टेडी-१ (भयकथा)
अवघ्या ४ वर्षांची दिया आणि तिची आई वीणा कोर्टातून बाहेर पडल्या. वीणा थोडी धुसफुस करत होती, दियाला जवळजवळ खेचतच चालत होती. दुरुन तिचे वडील दुस-याच कुठल्यातरी स्त्रीबरोबर जाताना दियाला दिसत होते. तिच्या बालबुद्धीला याचं काही आकलन होत नव्हतं. अलिकडे पप्पा मम्मी सारखे भांडताहेत याची तिला जाणीव झालेली होती. पण हे सगळं काय असतं याचं मात्र तिला कोडं पडलेलं होतं.
तिच्या वडिलांनी तिच्या आईला हाताने तीनची खूण केली. दर तिस-या रविवारी तिचे वडील तिची भेट घेऊन तिच्याबरोबर वेळ घालवू शकणार होते, याची ती खूण होती. कोर्टानेच तसं निकालात नमूद केलेलं होतं. दियाच्या आईचा नुसता संताप संताप झाला ते बघून.
मिसळपाव