Skip to main content

शरण तुला भगवंता...

लेखक मांत्रिक यांनी शुक्रवार, 28/08/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
शहराच्या जरासं बाहेर असलेलं विठ्ठल मंदिर. थोड्याशा उंच टेकाडावर असलेलं. मोजून पंचाहत्तर पाय-या चढून भक्ताचा आत प्रवेश होणार. मंदिर मूळचं दगडी. ब्रिटिश काळात कुणा हौशी भक्तानं बांधलेलं. पण आता त्याला ब-यापैकी रंगरंगोटी, कुंपण, छोटीशी बाग वगैरे करण्यात आली होती. परिसर जरा ब-यापैकी दिसायला लागल्यावर या देवळाकडे संध्याकाळची भक्तगणांची, हौशी कुटुंबांची वर्दळ वाढू लागली. त्याचबरोबर पाय-यांवर भिक्षा मागण्यासाठी काही म्हातारे, अनाथ-अपंग, बेघर लोक हे देखील बसू लागले. यापैकीच एक भागीबाई. भागीबाईचं मूळ नाव भागीरथी. वय असावं ऐंशी. भागी मूळची इथली नव्हे. कधीतरी स्वतःच्या घरात राहणारी विधवा बाई होती ती.

फणसाची गर्‍या गोट्याची भाजी

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 28/08/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नसः कच्चा पण थोडासा जून असा कापा फणस, २-३ ओल्या मिरच्या, १ वाटी खोबरे, १ लहान चमचा हळद, ७-८ काळी मिरी, फोडणीसाठी हिंग, मोहरी, चवीला साखर, मीठ कृती: फणस सोलून व आतील गरे साफ करुन घ्यावेत. गर्‍यांमधील बिया (आठळ्या) काढून त्यांची वरची साले काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत. फणासाच्या बाहेरील सालीचा आतील भाग काढून त्याचेही लांबट तुकडे करावेत. जरासे चेचावे. गरे लांबट चिरावेत. तेलात हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात आठळ्यांचे तुकडे व सालीच्या आतल्या भागांचे तुकडे शिजायला घालावे.

भिंगार्‍या

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 27/08/2015 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारायला आलं होतं. लंगडा भिंगार्‍या वैरण घेउन आला. आण्णा नांगरटीला गेला होता . मंजु भाकर्‍या थापत होती . लंगडा भिंगार्‍यानं वैरण कापून गुरांना टाकली . पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती . वैरण टाकून भिंगार्‍या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला . दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला. मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं. त्यानं ते पडवीत बसून खाल्लं. भिंगार्‍या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.

आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय !!!!

लेखक शीतल जोशी यांनी गुरुवार, 27/08/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय अन आठवणीच्या मेघांनी आभाळ पुन्हा दाटतय थोडे रुसवे थोडे भांडण थोडी समजूत आणि खूप सारे प्रेम पुन्हा मनात साठवावं असे वाटतय, खरच आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय जुने झालाय प्रेम थोडे आणि आपण हि जुनेच झालोय आता एकमेकांच्या मनातले पक्के ओळखू लागलोय आता कोणत्या वाक्यावर तो वैतागणार तिला आहे नक्की ठावूक आणि त्याला आता जमू लागलय सावरणे तिला, जेव्हा ती होते अगदी भावूक तरीसुद्धा, पुन्हा एकदा नव्याने भेटावे असे वाटतय खरच आज पुन्हा एकदा प्रेमात पडावे असे वाटतंय जुने ते सोने म्हणतोच कि आपण वेळ जाईल तसे दृढ होते नाते अस मानतोच कि आपण वर्षामागून वर्

सयाना (मांत्रिक इ.) आणि फेसबुक (मिडिया इ.)

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 27/08/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे) मागासलेली गरीब अनाडी जनता आपल्या समस्या सोडविण्यासाठी गावातल्या सयाना (मांत्रिक म्हणा, ओझा म्हणा ) कडे जाते. या सयानाचे सरळ देवा सोबत कॅनेक्शन असते. भूत, प्रेत, हडळ, चुड़ैल या सर्वाना काबूत ठेवण्यात तो समर्थ असतो. गावात किंवा पंचक्रोशीत काहीही वाईट घडले असेल, कुणाचा अकाल मृत्यू झाला असेल किंवा कुणाचे नवजात मुल दगावले असेल. तर कुणाच्या करणी मुळे असे झाले हे सयाना बरोबर हुडकून काढतो. एकदा जादू टोना, करणी करणार्या हडळ / चुड़ैल कोण आहे हे कळले कि मग काय विचारावे.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १०- मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस (अंतिम)

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 27/08/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

"गाथनी होयेत गेsss?"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 27/08/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
"मला समजलं. तुझ्या डोक्यावरचे केस गेले, तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल, हातपाय धूवून ये. आपण जेवू या".. इती भाग्यश्री. चेरापुंजीनंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळाकभिन्न काळोख, काळेकुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला भाग पडायचं. त्यातच विजांचा चमचमाट आणि वीज पडल्यावर होणारा कानठळ्य़ा बसणारा कडकडाट. घरातली लहान मुलं तर घाबरून जायची आणि अगदीच लहान असतील तर रडायचीसुद्धा. मला स्वतःला मात्र अशा पावसाच्या दिवसात कोकणात जायला आवडतं.

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 27/08/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :) तुझे लाघवी बोलणे ते अवेळी तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी जसे पावसाचे अकाली बरसणे तुझे आर्जवी वागणे ते अवेळी लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी लगावली : लगागा लगागा लगागा लगागा वृत्त : भुजंगप्रयात
काव्यरस

वाटाण्याचा चविष्ट पराठा

लेखक मंजुषा१९८० यांनी गुरुवार, 27/08/2015 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस
  • २०० ग्रॅम वाटाण्याचे दाणे
  • ४/५ हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • आले-लसूण यांची पेस्ट
  • जीरे, तेल, मीठ
  • २५० ग्रॅम कणीक
मार्गदर्शन
  • प्रथम वाटाण्याचे दाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर काढून घ्याव्यात.
  • एका पॅन मध्ये २ चमचे तेल घेवून जीरे, आले-लसूण पेस्ट टाकावे.
  • नंतर वाटाण्याचे जाडसर मिश्रण त्यात टाकावे. एक वाफ आणून घ्यावी.
  • कणकेत मीठ टाकून नेहेमीच्या पोळीसारखे भिजवावे.