Skip to main content

गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....( वर्गणीचा हिशोब )

लेखक राजू यांनी बुधवार, 30/09/2015 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते. पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते. कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया. कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो. का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध? का. 2- तसं नाय ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय. का. 1-अरे पण आपण देखाव्याचा विषय का.

कॅलेंडर गर्ल्स

लेखक सुजल यांनी मंगळवार, 29/09/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेंडर गर्ल्स माझ्या मते मधुर भांडारकर ने दोनतीन वर्षांपूर्वीच डिक्लेयर केलाय. मी या या विषयावर चित्रपट काढणार आहे म्हणून . त्याच सगळ वेल प्लाण्ड व्यवस्थित अभ्यास करून चित्रपट असतात हे सांगायला नकोच . अर्थात त्याच्या चित्रपटांचा प्लॉट ही ठरून गेलाय. रियल लाईफ वर आणि जास्त करून सेलिब्रिटी वर्ड मध्ये जे काय चाललेलं असत त्या वर्ड मधल्या भानगडी / त्या वर्ड मध्ये शिरण्या करता कराव्या लागणाऱ्या उचापत्या /त्या वर्ड मध्ये "औट ऑफ द वे" जाऊन कराव्या लागणाऱ्या तडजोडी . ग्लॅमर वर्ड मधला नाटकीपणा या सगळ्याच मिश्रण करून त्याचे सिनेमे असतात.

खरेच आपण डिजिटल झालो आहोत?

लेखक राजू यांनी मंगळवार, 29/09/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
साधरणपणे १० वर्षापुर्वी पर्यंत आपल्यातील बहुतेक जण व काही ठिकाणी आतासुध्दा काही जण सार्वजनिक शौचालय वापरत आहेत. तेंव्हा त्या शौचालयात काही कलाकृती व गावातील,आळीतील भानगडी,वाद एकतर्फी प्रेमाची जाहिरात वाचायला मिळत असे. एवढेच नाही त्या बातम्या अपडेट करणारे व त्या चविने वाचणारे,पाहणारे आज बहुसंख्येने व्हाट्स अप वर व उरले सूरलेले ईतर सोशल नेटवर्कवर आजही आहेत. खरेच या महाभागांमुळे आपण किती डिजिटल झालो आहोत हे समजते आहे. शांताबाय ....शांताबाय ....या फॉरवर्ड होणाऱ्या गाण्याला व इतर अश्लील क्लिप्स,नॉन-वेज जोक्स आणि फालतू फॉरवर्ड जोक्सला वैतागलेला एक त्रस्त सोशल साईट्स वापरकर्ता..... ( विशेष सूचन

भेट...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 29/09/2015 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
छान छान जावे दिवस छान छान व्हावी भेट दिवस जसा रात्रीला येऊन भिडतो थेट थेट मग होते रोजची सकाळ सूर्य येताे प्रकाशात दिवसभर थकून भागून रात्री मिटतो आकाशात असाच दिवस अशीच रात्र मला खूप आवडते मन माझं भेटीच्या त्या सोनसंध्येला निवडते आवडेल तुला जीवनात अशी भेट झाली तर? रात्री सोबत दिवसाला नवी पालवी आली तर!? मैत्रीच्या या फुलामधला परागकण मी व्हावे अश्या भेटिच्या पूर्णत्वाला वर्षे ने ही यावे ............................. https://lh3.googleusercontent.c

परीकथा ३ - दिड वर्ष (facebook status)

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 29/09/2015 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
परीजन्माची कहाणी - http://misalpav.com/node/27398 परीकथेचे सव्वा वर्ष - http://misalpav.com/node/32062 परीकथा २ - सव्वा ते दिड वर्ष - http://misalpav.com/node/32553 ३१ ऑगस्ट २०१५ सध्या आमच्याकडे रोज डंबशेराजचा खेळ चालतो. जीभ बाहेर काढून ती बोटाने त्यावर टिकटिक करते, तेव्हा तिला जेली नाहीतर चॉकलेट खायचे असते. हाताने हवेत गोल गोल रेघोट्या मारते, तेव्हा पाटीवर खडू गिरवायचा असतो. जेव्हा तोच हात वायपरसारखा फिरवते, तेव्हा ते गिरवलेले साफ करायला डस्टर हवा असतो. फ

मेपोल - एक आनंदोत्सव

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 29/09/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, शीर्षक वाचून कुणी या धागा लेखास निवडणूक मतदान/राजकारणाचा विषय समजून उघडले तर तुर्तास तरी क्षमस्व :) पोल हा शब्द येथे खांब अथवा काठी या अर्थाने घ्यावयाचा आहे. मेपोल हा एक बर्‍याच युरोपीय देशांमधला १ मे ला ( अथवा पासून चालू) होणारा ख्रिश्चनपूर्व काळापासून चालत आलेला एक मोठा आनंदोत्सव आहे. ज्यात काठ्यांना सुशोभित करणे त्यांच्या भोवती सामुहीक फेरनृत्य, गाणी अथवा मिरवणूकींचा देशपरत्वे समावेश असू शकतो.

प्रेममयी

लेखक मांत्रिक यांनी मंगळवार, 29/09/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
पार्वती पाहिले मी प्रथम तुला उतारावरती हिमालयाच्या गणांसोबत तुझ्या नंदीच्या गळ्यातील घुंगरू वाजताना उन्मुक्तपणे तुला चालताना विश्वविजयी पौरुषपूर्ण चाल तुझी मम हृदयात धडधडले भरदार छाती तुझी पाहताना श्मश्रू जटा वाढलेल्या वार्‍यावरती भुरभुरताना त्रिशूळावरील पकड तुझी बाहू स्फुरण पावताना भरदार चाल मर्दानी व्याघ्रांबर ते ताणताना …१ ***** मम नजरेतील भाव सख्यांनी ओळखले त्या कुत्सितांना हसूच फुटले प्रेमशरांनी घायाळ मला केले कर्ण कपोल आरक्त झाले मंदाकिनीच्या प्रवाहात ओलेती काया माझी शहारली आत खोल खोल मला कुणी स्पर्श केले प्रेमाच्या प्रबळ अग्निने वेडेपिसे मला केले …२ ***** कुलीन स्त्रिया
काव्यरस

गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....

लेखक राजू यांनी मंगळवार, 29/09/2015 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
असेच गप्पा टप्पा करायला चौकातल्या मित्रांमध्ये बसलो विषय असेच नेहमीचे दिल्ली पासून गल्ली पर्यंतचे होते. असेच बोलता बोलता वादग्रस्त विषय आला विषय तसा भरपूर बोलण्याचा असल्याने गरमागरम चर्चा सुरु झाली बोलता बोलता नेहमी प्रमाणे डावे, उजवे व तटस्थ असे गृप पडले.

परीकथा - निसर्गपरी

लेखक जागु यांनी मंगळवार, 29/09/2015 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
एका छोट्याश्या गावात श्रावणी आणि राधा नावाच्या दोन बहिणी राहत होत्या. श्रावणी १० वर्षांची तर राधा तिची छोटी बहीण शेंडेफळ. त्यांच्या दारासमोर छोटीशी बाग होती. श्रावणी आणि राधा आपल्या आई-बाबांसोबत रोज झाडांना पाणी घालताना, त्यांची मशागत करताना सोबत असायच्या. मध्ये मध्ये त्या स्वतःही काही झाडांना पाइप घेऊन पाणी घालायच्या. श्रावणी कुंडीत, झाडाजवळ पाण्याचा पाइप आणून द्यायची तर चिमुकली राधा पाण्याची धार कुंडीत, झाडाला टाकायची असे दृश्य बर्‍याचदा असे. आई बी किंवा रोपे लावत असताना आईने केलेल्या छोट्या खड्यात बी टाकायचे काम दोघी करायच्या.

आमचा पण बिग बॉस

लेखक यमन यांनी मंगळवार, 29/09/2015 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
आणि एकदाचा मराठी साहित्तीकांचा "बिग बॉस " मधला मार्ग मोकळा झाला . त्यांच्या बरोबर सनी लिओन पण घुसणार आहे .आनंद आहे . आमच्या हाती बऱ्याच साहित्तीकांच्या अनुदिनी चे शेष हाती लागले आहेत . खास तुमच्या साठी ... जयवंत दळवी … "हि तशी उफाड्याची . आमच्या बयो सारखी . कदाचित बयो पेक्षा काकणभर जास्तीच . बजा काका असता तर तिच्या कडे बघता बघता लाळ गिळायाचीच विसरला असता . तो बयो कडे असाच बघायचा . जीभ ओठावर काढून एकटक . आजू बाजुंच्या बायका तोंडाला पदर लावून हसायच्या . पण बजा काकाला ह्याचे काहीही सोइर सुतक नव्हते . तीच्या कडे बघत मोठे फुत्कार टाकण हाच त्याचा छंद होता .