Skip to main content

ति, तेव अण म्या..

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 05/11/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
सगळी मागल्या वर्सातुन फुढं आलेली, म्या एकटाच् नवा. त्याहीच्यात मिसळा मनलं त् म्या खेड्यातला, सुतच् जमाना. वर्गात कई उल्हासच् राइला नवता, पर एकदा तिला हसताना पाइलं अन् सगळा अंगच् नाचू लागला. ति साऱ्या नसाहितातून व्हावू लागली. मागल्या बाकावर बसून, हाताचा कोपाकरुण बोटाच्या सांदीतून तिला टापू लागलो. ति गदगदून हसायची न् म्या खुश व्हायचो. मजाच मजा यायाची. एकदा ति खेटुण गेली अन् म्या अंगाला माराइचा फवाराच् ईकत आणला. दिसभर एकटाच तिच्या मागणं फिरायचु. कदीच्याला बी तिच्यावरच् नजर लावून बसायचो. ति रोज चोरून मह्याकडच् बघायची पर हळू हळू ध्यानात आलं, ति माह्या शेजारी बसणाऱ्या विश्याला चोरून पायची.

शिक्षणाच्या आई चा घो !

लेखक मीउमेश यांनी बुधवार, 04/11/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मुलीच्या शाळेतून फोन आला. आमच्या चिऊताई च्या टिचर नी आम्हा उभयतांना शाळेत बोलावले होते. शनिवारी शाळेला सुटी होती तरी आम्हाला बोलावले. मी जरा आमच्या कन्ये बद्दल सांगतो, येत्या शुक्रवारी ३ वर्षाची होइल. सौभाग्यवती खूपच काळजी करू लागली. काय झालं असेल, मुलीने काही पराक्रम तर नाही केला शाळेत. ( पूर्वी एकदा असंच एकदा शाळेतून बोलावणं आलं होतं , आमच्या कन्येने टिचर च्या कानाखाली गणपती काढला होता … ती कहाणी नंतर कधी तरी ) दोन दिवस सौभाग्यवती नीट झोपली नाही. सारखी काळजी. एकदाचा तो दिवस उगवला. आम्ही शाळेत पोहोचलो.

कोणी वेळ देतं का वेळ!?

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 04/11/2015 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
घड्याळ मिळेल पण त्यातली वेळ!? ही एकच गोष्ट कितीही पैसा ओतला तरी मिळत नाही! त्यामुळे वेळेला किम्मत आहे, असं उगाच नाही म्हणत! त्यामुळे घड्याळाला ही किम्मत, पैशानी नव्हे, आपल्या दैनंदीन जीवनातली घड्याळाची किम्मत...करा करा विचार करा, एखादी बाई दिवासातून जेवढ्या वेळी अरश्यात बघत नसेल, तीतक्या वेळी आपण घड्याळ पहात असतो! मग वेळेची टिंगल केली की डोकं फिरतं, नवीन गाणं, 'टिक टिक वाजते डोक्यात' म्हणे! ते गाणं कधीच पूर्ण ऐकवतच नाही, असं वाटत वेळ वाया चाल्लाय! हाच वेळ वाया जातो म्हणून दुपारी कितीही मारणा इतकी झोप येत असली तरी झोपत नाही, काही वर्षच जगतो आपण, त्यात झोपायचं का! झोप असावी, झोपेपुरती!

'माळा'

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 04/11/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
हो...

*वाईट 'इमोशनल' फजिती*

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 04/11/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे मे महिन्यात अलिबाग इसटी ने आक्षीला चाल्लेलो, पुण्यात बसून लोणावळा घाटापर्यंत आली बस, मी रीझर्वेषन केले नसल्यानी ड्राईव्हर च्या बाजूच्या त्या 'न' असलेल्या 'शीटा' वर बसलेलो, अचानक स्पीडोमीटरच्या बाजूचा एक लोखंडी पत्रा थडथड वाजायला लागला, वाफ येत होती… जारावेळनी कुकरची शिटी उडावी तसा कायतरी प्रकार झाला, एसटी थांबवली ऐन घाटात, कंडक्टरसाहेब हातात एसटीतच ठेवलेला एक दगड घेऊन बाहेर उतरले, एकूणच बहुतांश प्रवाशांची फाटली होती, कारण हे अनुभवणारे निदान अर्धे लोक तरी एसटी मध्ये असावेत!