन्या घरांच्या बिल्डिंगी झाल्या . गावातील सागरगोटे, सावरी , बकुल , रायवळ, चिंच अशी निरुपयोगी झाडं तोडून तिथं नारळ, आंबा आणि काजूची खणखणीत पैसा देणारी झाडं आली . जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या . घरोघरी कोर्ट केसेस चालू झाल्या .

अशी सुरुवात होऊ शकते का???

लेखक कोकण कन्या यांनी गुरुवार, 21/05/2015 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
जाता येता...सिग्नल ला थांबल...किवा तसेही..आपल्याला आजूबाजूला किती लोक दिसतात जे..संधी मिळताच रस्त्यावर पानांच्या आणि गुठ्क्याच्या पिचकार्या मारताना दिसतात..रस्त्यावरून जाताना गाडीवर फोन वर बोलणारे...रस्तावरून हिरोगिरी करत....इतर गाड्यांना कट मारणारे ....त्यांचाकडे बघून राग व्यक्त करण्या वतिरिक्त काहीही करत येत नाही ह्याचा राग येतो......जास्तीत जास्त रागाने बघ्ण्यावातिरिक्त काहीही करू शकत नाही......त्यातही जर समोर च्या व्यक्तीत जर लाज असेल तर ते दुर्लक्ष करतात किवा मग लाजेखातर सॉरी तरी म्हणतात.....पण काही निर्लज्ज माणस वर तोंड करून आपल्याकडेच असे बघतात कि आपणच काही चुकीच करतोय...किवा काहीतरी अप

कॉमेडी ऐसपैस

लेखक तिमा यांनी गुरुवार, 21/05/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
" तर आता पहा, नवराबायकोतील हा धम्माल संवाद!!" एक तोकड्या कपड्यांतली वाळकी मुलगी, तिच्या कमावलेल्या आवाजात सांगत असते. तिच्या शब्दाशब्दाला मागचा वाद्यवृंद ठणाणत असतो. एक अत्यंत जाडी,बेढब पण साडी नेसलेली बाई स्टेजवर प्रवेश करते. आताशा, स्टेजवर प्रत्येक पात्राने नाचत नाचत आणि वाजत गाजतच प्रवेश करायचा असतो. तसा डिफॉल्ट प्रोग्रॅमच आहे ना! शिवाय प्रत्यक्ष काही वाक्य उच्चारण्याच्या आधीच नुसत्या आगाऊ देहबोलीवरच प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे हंशे वसूल करायचे असतात. तर ही बे.बा.(बेढब बाई) स्टेजवर एक राऊंड मारतीये तोच तिचा अत्यंत अंगविक्षेपी काटकुळा नवराही(का.

दाग अच्छे है

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 21/05/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी गोरेगावच्या एका आयटी कंपनीत काम करतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हब मॉलच्या बाजुलाच आमचं ऑफिस आहे. त्यादिवशी आमची एक महत्वाची रिलीज होती. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही अगदी वेळेत काम संपवलं होतं. आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी उशिर होणार याचा अंदाज होताच. पण पुन्हा आम्हाला नेटवर्क, डेटाबेस अश्या तांत्रिक आणि प्रोजेक्ट मधल्याही काही अडचणी आल्या. त्या दिवशी कोणीही रिलीज संपल्याशिवाय जायचं नाही असं ठरलेलं होतंच. पण अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. ते काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चाललं.

स्पेन--२---Al Hambra

लेखक पद्मावति यांनी गुरुवार, 21/05/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
Al Hambra .... अर्थात,' लाल किल्ला'..... ग्रॅनडाच्या पश्चिमेला एका डोंगराच्या माथ्यावर बांधलेला हा किल्ला. उंचावर असल्याकरणाने खालच्या परिसरावर नजर ठेवण्याच्या दृष्टीने ह्याचे महत्व फार मोलाचे होते. हा किल्ला ११व्या शतकात मोहम्मद बीन अल अहमेर या सुलतानाने बांधला. आणि मग पुढे या किल्ल्यात नंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी हळूहळू राहण्यासाठी महाल, इतर इमारती, बगीचे इत्यादी बांधकाम केले. आमच्या हॉटेल पासून हे ठिकाण खरंतर फक्तं दहा मिनिटांवरच होतं पण इथे पर्यटकांच्या होणार्‍या गर्दी बद्दल इतकं ऐकलेलं होतं की त्या भीतीने सकाळी जरा लवकरच उठून ब्रेकफास्ट आटपून ८ ला बाहेर पडलो.

मिसळ पाव - श्री गणेशा!

लेखक हर्षल पतिंगे यांनी गुरुवार, 21/05/2015 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रमंडळी, बरेच वर्षापासून विचार करत होतो की 'मिसळ पाव' खायला सुरुवात करुयात ; पण काही करून योग येईना. बरेच जण म्हणतात की योग हा येत नसतो, तो आणायचा असतो. येत नसेल तर त्याचा येण्या-जाण्याचा खर्च उचलायची तयारी दाखवावी लागते असं म्हणतात. तर मी ही तयारी दखवल्यावर योग तर एका पायावर तयार झाला येण्यासाठी. नशीब! (जाऊ दे सध्याच नशीबा बद्दल नको बोलायला. लवकर रुसायची सवय आहे म्हणतात त्याला) तस तर वेबसाईटच्या वरच्या कोपर्यातलं नुसतं चित्र बघायलाही भेटं देणं मला वावगं वाटणार नाही; पण त्याचा आस्वाद घेण्यातली मजा काही औरच. असो.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 21/05/2015 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि त्याची सुरवात ह्या आजच्या दिवसापासून केली पाहिजे. फक्त आजच्या दिवसापासून..कारण तोच आज ठामपणे आपल्या हातात आहे! पुढे चालू... =============================== तेंव्हा हिला हिच्या आईकडे सोडून आलो..तो आलो खरा. पण इकडे आल्यानंतर कामात अज्जिबात म्हणजे अज्जिबात लक्ष लागे ना. शिवाय त्यांच्याकडे असलेला तो टेलिफोन म्हणजे ..ते मॉडेल जितकं जुनं होतं..त्याहुनहि तिथे मिळणारी फोनसेवा जुनाट दर्जाची होती.

एक अविस्मरणीय सफर – ‘किल्ले सुधागड’ची

लेखक ganeshpavale यांनी गुरुवार, 21/05/2015 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सुधागड विषयी- सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. महादरवाजा किल्ले सुधागड महादरवाजा किल्ले सुधागड इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.

मलाही कविता सुचली

लेखक दमामि यांनी गुरुवार, 21/05/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मलाही कविता सुचली मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।। सक्काळी सक्काळी उठून ब्रशला पेस्ट मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। १ ।। आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। २ ।। हाफिसात निघताना बुटाची लेस मी बांधली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ३ ।। बायकोच्या आज्ञे वरून रात्री भांडी मी घासली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ४ ।। कवी - अथक घासकडवी (माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती . तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )