Skip to main content

शतशब्द कथा - सुट्टी

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/07/2015 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, मांढरे बाई आजपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तुही येणार नाही असे चक्क फोनवर सांगतेस. प्ले स्कूलमध्ये लहान मुले आहेत. त्याना कोण सांभाळणार?” “बाई, आई आजारी आहे, तिचे मलाच बघावे लागते. तिला अंथरुणातून बाहेर तर पडूदे. तीन चार दिवस तर मी हलुच शकणार नाही. कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नाटकांनी इरावती वैतागली होती. तिने नुकतेच काढलेले प्ले स्कूल. कशीबशी मुले यायला लागलेली. त्यांच्याकडे निट लक्ष पुरविले नाही तर मोठा घोळ! काय करायचे? आठवडा तरी ढकलायला हवा. इरावतीने भराभरा पालकांना फोन केले. “आय एम सॉरी, पण उद्यापासून आठ दिवस मुलांना शाळेत पाठवू नका प्लीज. एका मुलाला चिकुन गुन्या झालेला आहे.

जेनेसिस (शतशब्दकथा)

लेखक सटक यांनी गुरुवार, 16/07/2015 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
तो अगदी दमून गेला होता!! त्याने सस्तन, कीट, सरिस्रुप, मत्स्य, उभयचर, पक्षी ह्या सगळ्यांचे जीन्स वापरून काहीतरी बनवले होते. उत्सुकता म्हणून त्याने बायो-इलेक्ट्रिसिटि चालू केली. अत्यंत बेंगरुळ असा तो जीव तसा बरा दिसत होता. त्यांच्या नियमांनुसार प्रत्येक संरचनेला एक "किल स्विच" लावणे आवश्यक होते.

साहित्य संपादकीय आवाहन

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी बुधवार, 15/07/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,
साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच.

अनाकलनीय... (शतशब्दकथा)

लेखक ब़जरबट्टू यांनी बुधवार, 15/07/2015 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही तरी अकालनिय नक्की होते त्या वाड्यात. नविनच आलेल्या अमरला जाणवायचे ते, त्यात रात्रीच्या भयानतेत तो गुढ आवाज, काम करणाऱ्या सदूने पण शिफातीने टाळले होते त्याला... अचानक झोप चावळली त्याची, कुठेतरी खुट्ट झाले होते नक्की . तोच. हो.. परत तोच ड्रावर उघडल्याचा आवाज.. पुढे काय होणार त्याला माहित होते. पण हेडफ़ोन वर गाणी लावून टाळणा-या त्या गुढ आवाजाचा आज छडा लावायचाच ठरवले त्याने, क्षणभर शातंता व तो जीवघेणा आवाज सुरु झाला. ठक..... ठक.... उजाडेपर्यन्त बोबडी वळली होती त्याची. धडपडत सदूची खोली गाठली त्याने. सदू दिसताच कसाबसा स्फ़ुटला तो...

हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने.

लेखक योगेश आलेकरी यांनी बुधवार, 15/07/2015 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने. टंक लेखनाविना बरीच हस्तलिखिते पडून होती आज लक्ष गेले न इरीलाच पेटलो…घेतलाना भो टायपायला. ;) असो, सह्याद्रीच्या मुख्य रंगांपासून थोडी वेगळी झालेली हरिश्चंद्र- बालाघाट रांग, यामध्ये असणारा हा गड व तो सर्व भटक्यामध्ये प्रसिद्ध करणारा सह्याद्रीने प्रसवलेले रौद्र भीषण अस सौदर्य प्रदान झालेला कोकणकडा , महाराष्ट्रतील सर्वोच्च शिखरांपैकी एक असे तारामती शिखर. या सर्व गोष्टीं पाहण्याची, जगण्याची एक अनामिक ओढ आंतरिक ओढ इच्छा नसेल असा गिर्यारोहक मिळणार नाही. माझ्याही मानगुटीवर हे भूत होताच कि.!!!!

नवीन दोस्त

लेखक तुडतुडी यांनी बुधवार, 15/07/2015 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
लहानगा चिंटू खूप खुष होता . किती दिवसांनी त्याला नवीन दोस्त मिळाला होता . आजीलाही ह्या पोराला खेळायला कोणी मिळालं म्हणून बरं वाटलं . नाहीतर किती दिवस नुसत्या त्याच त्याच गोष्टी सांगून त्याला रमवणार. पण गोष्टी त्याच त्याच असल्या तरी आजीची सांगण्याची हातोटीच अशी होती कि चिंटूला त्या पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत. चिंटू झोपायला त्रास देवू लागला कि मात्र आजी स्वताच्या मनानेच काहीतरी नवीन गोष्ट तयार करून त्याला ऐकवी .गोष्ट सांगितल्यावर मुकाट झोपण्याच्या अटीवर . चव्हाण कुटुंब त्या घरात राहायला आलं . घर बैठ्या पद्धतीच होतं . आजूबाजूची घरंही बैठीच . मिस्टर आणि मिसेस चव्हाण खुश होते .

होता एक उस

लेखक सोंड्या यांनी बुधवार, 15/07/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन झ्या. होता एक उस मला उंडरताना पाहुन पाठीवर फुटनारा डांबरट हुडपणावर माझ्या कचकटून बसनारा होता एक उस बापाच्या हातात उगिचच रेंगळणारा ओल्या फोकासारखा चिवटपणा जपणारा होता एक उस उद्धट उफरट बोलल्यावर मला फोडणारा हेरून उघड्या पोट-या अलवार सपकावनरा हवा एक फड उस गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही मला लपवणारा होता एक उस फक्त मला अन मलाच हाननारा सगळ्या भावंडांतून फक्त माझ्याच पाठीवर बसणारा -( उसाच्या दांडक्यानी मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )

भाडमें जाए दुनियादारी (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 15/07/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"७ / मार्च / २०१४ वेळ १० रात्री, क्वालालंपूर, …… …… …… अश्यारितीने माझ्या चांगल्या नेचर्-चा दुनिया नेहमीच फायदा उठवत आलीये. पण आज, नव्हे आत्तापासूनच ठरवलंय मी, की 'भाडमें जाए दुनियादारी'. " असं आपल्या डायरीमध्ये, फ्लाईटच्या चेकइन लाइनमधे उभ्याउभ्याच नोंदवून, हळव्या वॉंन्गची त्या दिवसाची भडास थंडावली. "वॉंन्गसर प्लीज, तुमची या फ्लाईटची कन्फर्मसीट तुम्ही स्वेच्छेने त्यागाल काय ? नै काय झालंय की, ओवरबुकिंगमुळे आज थोडा घोळ आहे कॉउंटरवर.

मालती (शतशब्दकथा)

लेखक सटक यांनी बुधवार, 15/07/2015 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच वयात येऊ लागलेली मालती तिच्या स्वप्नाळू मुग्धपणामुळे राजकुमाराची लाडकी! सहिष्णु महाराजांनी मालतीला नेहमीच राजघराण्याच्या तोलामोलाचे सगळे मिळेल असे पाहिले होते. मालती होतीही गुणी. शिकवलेले सगळे लीलया आत्मसात करायची. मग ती घोडदौड असो, तीरंदाजी, तलवारबाजी, न्रुत्य किंवा काव्यशास्त्र.... महाराजंवर झालेल्या धक्कादायक हल्ल्यानंतर सगळा राजवसा कोलमडल्यासारखा झाला होता. राजकुमाराच्या कोवळ्या खांद्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडली होती. अश्या या वातावरणात त्यांचे कोवळे, तारुण्यसुलभ प्रेम फुलत होते. शेवटी ती आली.