Skip to main content

वॅली ऑफ फ्लॉवर्स : २ : बंद घाटातुन गोविंदघाटापर्यंत

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 09/11/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे माझी पुणे दिल्ली ट्रेन रद्द झाली आणि मला मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट काढणे भाग पडले. त्यामुळे माझ्या प्रवासाची सुरुवात पुणे ते मुंबई ट्रेनने झाली. बाहेर मस्त पावसाळी वातावरण होते. ट्रेन जेव्हा लोणावळ्या खंडाळ्याजवळुन जात होती, तेव्हा खूपच छान दृश्य दिसत होते. हिरवेगार डोंगर, धबधबे, तळी असे सर्व पाहताना छान उत्साह येत होता. डोंगरदऱ्या, काही ओळखु येणारे किल्ले पाहुन वाटत होते आत्ता इथेच उतरून ट्रेकला जावे. मुंबईला पोहचुन विमान पकडले, दिल्लीला गेलो. दिल्लीला सगळे भेटलो, मग हरिद्वारची ट्रेन पकडली. हरिद्वारपर्यंत संध्याकाळी पोहोचलो. आधीच अंधार पडलेला होता.

हमारी... अधुरी...... नव्वदोत्तरी..............................

लेखक मारवा यांनी सोमवार, 09/11/2015 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
समुहगान आमचा कळप, आमचा झुंड ,आमचा गण अन आमचीच शिरगणती. अगणीत आम्ही तुझी गणना नाही कशात, तु नाहीच आमच्या खिजगणती. आमचा झेंडा , आमचाच अजेंडा, आमची चळवळ आमची तळमळ,अन आमचीच मळमळ. आमची कुलीन घराणी, आमच्या बांधलेल्या बंदिशी, अन आमच्याच तालावर नाचणारे ताल. आमच्याच समेवर आमचेच आदिम अभेद्य अविनाशी आवर्तन सहनाववतु ! सहनौभुनक्तु ! सहवीर्यम करवावहै ! आमच्या नाजुक भावना, आमच्या घाऊक संवेदना, अन आमच्याच भावुक संघटना. साथी हाथ बढाना एक अकेला थक जाये तो..... ..वा वा वा वा वा वा रे वा चल अकेला चल अकेला चल अकेला................
काव्यरस

स्टफ्ड खजूर चॉकलेट्स

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 09/11/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. हि दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची, सुख-समृद्धीची, उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो. तर मंडळी दिवाळी किंवा कुठल्याही आनंदाच्या क्षणी खालील झटपट चॉकलेट्स बनवा आणि आपल्या प्रियजनांसोबत त्यांचा आनंद लूटा, भेट द्या. फार कमी साहित्य वापरुन हि यम्मी चॉकलेट्स बनतात. वेल खालील साहित्याचं प्रमाण हे ४०-४५ खजूर ह्या प्रमाणात घेतलेत.

आक्षी!

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 09/11/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आक्षी! ती तुम्हाला वाटते ती आक्षी नव्हे!नको तेव्हा येणारी किंव्वा पाहिजे तेव्हा न येणारी! ती नव्हे, अलिबाग आणि नागाव या दोघांच्या मध्ये असलेलं छोटसं गाव म्हणजे आमचं 'आक्षी' एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर जशी खळी पडावी ना अगदी तशीच खाली म्हणजे वळणावरच्या रस्त्यावरचा - आक्षी चा स्तंभ, आणि त्याच वळणावर यायची ती सुंदर लाल-पिवळी साडी नेसलेली एसटी, सुंदरच ती! सौन्दर्य मनात असतं, बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी!

जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 09/11/2015 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो कढईतली मोहरी चुर्रर करते हळद मीठ तेल टाकुन शेंगदाने खरपुस भाजले जातात मी बाहेरच बसलेला असतो पेपर वाचत कांद्यापोह्याच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा गाठोडी ईकडे तिकडे सरकतात पोटमाळ्यावरची झुरळं तर्रर पळतात झाडू बादली पाणी घेऊन भिंत पुसली जाते मी खालीच ऊभा असतो स्टुल घेऊन जळमटं काढायच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा साखरेचं माप होत असतं तेव्हा मालक सुर्रर करत चहा पितो डाळी तांदुळ कडीपत्ता पिशवीत कोंबुन भरला जातो मी तिथेच ऊभा असतो काऊंटरजवळ बिलाच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा माहेरचा पाहुणा घरी येतो सगळा शिणवटा अर्रर करुन पळुन जातो पुरणपोळी आंबरस चकल्या ताटात आग्रहा
काव्यरस

कांदे पोहे

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 09/11/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
घरापसुन लांब राहायला लागल कि आयत मिळणार जेवण आपोआप बंद होत आणि मग मेस किंवा कधी परवडेल तसे हॉटेल हा दिनक्रम मागे लागतो. काही दिवसांनी या सगळ्याचाही कंटाळा येऊ लागतो आणि शेवटी, बास झाल! आता आपण स्वतः जेवण बनवायचं हा विचार डोक्यात येतो. पण लागणार सामान आणि कष्ट बघून मग बरेच दिवस तो नुसता डोक्यातच राहतो! पण जे लोक या विचाराला प्रत्यक्षात आणू इच्छितात त्यांच्यासाठी पाककृती वरदानच असतात. त्यामुळे हे भले काम आपण पण करावे असा विचार डोक्यात आला.

मागे उभा मंगेश ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 08/11/2015 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सांगायला हवीच आहे का? ढुस्क्लेमर : ही एका नाक्यावरच्या वासूची व्यथा आहे , तेव्हा कपया मीटर, वृत्त, यमक, चाल शोधु नये. (पैसा)तायडे, सॉरी... :P मागे उभा मंगेश, पुढे उभा सर्वेश माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! ओढणी ती माथ्यावरी 'स्टोल' मुखा कव्हर करी मोबाइल रुळे उरी 'भाऊ' तीज सर्वांगास रक्षु पाहे माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! जन्मजन्मांचा मी वासू इथे कधी तिथे बसू प्रेमी, म्हणावे की कामी? नाक्यावरी येताजाता रोखुनी पाहे माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! इरसाल म्हमईकर
काव्यरस

महानायक अमिताभ : कधी न विझणारा प्रकाश

लेखक हेमंत लाटकर यांनी रविवार, 08/11/2015 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ आक्टोबरला अलाहाबाद उत्तरप्रदेश मध्ये हिंदू कायस्थ परिवारा मध्ये झाला. त्यांचे वडिल डाॅ. हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी व आई तेजी बच्चन कराची मधील शिख कुंटुबातील होती. डाॅ. हरिवंशराय बच्चन यांना दोन मुले, मोठा अमिताभ व लहान अजिताभ. सुरवातीला अमिताभ यांचे नाव इन्कलाब होते पण नंतर त्यांचे नाव अमिताभ ठेवले. अमिताभ चा अर्थ "कधी न विझणारा प्रकाश". अमिताभ यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण नंतर त्यांच्या वडिलांनी बच्चन आडनाव लावले. अमिताभ यांनी दोन ठिकाणाहून एम.ए. ची डिग्री घेतली. अमिताभ यांचा विवाह अभिनेत्री जया भादुरी सोबत झाला.

प्रिय पु ल काका

लेखक शीतल जोशी यांनी रविवार, 08/11/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पु ल काका , लहानपणी ,मला रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती , मग मी हळू हळू मोठी झाले , गोष्ट ऐकायची सवय मात्र कायम राहिली , पण तो जादू करणारा आवाज आता बदलला होता , तो होता तुमचा … पुलकीत आवाज . माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले . आयुष्यात असे किती पण अवघड, उदास प्रसंग आले , आणि असे वाटले कि आज तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतही कथाकथन किंवा एकपात्री निवडावे आणि ऐकावे , मन प्रसन्न होते , आणि माणूस नावाच्या प्राण्यात पुन्हा एकदा प्रेमात पडते .