बहिण भावाच्या अतुट प्रेमाचा सण राखी पोर्णिमा
राखी पोर्णिमेला रक्षाबंधन असेही म्हणतात. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात. हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या (जर सख्खा भाऊ नसेल तर नात्यातील भावाच्या) हातावर राखी बांधावी. राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करते.
मिसळपाव