[शतशब्दकथा स्पर्धा ] टॅक्सी
तिने हळूच बाहेर पाहिलं. टॅक्सी सिग्नलवर थांबली होती. बाबा टॅक्सीवाल्याच्या शेजारी बसला होता. तिने एक सुस्कारा सोडला. त्यांच्या कारच्या सीटस् किती छान होत्या. मऊमऊ. पण बाबाला गेले वर्षभर एकपण पिक्चर किंवा सीरियल मिळाली नव्हती. म्हणून मग गेल्या आठवड्यात बँकवाले येऊन कार घेऊन गेले होते. तिला काहीच कळलं नव्हतं. तसंपण मम्मा दोन वर्षांपूर्वी बाबाला सोडून निघून गेल्यापासून बाबा कसंतरीच करायचा. रडायचा काय, ओरडायचा काय. फोनवरून कुणाला तरी घाणघाण बोलायचा. आणि कसलंतरी ब्राऊन कलरचं ज्यूस प्यायचा. एकदा तर बाटलीच तोंडाला लावून पीत होता.
ती खडबडून जागी झाली. बाबा कुठे आहे?
मिसळपाव