Skip to main content

दोन लघु कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 27/08/2023 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.

यकु

लेखक उन्मेष दिक्षीत यांनी रविवार, 27/08/2023 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मनस्वी लिहायचे त्यापैकी एक होता होता म्हणवायचे धजत नाही जे वाट्टेल, ते लिहायचा ! भेटणे न भेटणे वेगळे , पण स्पर्श करून गेला यकु कुठे गेला ? परिक्रमा असो , हलके फुलके लेख असोत , कन्फेशन असो नाही तर आणी काही जे वाट्टेल, ते लिहायचा यकु कुठे गेला ट्रिब्युट - उन्मेष

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

लेखक शीतलउवाच यांनी शनिवार, 26/08/2023 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो. तो – आज काय सुट्टी आहे का? ते – नाही. तो – मग कामावर का जात नाही ? ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ? तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे…. ते – बरं पुढे ? तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल…. ते –बरं मग? तो – मग काय, निवान्त बसता येईल .. ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की…..

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

लेखक शीतलउवाच यांनी शनिवार, 26/08/2023 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय.

माणसाच्या क्षमतेची गरूडझेप!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 26/08/2023 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
✪ चांद्रयान ३ च्या उपलब्धीसंदर्भात युट्युबवर मुलाखत ✪ भारत देश म्हणून खूप मोठी उपलब्धी ✪ हजारो प्रक्रियांवर अचूक कार्यवाही आणि अनेक दशकांची मेहनत ✪ डोळ्यांनी साथ सोडली तरी जिद्द न सोडणा-या मुलाखतकार वेदिकाताई ✪ Visually impaired असूनही उच्च शिक्षण घेऊन समाजात योगदान ✪ ISRO आणि अशा जिद्दी व्यक्तींकडून खूप काही घेण्यासारखं सर्वांना नमस्कार. सध्या आपण सगळे चांद्रयान- ३ ला मिळालेलं यश बघतो आहोत आणि वैज्ञानिकांचं कौतुक करतो आहोत. चांद्रयान- ३ ने गाठलेली मजल ही खूप मोठी गोष्ट आहे.

फोरिए सीरीज - अजुन एक चिंतन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 25/08/2023 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : सर्वप्रथम म्हणजे मी काही उच्च शिक्षित गणितज्ञ वगैरे नाहीये, थोडंफार स्टॅटिस्टिक्स शिकलो आहे, अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स नाही, प्युअर तर नाहीच नाही. ह्या आधी केलेले अन अन ह्यानंतर होणारे सर्व लेखन हे वरवरील आकलनावर आधारित असुन हेच अंतिम सत्य आहे असा काही माझा दावा नाही. कोणी वेल ट्रेन्ड गणितज्ञ यदाकदाचित हे वाचेल अन ह्या अर्धवट ज्ञानाची खिल्ली उडवेल तर त्याला काही ही हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे हे सारं स्वांतःसुखाय अर्थात स्वतःच्या समाधानाकरता आहे.

चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 24/08/2023 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
चांद्रयान देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले हसले फिदीफिदी, छद्मवेषी म्हणती नऊशे कोटी मातीत घातले. "आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना, दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को', फिरसे बनाओ चांद्रयान तीन को".... घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला गोठले शब्द ओठी,श्वास काही रोखले श्रमसाफल्य पाहता,मनोमनी सुखावले पाहून विक्रमास, तो चंद्र गाल

चिकनलाडू/मटणलाडू किंवा चिकनवड्या/मटणवड्या

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी बुधवार, 23/08/2023 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः > चिकन खिमा / मटण खिमा / पोर्क खिमा / गोखिमा : अर्धा किलो : खिमा ताजा असावा. चामड्यासहित केलेला खिमा असेल तर अजून चवदार लागतो. मटण खिमा किंवा तुमच्या आवडीचा कोणताही खिमा घ्या. मी शक्यतो कोणतेही मांस कमीतकमी दोन तास ८ टक्के मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवतो. खिमा भिजवायची गरज नाही. गरज नसेल पण खाज असेल तर मात्र ब्रायनिंग जरूर करून घ्या. नंतर चाळणीतून गाळून पाणी पूर्ण निथळू द्या. थोडी हळद चोळून घेतली तरी चालावे. > पारमेजान चीज: दोन मुठी: पारमेजान चीज नसेल तर पनीर सोडून इतर कुठलेलंही घट्ट चीज किसून. तेही नसेल तर ऑपशनला टाकावे. चरबी जास्त घ्यावी थोडीशी.

ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!!

लेखक स्मिता दत्ता यांनी सोमवार, 21/08/2023 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!! ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी करायची खूप वर्षांपासून इच्छा होती. एक तर महाराष्ट्राचं टोक असलेला चंद्रपूर जिल्हा पहावा असं मनात होतच त्याचबरोबर ते जंगल, तिथले जनजीवन सारं पाहयाची इच्छा होती त्यामुळे जेव्हा माझी मैत्रीण विनयाने ताडोबा च्या सफारीचं आयोजन संदीप आणि रसिका करतायेत तू येणार का विचारल्यावर लगेच नाव दिलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवासाची तयारी केली आणि नागपूरला जायला निघालो. संध्याकाळी साडेपाचची ट्रेन सकाळी नऊच्या दरम्यान नागपूरला पोचणार होती आणि तिथून दोन तीन तासाचा ताडोबाचा रस्ता. ट्रेन साडेपाच वाजता पुण्याहून निघाली.

मी पाऊस आणि कविता

लेखक मित्रहो यांनी रविवार, 20/08/2023 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे ही एक सरळ साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. दवाखान्यात उगाचच चेकअपसाठी अॅडमिशन घ्यावी इतकं हे रटाळ प्रकरण आहे.