विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा,
झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.
आठवतो मज दिवस तो पहिला ,जेव्हा आपला परिचय झाला ,
परिचयाच्या या वाटेवरुनी ,प्रेमाचा अंकुर उमलला.
प्रेमाचा अंकुर बहरला ,बहरून शुभमंगल झाला ,
आठवतो मज अजून सारखा , मिलनाचा तो क्षण पहिला .
प्रेमाचा हा तरु मोहरला ,आल्या त्याला नव्या पालव्या ,
आठवतो अजून दिवस तो मजला , दोनाचा जेव्हा त्रिकोण झाला .
सुखी आपला संसार चांगला , नजर लागली , कसा बिघडला ?
गेलीस ग तू सोडूनी अर्धा , सुंदर आपला डाव मांडला .
तरीही हा चिमणा एकला , पांखारांसाठी जगाला श्रमाला,
उडूनी गेली पांखरे आतां ,चिमणा राहिला ग एकला !
विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा,
झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2021
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली आहे
वृत्तात बसवून बघा
In reply to चांगली आहे by पैसा
अक्षर गणवृत्तांचा
In reply to वृत्तात बसवून बघा by विश्वव्यापी
हे काही वाचून बघा.
In reply to अक्षर गणवृत्तांचा by पैसा
स्टोरी बोल्ड झालीय
स्टोरी बोल्ड झालीय
In reply to स्टोरी बोल्ड झालीय by अभ्या..
:):)
In reply to स्टोरी बोल्ड झालीय by अभ्या..
स्टोरी बोल्ड झालीय
In reply to स्टोरी बोल्ड झालीय by अभ्या..
सारखे सारखे असे केले की क्लीन
In reply to स्टोरी बोल्ड झालीय by विश्वव्यापी
सारखे सारखे असे केले की क्लीन
In reply to सारखे सारखे असे केले की क्लीन by अभ्या..
वेल प्लेड.
In reply to सारखे सारखे असे केले की क्लीन by विश्वव्यापी