मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लालीची गोष्ट भाग ४

ज्योति अळवणी · · जनातलं, मनातलं
भाग ३ लाली आयुष्यात दुसऱ्यांदा रस्त्यावर आली होती. यावेळी पूर्ण एकटी. चालत चालत ती एका बस स्टोप जवळ पोहोचली आणि तिथेच बसून राहिली. तिला पुढे काय कराव सुचत नव्हत. थोड्याच दिवसात तिचा रिझल्ट लागणार होता. तिने स्वतः कमावलेले थोडेफार पैसे होते तिच्याकडे. पण आयुष्य बघितलेल्या लालीला याची कल्पना होती की या तुटपुंज्या कमाईवर काही होण शक्य नाही. आणि मग तिने निर्णय घेतला. ती जिथे काम करत होती त्या madam च्या घरी ती जाऊन पोहोचली. तिला रात्रीच्या त्या वेळेस बघून त्यांना आश्चर्य वाटल. लालीने एकूण झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि विनवणी केली की काही झाल तरी निर्मलाताईना यातल काही सांगू नका. madam बर म्हणाल्या आणि त्यांनी विचारल;"तू पुढे काय ठरवलं आहेस लाली?" लाली म्हणाली;"madam मला काहीच सुचत नाही आहे. मला पुढे शिकायचं आहे हे नक्की. पण आता कस आणि काय करू? तुम्ही सांगाल का काही?" madam थोडावेळ विह्च्कॅर करत होत्या. मग त्यांनी तिला सांगितलं;"लाली तू पुण्याला जा. मी तिथे तुला काम मिळवून देईन. तू शिकू पण शकशील आणि स्वतःच्या पायावर उभ पण राहू शकशील." लालीला दुसर काही सुचत नव्हत. तिने ते मान्य केल. २ दिवसात लालीचा रिझल्ट लागला. लालीला ९२% मिळाले होते. ती बोर्डात आली होती. दुसऱ्याच दिवशी विविध वर्तमानपत्राचे वार्ताहर तिला शोधत आले. पण लालीला तिच्या आयुष्याची कहाणी कोणालाही सांगायची नव्हती. तिच्या अस करण्याचा परिणाम कधाचित माईचे अजून हाल होण्यात होऊ शकतो याची तिला कल्पना होती. पण तरीही तिला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी खूप मदतीचे हात पुढे आले. आणि madamच्या मदतीने लालीने पुण्याच्या एका कॉलेजमध्ये अडमिशन घेतली. गिर्ल्स होस्टेलवर रहाण्याची आणि एका दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम पण मिळाले लालीला. हे सगळे होत होते आणि लाली मनातून निर्मलाताईची वाट बघत होती. तिला माहित होते की आतापर्यंत ताई परत आल्या असतील. पण तरीही त्यांनी तिची चौकशी कशी केली नाही याचच तिला आश्चर्य वाटत होत. आणि एक दिवस तिला madamचा फोन आला. त्यांनी सांगितल की काकांनी निर्मला ताईना सांगितल की त्यांनी लालीला घरातली तिजोरी उघडताना पकडलं होत. पण तिच्या पुढच्या आयुष्याचा विचार करून तिला सोडून दिल होत. आणि लगेच घराबाहेर काढल होत. madamनी लालीला विचारल;"लाली मी खर काय झाल ते निर्मलाताईना सांगू का? तुझ्यावर होत असलेला अन्याय मला सहन होत नाहीये." लाली म्हणाली;"नको madam. ताईना तुम्ही सांगाल ते खर वाटणार नाही. सहाजिकच आहे. गेली ३५ वर्ष त्या काकांबरोबर संसार करत आहेत. तुम्ही किंवा मी जे सांगू त्यापेक्षा त्यांचा विश्वास काकांनी जे सांगितल त्यावरच बसणार. जाऊ दे. मी देवाकडे फक्त एकाच प्रार्थना करते की आयुष्यात कधीतरी मला निर्मलाताईना भेटता येऊ दे आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या उपकारांची परतफेड मला कणभराने तरी करता येऊ दे. बस! तुम्ही माझी काळजी करू नका madam. मला माहित आहे माझ्या आयुष्याचा गोल काय आहे." अस म्हणून लालीने फोन ठेवला. एस. लाली! IAS. asistent collector जळगाव. लाली तिच्या टेबलावरच्या तिच्या नावाच्या पतीकडे टक लावून पाहात होती. इथवर पोहोचेपर्यंत केलेली मेहेनत तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखी सरकत होती. ९४% नी १२वि पास झालेल्या लालीला पुढे काय कराव काहीच माहित नव्हत. पण तोवर तिच्या प्रामाणिक प्रयत्नांची ओळख झालेल्या तिच्या एका प्रोफेसारनी तिला समोर बसवून ती पुढे काय करू शकते आणि तो मार्ग किती अवघड असू शकतो हे समजावलं. लाली अवघड मार्गाला किंवा मेहेनातीला मागे हाताणारी मुलगी नव्हती. तिने जिद्दीने विविध स्कॉलरशीप मिळवत स्वतःचा अभ्यास चालू ठेवला. लहान मोठी नोकरी करायची आणि अभ्यास करायचा. बस तिच आयुष्य फक्त एवढच उरल होत गेली ४-५ वर्षे. पण त्या मेहेनतीच फळ आज तिला मिळाल होत. लाली IAS झाली होती. आणि तिची placement जळगाव जिल्ह्यात झाली होती. सकाळपासून लाली मान मोडून फाईल्स clear करत होती. समोरच्या घड्याळात ३ वाजले आणि तिच्या हाताखालच्या जाधवांनी तिला हाक मारली;"madam?" तिने वर न बघताच फक्त "हम" केले. "madam तुम्ही सकाळपासून मान वर करूनही बघितले नाही आहे. तिन वाजून गेले. जेवून घेता का?" जाधवांनी परत एकदा तिला विचारले. "अरे जाधवजी ३ वाजले? समजलच नाही मला. अरे तुम्ही सुधा जेवायचे असाल न? ok! आलेच मी. चला एकत्र जेवूया" लाली म्हणाली. आणि दिनकरला जेवणाची तयारी करायला सांगण्यासाठी जाधव केबिन बाहेर जायला निघाले. त्याचवेळी दिनकर दार न वाजवताच आत आला. तेही दरवाजा जोरात ढकलून. लालीच्या कपाळावर आठ्या पसरल्या. "काय प्रकार आहे दिनकर? हा कुठला नवीन प्रकार आत येण्याचा?" लालीने कडक आवाजात दिनकरला फटकारले. "madam माझी काहीच चूक नाही. एक म्हतारासा माणूस तुमच नाव घेतो आहे. private काम आहे म्हणाला. बाहेर उभा आहे. म्हणे तुम्ही बघितलत की लगेच ओळखाल. आत घुसत होता. मी अडवला. म्हणालो थांब तू. madam बिझी आहेत. त्यांना वेळ आहे का विचारून येतो आणि तुला आत पाठवतो." दिनकर थोडा बिचकत आणि बाहेरच्या माणसावर वैतागल्याने थोडा करवादत म्हणाला. "कोण आहे? नाव काय?" लालीने आश्चर्य वाटून विचारले. कारण जळगावसारख्या ठिकाणी तिला भेटायला येणार कोणी असू शकत अस तिला कधीच वाटल नव्हत. त्यात personal काम? "नाव नाही सांगत ना तो madam. किती वेळा विचारल कोण आलाय सांगू? तर म्हणे सांग एक माणूस. जुना ओळखीचा. आता तुम्हीच सांगा madam मी काय करू?" दिनकर म्हाणाला. "तू जेवायची तयारी कर जा. आणि जाताना त्या... कोण तो आला आहे.... त्याला आत पाठवून दे." लाली हातातल काम बाजूला ठेवत म्हणाली. "मी थांबू का madam?" जाधवांनी विचारले. "नको जाधव. तुम्ही जा. हव तर जेवून घ्या. मी आलेच." लाली म्हणाली. आणि जाधव बाहेर गेले. त्याच दारातून एक मध्यम वयाचा अत्यंत कृश माणूस आत आला. भडक रांगाचा शर्ट आणि अत्यंत मळकट pant त्याने घातली होती. केस पांढरे झाले होते. तोंड सतत खात असल्येल्या पानामुळे लालेलाल झाले होते. पण नशिबाने आत्तातरी तोंडात पान नव्हते. हातात घड्याळ, गळ्यात सोन्याची चेन. एकूण त्याच व्यक्तिमत्व अत्यंत नकोस वाटावं अस होत. आत येताच तो लालीकडे बघून ओळखीच हसला आणि सरळ येऊन तिच्या समोरच्या खुर्चीत बसला. लालीने त्याच्याकडे नजर रोखून बघितले. पण काही केल्या तिला ही व्यक्ती कोण ते ओळखता येईना. "बोला!" खूप वेळ वाट बघून तो काहीच बोलला नाही तेव्हा वैतागून लालीने म्हटले. "लाली... नाय ओळखला मला? च्यायला! आज खरी madam झाली बरका तू! आपल्या जुन्या दोस्ताला विसरली. जून आयुष्य विसरली. मोठी झाली तर मागे वळून बघायला तयार नाही. खरच मोठी झाली तू." तो म्हणाला. "रंगा तू?" लाली आश्चर्याने म्हणाली. तिला मोठा धक्का बसला. रंगा खरतर तिच्याहून जेमतेम २-४ वर्षांनीच मोठा होता. पण आत्ता तिच्या समोर बसलेला माणूस तिच्याहून किमान १० वर्षांनी मोठा वाटत होता. " तू इथे जळगावला काय करतो आहेस? अरे किती बदलला आहेस. कसा दिसतो आहेस. कशी ओळखीन रे मी तुला?" लाली कसबस स्वतःला सावरत म्हणाली. "अरे madam ओळखलत मला? धन्यवाद" दोन्ही हात जोडून कपाळावर ठेवत रंगा म्हणाला. "मला वाटलं समोर आलो तरी तुम्ही धक्के मारून बाहेर काढाल. पण थोडी माणुसकी आहे वाटत तुम्ह्च्यात." आता मात्र लालीला राग यायला लागला. "रंगा अस का बोलतो आहेस? तू खरच खूप बदलला आहेस. कस ओळखणार मी तुला? त्यात तू जळगावला येशील अस माझ्या स्वप्नात सुधा आल नसत" लाली म्हणाली. "अरे madam आमच्यासारखी लोकं समोर आली तरी कोणाला नको असतात. तुम्ही आमच स्वप्न कुठे बघणार." अजूनही रंगा तिरकस आणि टोचून बोलत होता. त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक लालीचा राग वाढत होता. "रंगा तुला जर निट बोलायचं नसेल तर तू चालू लाग बघू. मी इथे रिकामी नाही बसलेले." शेवटी रागाने लाली म्हणाली. एकीकडे तिच्या मनात येऊन गेल; इतक्या वर्षात ज्याने आपल्याला शोधलं नाही किंवा भेटला नाही तो रंगा अचानक आपण कलेक्टर झाल्यावरच का बर आला असेल? "लाली मी इथे थांबायला नाही आलेलो किंवा माझा काही मतलब साधायलासुद्धा नाही आलेलो." रंगा तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. जणूकाही रंगाला तिच्या मनातले विचार एकू आले असावेत: अस लालीला वाटलं. "अरे मी अस म्हंटल का? बर का आला आहेस बाबा. सांग तर." लाली वरमून म्हणाली. रंगाने एकदा तिच्याकडे निरखून बघितल आणि टेबलावर थोड झुकून तो म्हणाला,"लाली, खूप मोठी झालीस तू. माहित आहे मला. खूप मेहेनत केलीस या पदाला पोहोचण्यासाठी. कुठे सेल्स गर्लची नोकरी कर, कधी ग्राहक पेठांमधून छोटे मोठे स्टोल्स लाव; कधी कुठे घर काम तर कधी स्वयंपाकाच काम. अस करून आणि सरकारच्या शिक्षणासाठीच्या मदतीचा फायदा करून घेत तू शिक्षण घेतलास. मुळात हुशार होतीस. आणि जिद्दी पण. त्यामुळेच आज तू या पदाला पोहोचली आहेस. पण म्हणून तू तुझ पूर्वीच आयुष्य कस विसरलीस?" "रंगा पूर्वीच्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारख काय होत? उलट ते विसरले म्हणून तर भविष्याकडे स्वच्छ नजरेने बघू शकले आणि इथपर्यंत पोहोचू शकले." लाली ताठ मानेने आणि स्पष्ट शब्दात म्हणाली. रंगा तिच्याकडे रोखून बघत होता. तो म्हणाला;"खरय लाली. तू इथे पोहोचलीस हे खरच आहे. पण त्यासाठी तू तुझा भूतकाळ विसरलीस. ये बराबर नही हुवा. लाली, तुझे जनम देनेवाली वो औरत अभी भी तेरी राह देखती हे. कभी आकर देख उसकी हालत. जेमतेम पन्नाशीची बाई पण पार जख्खड म्हातारी दिसते. खूप सोसलं आहे ग तिने तिच्या आयुष्यात. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. कायम मला बोलावून घेऊन तुझ्याबद्धल विचारायची. तिला मी किती वेळा म्हणायचो; चल तेरेको लालीके पास लेके जाता हु. तुझी सगळी खबर बात असायची मला. पण माई कधी तयार नाही झाली. तिच कायम एकच म्हणण होत; लाली मोठी होऊ दे, मी तिच्याबरोबर असण्याने तिची अडचण होणार. नकोच ते. मला माहित आहे ती मोठी होणार आणि मला घ्यायला नक्की येणार." रंगा भावूक झाला होता. पण लाली शांत होती. "रंगा प्रत्येक जण आपापल्या वाटच आयुष्य जगत असतो. मला पण माईची खूप आठवण यायची. म्हंटल तर मीदेखील तिला भेटायला येऊ शकले असते. पण मग मी विचार केला की आता तिला भेटून काय उपयोग. मी जेम-तेम १२-१३ ची होते जेव्हा मी तिचा हात सोडला. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची वाट मी एकटीच चालले आहे. आता मागे वळून बघण्यात काय अर्थ आह? बर मी जरी आले तिला घ्यायला तरी ती माझ्याबरोबर यायला तयार होईल का? उघाच का तमाशा करायचा?" लालीच बोलण एकून रंगाला खूप खूप वाईट वाटल. तो काही न बोलता जागचा उठला आणि जायला निघाला. ते बघून लाली गडबडली. तिने रंगाला हाक मारली;"रंगा! रंगा.... थांब." "काय करू थांबून लाली? जर चांगल शिक्षण माणसातली माणुसकी घालवून टाकत असेल न तर माझ्यासारख अनपड-गवार राहिलेलं बर अस मला वाटत. खरय तुझ. उगाच कशाला तमाशा? खरच नको येउस तू माईला भेटायला. तसही ती फार जगेल असा मला वाटत नाही. पण जे काही जगेल ना ते या आशेवर तरी जगेल की तिची लाली कधी ना कधीतरी तिला घ्यायला येणार आहे. जर तू आलीस आणि तिचा, तिच्या भावनांचा आणि तिच्या बलिदानाचा अपमान करून गेलीस ना; तर मात्र ती वेडी बाई जे काही उरलेले दिवस आहेत तिच्या आयुष्यातले, ते जिवंतपणे मरण यातना भोगत जगेल. लाली चालतो मी. पण जाताना एकच सांगतो.... माणूस शिकून सुशिक्षित होतो.... मनाचा मोठेपणा आणि चांगला स्वभाव मात्र शिकून येत नाही. तो उपजत असावा लागतो." एवढ बोलून झुलता दरवाजा जोरात ढकलून रंगा निघून गेला. लाली रंगा गेलेल्या दिशेने बघत होती. नजर झुलणार्या दारावर होती पण मन मात्र भूतकाळात गेल होत. माईने तापाने फणफणलेल्या लालीला सुखीच्याकडे सोपवलं आणि डोळ्यातलं पाणी पुसत माई मागे फिरली होती. सुखिने माईचा कापरा हात हातात घेत म्हंटल होत;"माई आजच्या दिवस थांब लालीजवळ. जेमतेम ५ वर्षाची आहे ग ती." आपला हात सोडवून घेत आणि त्यांच्याकडे पाठ करत माई म्हणाली होती;"सुखी आज धंदा तर उद्या लालीला दवा. आणि परवा माझी लाली या नरकातून बाहेर..." अस म्हणून ती तिथून निघून गेली होती. रंगाने एकदा कोणाचेतरी पाकीट मारले होते. त्यातल्या पैशाने त्याने खूपशी भेळ आणली होती. सुखी, रंगा आणि लाली बसून ती भेळ हसत मजेत खात होते. कुठूनशी तिथे माई आली आणि तिने लालीला भेळ खाताना बघितले होते. तिच्या हातातली भेळेची पुडी हिसकावून माईने ती फेकून दिली होती आणि लालीच्या गालावर एक जोरदार चपराक बसली होती. "लाली तू इथे राहात असलीस तरी तू इथली नाहीस हे लक्षात ठेव. चोरी, वेश्या हे तुझा आयुष्य नाही. तू इथून बाहेर पडणार आहेस." माई डोळे लाल करून लालीला सांगत होती. ती रंगाकडे वळली. "रंगा चुकतो आहेस तू. तुलासुद्धा इथून बाहेर पडता येईल. आयुष्याला वळण लाव रंगा; अजून वेळ गेलेली नाही." अस म्हणून लालीचा हात धरून माई तिथून निघून गेली होती. अम्माने एकदा लालीला नवीन कपडे मागवून दिले होते. लाली खुशीत येऊन ते कपडे माईला दाखवायला गेली. माईने ते कपडे तिच्याकडून घेतले आणि लांब ठेवले होते. लालीला समजावलं होत;"लाली, कधीही स्वतः कमावलेल्या पैशानेच आपल सुख विकत घ्यायचं असत. आणि तो पैसासुद्धा मानाचा असला पाहिजे." लालीच्या डोळ्यासमोरून जणूकाही भूतकाळ सिनेमाप्रमाणे उभा राहिला. लालीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती पटकन केबिनमधून बाहेर पडली आणि रंगाला हाक मारत त्याच्या मागे धावली. रंगा फार दूर नव्हता गेला. लालीने त्याला गाठले आणि कलेक्टर madam कडे बघण्यार्या लोकांची पर्वा न करता तिने रंगाचा हात धरला. "रंगा मला माझ्या माईकडे घेऊन चाल. रंगा.... एकदा तूच मला माझ्या माईकडून दूर शिक्षणाच्या जगात सोडले होतेस. आता तूच मला माझ्या माईकडे नेले पाहिजेस. मी खूप खूप चुकले रे रंगा. पण तू तर माझी खबर ठेवून होतास ना? मग का नाही आलास कधी मला समजावायला? माझी माई!! रंगा खूप खूप सोसलं रे तिने आणि तरीही कायम तिच्या डोळ्यांनी एकच स्वप्न बघितलं. तिची लाली शिकेल आणि मोठी होईल. रंगा, मी शिकले रे. खूप शिकले. पण मी माझ्या माईचा शाहाणपणा नाही घेतला. तिचा आयुष्याकडे बघण्याचा positive approch मला घेता नाही आला. मी कुठल्या शब्दात तुझे आभार मानु रे! त्यावेळी तू मला जगातल्या वाईटापासून वाचवल होतास आणि आज माझ्यातल्या अहम पासून... माझ्यात निर्माण झालेल्या इगो पासून तू मला वाचावालस. कुठे आहे माझी माई रंगा?" लालीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याबरोबर तिचा अहंकार तिचा इगो वाहून गेला होता. आता रंगासमोर तिच पूर्वीची लाली उभी होती. रंगा मनापासून हसला आणि म्हणाला;"चाल लाली." लालीच्या चेहेऱ्यावर देखील हसू फुललं. एक प्रश्नही न विचारता लाली रंगाच्या मागून निघाली. शेवटचा पेपर देऊन रंगाच्या मागून शाळेतून बाहेर पडणारी भविष्य अंधारात असणारी लाली......... रेल्वेच्या डब्यातुन त्याच्यावरच्या पूर्ण विश्वासाने त्याच्या बरोबर आयुष्याला आकार द्यायला निघालेली लाली...... आणि IAS अधिकारी लाली.... आज त्यासगळ्यांच्या पलिकडचि माईची लाली तिच्या माईच्या ओढीने रंगाबरोबर निघाली होती. रंगा लालीला घेऊन रेल्वे स्टेशनवर आला आणि त्याने लालीच लक्ष दूर एका बाकड्यावर बसलेल्या एका वृधेकडे वेधल. लालीने एकदा त्या दिशेने बघितल आणि मग रंगाकडे बघितल. तिचे ओले डोळे चमकले आणि लाली धावत त्यादिशेने निघाली. ....................... चांगल्या मार्क्सने पास झालेल्या लालीने धावत येऊन माईला मिठी मारली होती........ .......................आयुष्याला शिक्षणाचे वळण लावलेल्या लालीने धावत येऊन आपल्या म्हाताऱ्या झालेल्या माईच्या मांडीत डोक ठेवाल होत. माय-लेक दोघी रडत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारा खारा मेवा मातीत मिसळत होता

वाचने 7422 वाचनखूण प्रतिक्रिया 22

एस 11/10/2015 - 14:19
वा. कथा आवडली. आधीच्या भागांमध्ये 'क्रमशः' असे शेवटी लिहायचे होते. ते नसल्यामुळे मला वाटले कथा दुसर्‍याच भागात संपली.

कथा चांगली लिहीली आहे. काही काही प्रसंग छान चितारले आहेत. माफ करा, पण मला खटकलेल्या काही गोष्टी इथे नमूद करतो : १) कथेचे भाग एकाच दिवशी प्रकाशित करणे. जरी वाचकांना लवकरात लवकर पुढचे भाग वाचायला हवे असले तरी लवकर लवकर सारे भाग टाकल्याने कथा प्रेडिक्टेबल झालेली आहे असे मला वाटते. म्हणजे एक भाग वाचून झाल्यावर पुढच्या भागावर क्लिक करताना त्या भागाचा अंदाज मला ब-यापैकी लागलेला. २) लालीचे तीनेक महिने रेल्वेच्या जुन्या डब्यात राहणे. इथे जरा विस्तृत चित्रण हवे होते. स्कोपही होता. एवीतेवी चार भाग केलेलेच, पाचवा झाला असता! ३) काकांबरोबरच्या भयानक प्रसंगात लालीचे "भेंडीच्या" म्हणणे. मान्य आहे काही मर्यादा पाळून तुम्ही लिहिलेत. पण त्या मानहानीकारक, तणावपूर्ण प्रसंगात "भेंडीच्या" फारच मिळमिळीत वाटले! मीच इथे मनात कचकचीत शिवी देऊन मोकळा झालेलो! :) ४) लाली खूपच फास्ट आय.ए.एस. झाली! हे सर्व मी लिहिले म्हणजे कथा वाईट होती असे नाही तर त्यात कथा खुलविण्यासाठी अजून वाव होता असे वाटते. कथा वाचनीय झलेली आहे. कथेने मला खिळवून ठेवले. कथा आवडली! अगदी चित्रपटाच्या ढंगाने चालली होती. धन्यवाद! Sandy

बोका-ए-आझम 11/10/2015 - 20:07
अजून खुलवता आली असती आणि मुख्य म्हणजे एकाच वेळेस चार भाग टाकलेत. थोड्या दिवसांच्या गॅपने टाकले असते तर अजून मजा आली असती.

कविता१९७८ 11/10/2015 - 21:46
माफ करा पण मला काही प्रश्न पडलेत , तुम्ही म्हणता की तुम्हाला आठवडाभर खुप काम असत म्हणुन तुम्ही मिपावर शनिवार आणि रविवारी येता मग इतक्या छान आणि रोचक कथा तुम्हाला पटापट सुचतात आणि तुम्ही सगळे भाग प्रकाशित करता. तुम्ही कुठल्या लिखाणाहुन प्रेरीत होउन कथा लिहीता की तुमचे स्वत:चे लेखन आहे. तुमची आधीची कथा ही आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटत होती.

In reply to by कविता१९७८

कविता ताई, मी आठवडाभर बिझी असते हे खर आहे. पण लेखन आवडत म्हणून अनेकदा रात्रि जागून ते करते. मीपा वर फ़क्त कथा लिहायला log in करायला आवडत नाही. वाचनही करायला आवडत. म्हणून फ़क्त शनिवार रविवार मीपा वर असते.त्यावेळी एखादी कथा add करते. कविता आणि कथा लेखन अनेक वर्षे करते आहे. त्यामुळे देखिल काही अगोदर लिहिलेल्या कथा इथे देऊ शकते. अर्थात याअगोदर कुठेही माझ्या कथा प्रसिद्ध झालेल्या नाहीत हे देखिल खरे. माझ्या कथा प्रामानिकपणे लिहिते. प्रेरित होऊन नाही लिहित. तरीही तुम्हाला जर असे वाटत असेल तर अशी कथा कुठे आणि कधी वाचली आहात ते जरूर सांगा. मलादेखिल ते समजून घ्यायला आवडेल. आपण म्हणालात रोचक आणि छान असतात माझ्या कथा. हे वाचून आनंद झाला. विश्वास ठेवा copy pest हा माझा स्वभाव नाही.

जव्हेरगंज 12/10/2015 - 22:12
थोडक्यात सारांश कुणी सांगेल काय? म्हणजे कथा कशाबद्दल आहे, ओळख वगैरे. मोठ्ठ लिखाण वाचण्याचा कंटाळा येतो. तेव्हा सारांश रोचक वाटल्यास पुर्ण कथा वाचायला इंटरेस्ट येईल,:)

सस्नेह 14/10/2015 - 15:35
कथानक चांगले आहे. तथापि 'कथा' म्हणून परिपूर्ण वाटत नाही. ही कथा म्हणजे एक प्रसंग वर्णन वाटते. लेखन अतिशय सरधोपट वाटले. माफ करा, पण ललित लेखन सदर करताना, विशेषत: कथा, त्यात आकर्षक मांडणी, नाट्यपूर्णता, ओघवती शैली आणि रोचकता हे असणे महत्वाचे आहे. या गोष्टींचा संपूर्ण अभाव जाणवतो. पु.ले. शु.

जव्हेरगंज 14/10/2015 - 22:22
प्रामाणिक लिखाण आवडले!! शैली मात्र ओघवती नाही वाटली. कथेतले संवादही सुधारण्यास वाव आहे.(शक्यतो कमीतकमी ठेवले असते तर जास्त परीणामकारक झाली असती.) कथाबीज आणि प्रयत्न आवडला.