Skip to main content

कवितेवर केलेली कविता

लेखक निलम बुचडे यांनी सोमवार, 02/11/2015 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
*****कविता***** कविता म्हणजे कवीजीवनाचे पहिले पान कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान कविता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतिबींब कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंंब कविता म्हणजे हरवत जाणारी वाट कविता म्हणजे सुविचारांची पहाट कविता म्हणजे तृणातील इवले फूल कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा... - निलम बुचडे.
काव्यरस

कट्यार पुन्हा काळजात घुसली

लेखक नितीनचंद्र यांनी सोमवार, 02/11/2015 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले.

माझ्या मराठीचा बोल

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 02/11/2015 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार कवी अशोक बागवे यांच्या 'माझ्या मराठीचा बोल' या कवितेवरून प्रेरणा घेऊन खालील काव्य लिहिले आहे. अर्थात कवितेचा भाव अशोक बागवे यांच्या कवितेच्या अगदीच विरुद्ध आहे. आज मराठी भाषा, मराठी संस्कृती किंवा आपलं मराठीपण या गोष्टींबद्दल एकंदरितच मराठी माणसांमध्ये जी अनास्था बघायला मिळते त्यावरून खरं तर हे काव्य सुचलं. सदर परिस्थिती आशादायक नाही, आणि भविष्यात मराठी माणसाची विचारपद्धती बदलली नाही तर आगोदरच कमी असलेलं मराठीचं महत्व नगण्य होईल आणि तेंव्हा हळहळून काहीही उपयोग नसेल. इंग्रजीचा दुराग्रह आणि हिंदीला दिलं जाणारं निरर्थक प्राधान्य हे मराठीसाठी धोक्याचं आहे.

प्रवास

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 02/11/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
. . हायकोर्ट जिल्ह्याच्या गावी होते. दोन चार दिवस राहण्याच्या हेतूने तयारी करून तो निघालेला. दोन वर्षे मोठ्या भावाबरोबर शेतजमिनीच्या भांडणात घरच्या सगळ्यांचेच मन:स्वास्थ्य बिघडलेले होते. कोर्टाच्या चकरा, वकिलांच्या डोक्यावर पैसे ओतणे ते सगळे त्रास एकवेळ सहन करता येतील. पण शेजारी राहणार्‍या भावाच्या कुटुंबाशी रोजच्या कटाकटी आणि हमरीतुमरी आता नको झाल्या होत्या.

तू नि मी

लेखक इति'श्री' यांनी सोमवार, 02/11/2015 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
. . तू समईतील मंद ज्योत, मी सभोवतीचा फडफड वारा अविरत तू तेजस्वी तेवता श्रान्त उभा मी मिणमिणणारा बाभळीतला काटा मी अन काट्यातील तू ग़ुल गोजिरा वळवळतो मी सुरवंटासम पतंग दंग तू भिरभिरणारा नवी पालवी तू वासंतिक सुकून अंति मी ओघळणारा धूर कोंडता मी वणव्याचा तू गंध मृदेचा दरवळणारा लपाछपीची तू श्रावणसर मी आषाढी कोसळणारा ग्रीष्म तप्त मी तहानलेला वर्षेतील तू हिरवपसारा लाटेसम मी उसळी घेतो स्थिरावता तू शांत

टेडी (भाग-२)

लेखक एकजटा अघोरी यांनी सोमवार, 02/11/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
टेडी (भाग -१) टेडी (भाग-२) दुसर्‍या दिवशी वीणाला पहाटेच जाग आली. डोळे चुरचुरत असून देखील तिला नाईलाजाने उठावं लागलं. गळ्यात हात घालून झोपलेल्या दियाचा हात तिनं अलगद बाजूला ठेवला. स्वतःची आह्निके आटोपून झाल्यावर तिने लगेच पोळी भाजी करायला घेतली. दोन्ही तयार झाल्यावर डब्यात भरण्यापूर्वी निवायला म्हणून बाजूला उघडी ठेवली. दियाला उठवणं थोडं मुश्किलच होतं. पण “मी तुला भूर नेते” म्हटल्यावर ती लगेच उठून बसली.

एक बारकुसं लफडं

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 01/11/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाची सोम्याजवळ चिट्ठी दिली, घरी येऊन जेवण केलं अन गच्चीवर जाऊन चंद्र-तारे पाहत निवांत पडून राहीलो. पर मनात धाकधुक चालूच. जर तिला आवडलं नई अन ति बापाला घेऊन घरला आली त? आपल्या बापाचं जाउद्या, तिचा बापच फोडून काढिन. त्याची मिशि पाहुनच पार गळपटायला हुतं. तेवअख्ख्या गावांत इज्जत घालल. च्याला भलतीच् भानगड़ करुण बसलोय. सोम्याला फ़ोन करुण नकु दिउ म्हणाव त् वरुण तेवच् फाटली का म्हनल. जाउद्या होउ दया काय होइचं ते. खाली गेलू. दप्तर घेतलं. आये ला दिन्याच्या घरी अभ्यासाला चाललू सांगितलं अन घरामागं आलू. दत्तूअण्णा शेतात रहायला गेलेला. त्याच्या पत्र्यावरून फिरसे गच्चीवर येऊन निजलो.

श्रीकृष्ण वसुदेव यादव

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 01/11/2015 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिळपाववर रामायण-महाभारताच्या विविध अंगानी चर्चा होत राहाते. त्यातील एक बहुचर्चित व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्या लीलांमुळे सामान्यजनांवर त्याच्या चरित्रातील विविधांगांची मोहिनी पडलेली जाणवते. अनेकांना लीला व अदभूतता सोडून श्रीकृष्णाच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाची माहिती मला नव्याने कळल्याचे जाणवले. ते मला भावले. कदाचित आपणालाही ते वाचायला रंजक वाटेल.

प्रत्यक्षात आलेले स्वप्न!!

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 01/11/2015 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
. . गेल्या वर्षी १५ किंवा १६ फेब्रुवारीला वर्धनचा फोन आला. आवाजात अधीरता ओसंडून जात होती. ”आत्या, स्काईपवर ये ना. तुला एक न्यूज द्यायचीय.” गेला महिनाभर नेटचा घोळ चालू होता. रस्त्याचे काम सुरू होते नि एम.टी.एन.एल.च्या वायर्स उघड्या झाल्याने वाय फाय बंद. स्मार्टफोनही नव्हता. त्यामुळे आता स्काईपवर येणे शक्य नाही असे त्याला सांगितल्यावर तो हिरमुसलाच. “अरे, मला तुझी रिअॅक्शन बघायचीय.