Skip to main content

नभाचा सातबारा

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/09/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
ढगच दाटतात आकाशात सध्या, नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली... जगणे सुद्धा कठीण झाले सध्या, पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली... जरी बाप राबतो शिवारात त्याचा, शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली... पाहू कोण पुरुन उरतो सध्या, मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली... सारे नेतेच उदंड झाले सध्या, आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली... जिप्सी
काव्यरस

अचंबीत करणारे तरीही सुखद.

लेखक नाखु यांनी शनिवार, 05/09/2015 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या हाणामारी-राजकीय गदारोळाच्या वाहिन्या पाह्ण्यापेक्षा दूर्दर्शन सह्याद्रीच्या बातम्या पाहणे जास्त चांगले आणि हितावह वाटते. अगदी सरकारी वाहिनी असूनही पुरस्कृत केल्यासार्ख्या आक्रस्ताळी, व मिपा भाषा परीकोषानुसार पालीचा डायनासोर करीत नाहीत. मोजके आणि नेमके. अशातच काल रात्री साडे नऊच्या बातम्यात एक सुखद आणि आश्चर्य्जनक बातमी पाहिली आणि अवाक झालो.(टीप ज्यांना अगोदरपासून माहीत असेल त्यांनी माफ करावे) कारण नुकतेच मिपावर मांझी चित्रपटाचे परीक्षण समीक्षण वाचले गेले.

भरली भेंडी –प्रकार दुसरा.

लेखक नूतन सावंत यांनी शनिवार, 05/09/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण विशेष म्हणून केली जाणारी नौधारी किंवा सातधारी भेन्डीची ही अजून एक भाजी.पण प्रकार पहिला मधली भाजी कांदा,लसूण न वापरता केलेली.आणि ही रविवार, मंगळवार,बुधवार,शुक्रवारी करायची चमचमीत भाजी.ही मात्र माझ्या आईची कृती.माझ्या धाकट्या भावाला माशांची फार आठवण व्हायची.त्याला फसवण्यासाठी आई ही वापरायची. तो तीन/चार वर्षांचा असताना त्याच्या अजाणतेपणाचा फायदा त्याला समजवण्यासाठी आई घ्यायची.त्याने,’’आज बुधवार आहे ना?भाजी का वाढते?’’ असे विचारले की,त्याच्या ताटात पॅनमधली खालची बाजू वर येईल असे वाढत असे.वर आमच्याकडे पाहून ती डोळे मिचाकावत ती म्हणायची,’’कुठे भाजी?

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (५: अंतिम भाग)

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 05/09/2015 05:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतभेटीला प्रथमच येणार्‍या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून त्याच्या पत्रांच्या मराठी रुपांतराचा हा प्रयत्न.

प्लम रेलिश / चटणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 05/09/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी बागेत प्लमचे झाड अगदी फळांनी लगडले होते, भरपूर खाऊन, मित्र-परिवारात वाटून ही काही संपेना, ह्या वर्षी ठरवले होते की प्लम लागले की खाऊन उरतील त्याची चटणी, जॅम असे काही बनवायचे , पण ह्यावर्षी फुलं तशी कमीच फुलली मग फळं ही त्यामनाने कमीच लागली, दोनदा काढून खाऊन झाले मग म्हटले आता जी उरली आहेत त्याची चटणी करु, तर ही प्लमची आंबट-गोड-तिखट चटणी / रेलिशची पाकृ देतेय. .

द लास्ट पोस्ट

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शनिवार, 05/09/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
कारगिल सेक्टर च्या माधोमध एक जागा. एका दगडावर मी सुन्न पण शांत बसलो होतो. रिज कॅप्चर झाली होती अन शेजारी माझी रायफल पड़ली होती. तिच्यातही बेटी एकच गोळी उरली होती. तासाभरापूर्वी तुंबळ रणकंदन माजले होते इथे, आरडाओरडा वीरश्रीयुक्त युद्धघोष सगळ्याचीच रेलचेल. जरासे बधीर वाटत होते, तरीही शांतता अन त्या शांततेत कानात घुमणारा कुईंsssss असा आवाज लक्षात येत होता. कदाचित मी त्या आर.पी.जी. अन गोळ्यांच्या आवाजाने बधीर झालो होतो, असेल बुवा, ह्या धामधुमीत माझे लाडके मार्लबोरो लाइट्स चे पाकीट कुठे पडले कोणास ठाऊक! त्या परिस्थितीत सुद्धा मी ते जपून सेल्फ राशनिंग करून वाचवले होते.

सागरी महामार्गाने कोकण सफर

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 04/09/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे बाईकने कोकण सफर करायची असा विचार होता. पण भारतात असताना नेमकी पावसाळ्यात सुट्टी मिळत नसल्याने व गेली काही वर्षे आखातात असल्याने तो विचार प्रत्यक्षात मात्र येत नव्हता. सहा महिन्यापूर्वीच Hero Passion Pro खरेदी केली होती त्यामुळे यंदा तसा योग आला. मुख्य अडचण अशी होती की सलग 100 किमी पेक्षा सलग प्रवास एकट्याने मोटरसायकलने केलेला नव्हता. म्हणून सुरूवातीला 250 ते 300 किमी चाच टप्पा घ्यावा असे ठरवले. मग थोडीफार तयारी करून रत्नागिरी–मालवण सागरी महामार्गाने जायचे निश्चित केले. दिनांक 02 सप्टेंबर ला घरातून निघालो. रत्नागिरी आमच्या गावापासून 30 किमीवर आहे.

नवस - लघुकथा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 04/09/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
होडी तशी बारीकचं होती. नदीसारखीच. पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता. हातात मटणाचा प्रसाद होता. आभाळात घारी सावज शोधण्यात भटकत होत्या. बारकी पोरं त्यांचाकडं बघण्यातच दंग होती. ईवलूशी होडी पण वस्ताद कस लावुन वल्हत होता. संथ संथ होडी काठाला लागली. देवळात भक्तगणांची गर्दी होती. मऊशार वाळुतनं वाट काढत नाना देवळात शिरला. मंदाक्कापण सोबतीला होती. आज नानानं बोकड कापलं होतं. म्हसोबाला. कुणी त्याला खंडोबा पण म्हणायचं. आख्खी वाडी आली होती. दुरदूरची नातीगोतीही जमलेली. दिगंबर सोडून. पोरीचं लगीन जमाव म्हणुन मंदाक्कानं नवस केलता.

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १

लेखक मोग्याम्बो यांनी शुक्रवार, 04/09/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
Avengers: Age of Ultron ह्या बहुचर्चित चित्रपटाने जगातील सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट निर्मिती करणारी Marvel Studio ही संस्था सगळ्यांना परिचित आहे. Comic Books मधील पात्रांवर चित्रपट तयार करण्यामध्ये ही सध्या अग्रगण्य आहे. पण ही कंपनी एकेकाळी दिवाळखोरी जाहीर करणार होती असे म्हटले तर? Marvel Comics सन १९३९ साली स्थापन झाली. तिचा पहिला वहिला मालक होता "मार्टिन गुडमन". पण Marvel ला २००५ साल येईपर्यंत कधीच स्थैर्य लाभले नाही. त्याचे कारण म्हणजे प्रत्यके गोष्टीमध्ये ते DC Comics च्या मागेच राहिले. "ह्युमन टोर्च " आणि "नेमोर" ह्या दोन पात्रांनी मार्वेल कॉमिक्स ची सुरवात झाली.