आठचा थाट
आठचा थाट
( चारचा चहा, सहाचा वडा आणि बाराचा बार झाल्यावर त्यात आमचीही एक भर. सदर कथा पूर्णतः काल्पनिक असल्याने लई लोड घेऊ नये.)
पाच वाजून गेले होते. सगळा स्टाफ चुळबुळत घड्याळाकडे पहात होता. तो देखील आता अस्वस्थ झालेला होता. त्याला जास्तच राग आलेला. कारण सकाळपासून काही तरी अगम्य पनवती त्याच्या मागे लागलेली होती. सकाळी येताना गाडी घराबाहेरच पंक्चर झाली. ऑफिसचा प्रवास लोकलमधली घामट गर्दी सहन करत करावा लागला. ऑफिसात गेल्यावर बॉसने उशिरा आल्याबद्दल झाडणी केली. वर पुन्हा दिवसभर सगळी तुंबलेली कामं अगदी आग लागल्यासारखी भराभरा डोकं वर काढू लागली.
मिसळपाव