Skip to main content

आगळं वेगळं प्रेम

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 23/07/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रेम काय आहे ते आता मला कळलं." "प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो" इती मकरंद धाके कॉलनीतून लिंकरोडवर येऊन जुहूच्या दिशेने जात गेल्यास,अमिताभच्या बंगल्यावर उजव्या गल्लीत वळून पुढे जात गेल्यास हेमामालिनीचा बंगला लागतो,ती गल्ली संपता संपता आडवा रस्ता येतो तो जुहू चौपाटीला समांतर जातो.ह्या रस्त्यावर पेट्रोलपंपाच्या बाजूला माजगावकरांचा बंगला आहे. मी घरून रोज जुहूवर सकाळीच चालत जायचो.त्यादिवसात अगदी सकाळी चौपाटीवर कुत्रं पण दिसत नसायचं.म्हणजेच मला सांगायचं आहे की कुणी माणूस दिसत नसायचा.पण खरं म्हणजे जवळच्या बंगल्यातल्या श्रीमंतांची कुत

खाडीतली खारफुटी दुनिया १

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 23/07/2015 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
खाडीतल्या खारफुटीच्या जंगलात गेलो होतो. एवढी वर्षं ती खाडी दोन लांबलचक पायवाटा घेऊन माझी वाट पाहात बसली होती. त्यातल्या एका वाटेवरून लहान असताना मित्रांसोबत एकदोनदा जाऊन आलो होतो. तिथे लोक सायकली घेऊन जाताना मला दिसायचे. मलाही घेऊन जायची होती. एकदा गेलो घेऊन, एकटाच. पण माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध असल्यानं मी ती वाटच शोधू शकलो नाही. कुठेतरी खडी साठवलेली दिसली. एका ठिकाणी अमूक एका भूखंडाची जागा खाजगी मालमत्ता असल्याचं सांगणारा बोर्ड दिसला. असं वाटलं, की कदाचित गेली ती जागा कोणत्यातरी बिल्डराच्या घशात. मग फिरकलोच नाही इतक्या वर्षांत. आणि आता गेलो. इतक्या वर्षांनी. दुस-या वाटेने.

ही "सनी"ची लक्तरे...

लेखक दमामि यांनी बुधवार, 22/07/2015 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेर्ना! ही मनाची अंतरे इंच अथवा सेमी ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही "सनी"ची लक्तरे... प्रत्यक्ष भेट आपली रात्र ती नशिबी कुठे मनात उतरवायची ही "सनी"ची लक्तरे... जन्म घेती नवनव्या फाइल संगणकावरी जागा किती व्यापायची ही "सनी"ची लक्तरे... एकमेका फोन देणया आज सारे टाळती प्रथम ती मिटवायची ही "सनी"ची लक्तरे... लांब आहे जायचे ,अन प्रवासही एकटा सोबतीला घ्यायची ही "सनी"ची लक्तरे...

पुनर्भेट

लेखक आतिवास यांनी बुधवार, 22/07/2015 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
२३४ मुलींपैकी ती एक. इयत्ता सहावीत, म्हणजे तेरा-चौदा फार फार तर पंधरा वर्ष वय असेल तिचं. ३९ शाळांमधून प्रत्यकी सहा अशा निवडलेल्या या २३४ मुली. त्यापैकी ही एक ‘रापारिगा लीडर’ किंवा ‘लीड गर्ल’. कोणत्याही शाळेत गेलं की या मुलींची भेट घेणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे एक महत्त्वाचं काम. त्यांची जिल्हानिहाय निवासी शिबिरं ठरल्यावर घरोघरी जाऊन, आई-वडिलांना भेटून मुलीला शिबिरात पाठवण्यासाठी त्यांची परवानगी घेणं. एक दोन नव्हे तर तब्बल १९४ घरं. इथल्या समाजाचं विराट दर्शन घडवणारी ती एक यात्राच. दरम्यान अनेकदा या मुलींची नावं संगणकाच्या पडद्यावर उमटली.

.....ही मनाची अंतरे...

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 22/07/2015 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे... होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे... जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे .... एकमेकाना इथे का आज सारे टाळती सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे.... लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....
काव्यरस

हिरव्या मसाल्यात तळलेली कोलंबी.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 22/07/2015 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबीची निर्मिती करताना परमेश्वर नक्कीच खुशीत असला पाहिजे.त्याशिवाय इतकी सुंदर निर्मिती होत नाही.आणि जसे,’पानी रे पानी तेरा रंग कैसा,जिसमे मिलादे मुझे उस जैसा.’ तशीच कोलंबीही ज्या मसाल्यासोबत कराल त्याच्याशी जमवून घेत स्वतःची चव,’बिलकुल उस जैसी ’करून सोडते.कमीत कमी मसाले हेही या कोलंबीच्या तिसऱ्या अध्यायाचे वैशिट्य,तळलेली कोलंबी तुम्ही खूप खाल्ली असेल .एकदा या पद्धतीने करून पहा.पुन्हा पुन्हा करावीशी आणि खावीशी वाटेल याची खात्री मी तुम्हाला देते.अतिशय उत्तम स्टार्टर. माझ्या एका सारस्वत मैत्रिणीची आई याबाबतीत माझी गुरु.अतिशय कमी तेल हा पण या पाककृतीचा खास विशेष गुण.चला तर तुमच्या तोंडाला वर्णना

पाऊस

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 22/07/2015 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या चांगलाच पाऊस सुरु झालाय, त्याच्याकडे पाहताना काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओळी आठवल्या.

जुन्या काळातील वेतन श्रेणी आणि इमान

लेखक पाटीलअमित यांनी बुधवार, 22/07/2015 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
मला सहज एक प्रश्न पडला आजच्या काळात खासकरून खाजगी मध्ये लोक गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी जुन्या नोकरीला लाथ मारतात, तसे आधी मोठ्या प्रमाणावर का होत नसावे ? १) शिवाजी महाराज vs मुघल मुघल केव्हाही जास्त पगार देऊ शकत होते तरी इब्राहीम गारदी मराठ्यामध्येच टिकून होता, सरदार फितवल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

सरिंवर सरी आल्या ग...

लेखक मितान यांनी बुधवार, 22/07/2015 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजात माझी जागा वर्ग कोणताही असला तरी खिडकीच्या बाजूची असायची. बाहेर गुलमोहराची झाडे, त्यावरची कावळ्याची घरटी, खारोट्यांचा दंगा वर्गात व्याख्यान म्हणून चाललेल्या काही गोष्टी सुसह्य करायच्या. अपवाद म्हणावा अशी एक घटना घडली नि मनावर कायमचा ठसा उमटवून गेली. समीक्षेचा तास सुरू होता. साठोत्तरी वास्तववादी साहित्याच्या चिंध्या करणं चालू होतं. सर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक असल्याने आवेशाने एकेक कळीचा मुद्दा उकलवून दाखवत होते. आम्ही त्यांच्या व्यासंगापुढे लीन होऊन आ वासून ऐकत होतो. तेवढ्यात बाहेर झिमझिम पावसाला सुरुवात झाली.