Skip to main content

लालीची गोष्ट भाग ३

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/10/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ "रंगा आपण कुठे जातो आहोत? दामले सर माझी वाट बघत असतील रे गेटकडे." रंगाचा हात धरून धावत असताना लाली म्हणाली. रंगाला मात्र तिला उत्तर देणे जरुरी नाही वाटले नाही. तो तिला घेऊन अंधाऱ्या गल्ल्या पार करत भराभर चालत होता. लाली पुरती गोंधळली होती. ती फक्त चालत होती. किती वेळ ते दोघे चालत होते त्याची तिला कल्पना आली नाही. पण अचानक रंगा थांबला. तो एक ट्रेनचा मोडकळीला आलेला डब्बा होता. "वर चढ." रंगा लालीला म्हणाला. आणि स्वतः वर चढला. लाली त्याच्या मागोमाग वर चढली.

लालीची गोष्ट भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/10/2015 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ लाली थोडी हिरमुसली. पण तिचा तिच्या माईवर पूर्ण विश्वास होता. ती बर म्हणाली आणि शीलाचा हात सोडून संस्थेच्या दारातून आत गेली. लालीला वाटल होत की निर्मला ताई तिला जवळ बोलावतील तिच्याशी बोलतील. पण तस काहीच झाल नाही. ती रात्र नेहेमीप्रमाणे गेली. आणि मग त्यानंतरच्या २-३ रात्री देखील. पण ३ दिवसांनंतरच्या रात्री निर्मला ताईंनी सर्व मुलांना एकत्र केल आणि विचारल;"कोणा-कोणाला रात्र शाळेत जायचं आहे? त्यांनी हात वर करा बघू. लालीला खूप आनंद झाला. तिने लग्गेच हात वर केला. तिथेच एक अनोळखी थोडे म्हातारेसे आजोबा बसले होते.

लालीची गोष्ट भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/10/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ रोज कचऱ्याच्या पेटीच्या मागच्या रिकाम्या जागेत झोपताना लालीच्या मनात एकच विचार यायचा..... अजून किती दिवस? माईला विचारून विचारून लाली थकली होती. माईच एकाच उत्तर होत; "एक दिवस नक्की लाली बेटा; एक दिवस नक्की! मी पण वाट बघते आहे.!" जेव्हापासून लालीला आठवत होत तेव्हापासून तिची माई तिला संध्याकाळी ५-६ च्या सुमाराला त्या कचरा पेटीच्या मागे आणून बसवात असे आणि सकाळी ८ नंतर येऊन घेऊन जात आसे. लालीबरोबर सुखी आणि रंगा पण असत. सुखी तशी मोठी होती. साधारण पाच एक वर्षांनी मोठी असेल लालीपेक्षा. काळी सावली सुखी लालीवर मनापासून प्रेम करायची.

उशीर फार झाला. .

लेखक माहीराज यांनी रविवार, 11/10/2015 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुटली नाती या मनाने जोडलेली जे सार्या नसानसांत भिनलेली क्षणात विझुन गेली सारी स्वप्ने तुझ्यासवे मी एकांतात पाहीलेली... तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला... मोठ्या मुश्किलीने स्वप्नाला छान रंग आलेला बघता बघता त्या प्रेमातला गंध निघुन गेला वेड्या मनाने जगण्याचा सुर नवा धरलेला जगता जगता गाण्यातला आनंद निघुन गेला... तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला... प्रेमज्योत पेटवायला उशिर फार झाला वात जळण्याआधीच अंधकार फार झाला पेटलेली ठिणगी हातीच विझुऩ गेली पुन्हा पुन्हा विझण्याचा प्रकार फार झाला तुटल्याने या मनाचा विश्वास व

एनरॉन पुन्हा एकदा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 11/10/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळी,मोठी कलाटणी देणारा एक कोणता विषय असेल तर तो आहे एनरॉन प्रकल्प. एनरॉन या अमेरिकन कंपनीने जीई व बेक्टेल या अन्य दोन अमेरिकन सुरोपीय कंपन्यांसमवेत दाभोळ वीज कंपनीची स्थापना केली. त्यात एनरॉनचा वाटा 67 टक्के होता. प्रकल्पाचे कागदोपत्री नाव जरी दाभोळ असेल तरी जनतेत मात्र तो एनरॉन प्रकल्पच राहिला. 1991-92 पासून ते 2001 मध्ये अंतिमतः राज्य सरकारने बंद करेपर्यंत या प्रकल्पासून वीज निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. राजकारणाचे पाझर मात्र मोठ मोठे फुटत राहिले.

लढा विपरीत परिस्थितीशी - एका कुत्र्याची गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 10/10/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रामदेवांनी भ्रष्टाचार विरुद्ध लढा पुकारला, सरकार विरुद्ध एका रीतीने युद्धच पुकारले. याचे परिणामहि त्यांना भोगावे लागले. सर्व सरकारी यंत्रणा हात धुऊन पतंजलीच्या मागे पडली. विभिन्न सरकारी विभागांच्या शेकडोंच्या संख्येने नोटीसा, कोर्ट केसेस, इतकेच नव्हे तर अनेक वेळा पतंजलीचे अकाऊंट सुद्धा सीज केल्या गेले. आज एका वाहिनी वर एका कार्यक्रमात, एका पत्रकाराने आचार्य बाळकृष्ण यांना विचारले, त्या वेळच्या विपरीत परिस्थितीतहि पतंजलीची ‘दिन दुनी रात चौगुनी’ उन्नति कशी झाली. याचे रहस्य काय? आचार्य म्हणाले तुम्हाला एका कुत्र्याची गोष्ट सांगतो.

हलव्याचे तिखले आणि हलवा फ्राय.

लेखक नूतन सावंत यांनी शनिवार, 10/10/2015 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
हलव्याचे तिखले. साहित्य:- १. हलव्याचे डोके,शेपूट आणि पोटाकडचे तुकडे. . २. एक वाटी ओले खोबरे. . ३. एक चहाचा चमचा मिरचीपूड. . ४.

दुष्काळ वणवा

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे, दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे, उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना, तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना, चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना, सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना.. विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले, मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले, उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले, भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे... पुढे वाढवली तरी चालेल..
काव्यरस

छि _ _

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 10/10/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
छि _ ल, पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता. मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की करत पुढे आलं.

देवाचा 'सुपर कंप्युटर'

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 10/10/2015 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
सहज अस वाटल,कि देवा जवळ समजा सुपर कॉम्प्यूटर असला तर तो किती बिझी असेल,म्हणजे पहा ना प्रत्येकाच्या पाप अन पुण्यांचे हिशेब ठेवण प्रत्यक्ष देव जरी असला तरी लोकसंख्या इतकी आहे कि त्याला जिकिरीच जात असेल.एक तरी सुपर कोम्पूटर असेलच .e.g.
काव्यरस