लेखकराजेंद्र मेहेंदळेयांनी बुधवार, 02/12/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरी . कधीही जा गडावर १००-१५० लोक सापडणारच .ठाणे,पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारा हा गड म्हणजे माळशेज घाटाचा मुकुट मणीच म्हणायला हवा.हरिश्चंद्र गडावर जाणाऱ्या अनेक वाटा आहेत.
लेखकविशाल कुलकर्णीयांनी बुधवार, 02/12/2015 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"साssलाss ! ही रात्र नेहमी काळीच का असते बे?" वैतागलेल्या सुन्याने एकदाचे तोंड उघडले.
"अबे पहाट गुलाबी असते ना, म्हणुन रात्र काळी..., हाकानाका!" पक्या खुसखुसला.....
"गपे, उगाच फालतू जोक्स मारु नकोस. साला इथे बुडाला रग लागलीये बसुन बसुन. तुझा तो वाघ काही येत नाही पाणी प्यायला आज. आ़ज दिसायची शक्यता कमीच वाटतेय मला. बहुतेक निर्जळी अमावस्या दिसतेय त्याची." सुन्या करवादला.
सुन्या उर्फ सुनील जगताप आणि पक्या उर्फ प्रकाश देशमाने...... दोन जिवलग मित्र! लहानपणापासुन एकत्र वाढलेले, शिकलेले. सुदैवाने नोकरीही एकाच शहरात आणि अजुन दोघेही बॅचलर्स. त्यामुळे प्रत्येक विकांताला कुठे ना कुठे भटकंती ठरलेली.
लेखकस्पार्टाकसयांनी बुधवार, 02/12/2015 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
१९६५ चा सप्टेंबर महिना...
लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर जिलेट कप या वन डे टूर्नामेंटची फायनल सुरु होती.
प्रतिस्पर्धी होते सरे आणि यॉर्कशायर!
सरेचा कॅप्टन मिकी स्टुअर्टने टॉस जिंकून फिल्डींग घेतली होती. यॉर्कशायरच्या बॅट्समननी केलेली कमालिची संथ सुरवात स्टुअर्टचा हा निर्णय सार्थ ठरवणार अशीच चिन्हं दिसत होती! पहिल्या १४ ओव्हर्समध्ये केवळ २२ रन्स निघाल्या होत्या! वन डे क्रिकेट बाल्यावस्थेत असलं, तरी इतक्या संथ सुरवातीची अपेक्षा कोणालाच नव्हती!
विशेषतः यॉर्कशायरचा कॅप्टन ब्रायन क्लोजला!
सॉमरसेट विरुद्ध क्वार्टरफायनलमध्ये या दोघांपैकी एकाने २३ रन्स काढण्यासाठी तब्बल ३२ ओव्हर्स खेळून काढल्या होत्या!
लेखकसमीर_happy go luckyयांनी मंगळवार, 01/12/2015 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
तमाशा
दिग्दर्शक इम्तियाज आली हे आजच्या जमान्यातील पडद्यावर अन पडद्या बाहेर दोन्ही कडे (वेगवेगळी/एकत्र) गाजणारी जोडी रणबीर कपूर -दीपिका पादुकोण ला घेऊन हा नवीन सिनेमा घेऊन आलेले आहेत.लेखक देखील तेच आल्यामुळे या प्रयत्नाच्या प्रेक्षकांना वाटणाऱ्या सगळ्या यश-अपयशाचे धनी तेच एकटेच.
"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजवण्यासाठी दिग्दर्शकाने पूर्ण कहाणी वाहून घेतलेली आहे.
लेखकजव्हेरगंजयांनी मंगळवार, 01/12/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
अरे या ना रे
कि जीव गेला
कि जग गेलं, झोपा रे
अरे या ना रे
की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे
ना सांज ना सकाळ,
सगळा अंधारच अंधार
आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे
मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा
मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा
ना अंधरुन ना रजाई
ना उतरण ना चढाई
आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे
जळतच गेली जळत जळत गेली
दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी
नाही विझली नाही विझली
हवेनेही नाही विझली ही जिंदगी
एक फुंकर मारली
सगळा धूर ऊडून गेला
तो श्वास होता, एक ध्यास होता
जो घेऊन गेला, सत्यानाश होता
मायेच्या काळजाचा एक नाद होता
अरे या ना रे
============================
सौजन्य:
- डॉ. सुधीर रा. देवरे
आपण काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. अमूक एका समूहाच्या लोकांनी आमच्या वस्तीत स्वत:चं घर बांधूनच नव्हे तर भाड्याच्या खोलीतही राहू नये असं कोणी ठरवणार असेल तर भयावह आहे. अमूक खाणार्यांनी आमच्या वस्तीत येऊ नये असा फतवा निघणार असेल तर ते त्याहूनही भयंकर आहे. आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही. आपण नेमके आज मानवी समाजात राहतो का आपापल्या जाती- धर्माच्या कळपात राहतो.
लेखकविश्वव्यापीयांनी मंगळवार, 01/12/2015 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा,
झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.
आठवतो मज दिवस तो पहिला ,जेव्हा आपला परिचय झाला ,
परिचयाच्या या वाटेवरुनी ,प्रेमाचा अंकुर उमलला.
लेखकपालीचा खंडोबा १यांनी मंगळवार, 01/12/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
खारीचं शेपूट अलगद
फिरावं तसा
तो कुंचला फिरवायचा
दरीत कोसळल्या संध्येचे
रंग चोरून
कागदावर उतरवायचा
त्यात थोडसं
धुकं भरून.
मी मात्र अनामिष
डोळ्यांनी न्याहाळायचो
फिरत्या रंगांचे गूढ
अन त्याच्या
,ओठात , बोटात
अडकलेला कुंचला.
मनाला आर्त साद
घालणारी त्याची ती
रंगसंगती बेभान करायची
डोळ्यातल्या आसवांची
कासवे
डोळ्यातच मरायची,
मात्र
एक अनामिक हूरहूर
आसमंत भारून टाकायची.
लेखकबाजीप्रभूयांनी मंगळवार, 01/12/2015 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
जनरली हॉरर कथेमधली पात्रं उशीर झाल्यावर जंगलाचा रस्ता पकडतात आणि अलगत भुताच्या जाळ्यात सापडतात, पण त्यादिवशी मी आणि संजयने पकडलेला रस्ता नेहमीचाच होता. मला आजही तो प्रसंग आठवला कि अंगावर काटा येतो.
डिसेंबरचे दिवस होते, हवेत बऱ्यापैकी गारवा होता. रात्री १० च्या नंतर धुकं आता नेहमीचंच झालं होत. आमच्या शाळेच्या मुख्य इमारतीच्या अगदी समोर आतल्याबाजूला मैदानाला लागूनच चाळ टाईप शाळेचीच इमारत होती. कोणते वर्ग भरायचे ते आता आठवत नाहीये पण संध्याकाळी ते रिकामे असायचे. मी, संजय, संजय-२ आणि निलेश त्यातल्या एखाद्या रूममधे एकत्र अभ्यास करायचो...
लेखकवेल्लाभटयांनी मंगळवार, 01/12/2015 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नारी नारी (हिशम अब्बास) या गाण्याचं विडंबन
भारी भारीब्लॉग दुवा
भारी भारी *३
भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू
रस्त्यारस्त्यावर आमच्या भाऊंची हवा
भारी की नाय (हबीबी दा)
दिसतो तो म्हणतो भाऊ तुम्हीच हवा
भारी की नाय (हबीबी दा)
भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू
भाऊंचा नाद कुण्णी करतो का बघा
भारी की नाय (हबीबी दा)
करतो तो करतो पण तो उरतो का बघा
भारी की नाय (हबीबी दा)
भारी भारी; भारी आमचे भाऊ
भारी भारी; बॅनर बिनर लावू
भाउंची गाडी ऑडी चमचमत्या चैनी
रेबॅनचा गॉगल आणि