Skip to main content

श्रीगणेश लेखमाला ८ : सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट (खरेदी विभाग)

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 25/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
उत्पादन अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडलो. शून्य अनुभव पण शिकण्याची व कष्टाची तयारी या जोरावर नक्कीच काहीतरी मिळवू हा विश्वास ठेवत इंटरव्ह्यू देत होतो. अखेर एके ठिकाणी हातात ऑफर लेटर पडले. पोस्ट - ग्रॅज्युएट ट्रेनी इंजीनिअर (मटेरिअल्स). लगोलग रुजू झालो. ट्रेनिंगच्या पहिल्या दहा दिवसात एकेका विभागाची ओळख करून देण्यात आली. कंपनी काय वस्तू पुरवते, कुणाला पुरवते इ. इ. बाबींची व्यवस्थित ओळख करून घेतली. उत्पादन विभागात असेंब्ली कशी होते, काय काय गोष्टी लागतात हे नीट समजून घेतले. कोणत्याही आस्थापनेस एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते.

एक गोष्ट........

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 24/09/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक गोष्ट तुझी एक गोष्ट माझी आहे एक गोष्ट तुझ्यामाझ्या गोष्टीची एक प्रीत तुझी एक प्रीत माझी जुळली एक प्रीत तुझ्यामाझ्या मनीची एक आभाळ तुझे एक आभाळ माझे भेटले एक आभाळ तुझ्यामाझ्या प्रेमाचे एक रात्र तुझी एक रात्र माझी सजली एक रात्र तुझ्यामाझ्या स्वप्नांची एक चंद्र तुझा एक चंद्र माझा साक्षी एक चंद्र तुझ्यामाझ्या मीलनाचा एक साथ तुझी एक साथ माझी सुटली एक साथ तुझ्यामाझ्या सोबतीची एक कारण तुझे एक कारण माझे छोटेसे एक कारण तुझ्यामाझ्या दुराव्याचे एक हट्ट तुझा एक हट्ट माझा जिंकला एक हट्ट तुझ्यामाझ्या अबोल्याचा एक सांज तुझी एक सांज माझी उगवली एक सांज तुझ्यामाझ्या निरोपाची एक वाट तुझी एक वाट म

<विखुरलेला चखणा>

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 24/09/2015 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा www.misalpav.com/node/32919 हल्ली कमीच झालंय माझं बारमध्ये जाणं गेलोच तर हरपुन जात हळुहळु दुनियेचं भान. हल्ली कमीच झालंय तसं रात्र रात्र तळमळणं, मला बघुन मालकानं कमी केलयं उधाऱ्या देणं. हल्ली कमीच झालंय आता मला मोगराबाईनं खुणावणं, तिलाही झालंय सवयीचं गुपचूप पाकीट मारणं. हल्ली कमीच झालंय घरी ऊशिरा येणं. मलाच कसं नाही जमलं असं अवेळी लवकर येणं. हल्ली कमीच केलंय मी ऐकणं माझ्याच मनाच, तुझ्याकडे तरी आलंय का गं पार्सल माझं चखण्याच? (वोडका का रम काय सुचना)

सुंदर पिचाईंच्या स्वागत संदेशा निमित्ताने

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/09/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुगल प्रमुख सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीच्या भेटी निमित्ताने स्वागत संदेशगुगल इंडीयाच्या युट्यूब चॅनलवर ठेवला आहे. एकीकडे बॉबी जिंदाल सारखा अमेरीकन रिपब्लीकन राजकारणी जो स्वतःची भारतीय मुळे लपवायचा प्रयत्न करत आहे तिकडेच सुंदर पिचाईंसारखा तरूण सिइओ, लोकं काय म्हणतील वगैरेचा विचार न करता, गुगल इंडीयाचॅनलवर मोदींचे स्वागत करतो, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. भारतीय असणे हे न लपवणे, मोदींचे स्वागत हे माझ्या दृष्टीने किरकोळ मुद्दे आहेत...

कुमाऊं – मनमोहक मुन्स्यारी

लेखक के.के. यांनी गुरुवार, 24/09/2015 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
==================== भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ ==================== कुमाऊं – मनमोहक मुन्स्यारी आमच्या प्रवासातला तिसरा टप्पा ‘मुन्स्यारी’ होता. इथे आम्ही २ रात्री राहणार होतो. मुन्स्यारीबद्दल तसे पूर्वी कधी ऐकलेले नव्हते.

एक होती रातराणी

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 24/09/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच असं झालं kvitaa लिहली आणि नावच सुचतं नव्हतं. मग तरी घाई घाईत तशीच चिकटवली. काही वेळाने बघितलं तर वेल्लाभट म्हणाले पहिल्याच कडव्यात यमक चुकलंय. अर्रर झालं एकदम! तस आम्ही निमित्त शोधतचं असतो हवापालट करून यायच! आता ही आयती संधी का सोडा म्हणून आम्ही सध्या "ताण" मुक्त होण्यासाठी "एक ब्रेक घेतलाच पाहिजे" या निष्कर्षाप्रत पोचलो आहे. तर ही जिलबी वाचून कुणालाही ताण आल्यास तुम्हीही घ्या एक ब्रेक. काय म्हणता पाल्हाळ वाचूनचं आला ताण. बर सॉरी बरं का. तरी आई सांगत असते माणसाने कसं नेमकं बोलावं. कधी जमेल काय माहिती!

राग राजस्थानी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 24/09/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे. मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो .

दिवस दुसरा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 24/09/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर,मनाली,लेह,कारगिल,श्रीनगर,जम्मू. सकाळी सकाळी शिव्यांच्या आवाजानेच जाग आली, खूप मुश्किलीने डोळे उघडले आणि मनगटाच्या घड्याळात पहिले तर सकाळचे ७-१५ वाजले होते, खालच्या बर्थवरचे बाबा आणि जुली दोघे गायब. कुठेले तरी स्टेशन आले होते आणि तो फेरीवाला बोंबलत होता " ले वडे ले वडे गरम गरम वडे लो वडे आलू के वडे लो वडे". कोण कोणाला शिव्या घालत होते याचा उलगडा झाला. वरच्या बर्थवरून खाली टून्नकण उडी मारली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागलो तर ते दोघेही बाहेर स्टेशनवर फोटो काढत बसले होते.