Skip to main content

तेच ते

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 20/01/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागे सीट हे विडंबन लिहिले होते. रुढार्थाने हे विडंबन असले तरी विडंबन म्हणावे तसे नाही. आपण सुडंबन म्हणू या. ही कविता पण त्याच प्रकारातली. आयुष्याच्या उतार वयात एकटे पडलेल्या आजोबांचे दुःख. (माझे आवडते कवी विंदा करंदीकर आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.) सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !!
काव्यरस

दुलई

लेखक सुमेध रानडे यांनी बुधवार, 20/01/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक दुलई ठेवलीये जपून थंडीच्या कपड्यांच्या बोळक्यात, येते तिची आठवण मधनंच साऱ्या आठवणींच्या घोळक्यात. त्या दुलईच्या मायेतंच मला झोप गवसली होती, गाढ झोपेतून उठून लहानपणी मी तिला लाळही पुसली होती. मऊशार उबदार मखमली तिचा स्पर्श, तिने अगदी सहज टिपलय माझ्या वाढत्या वयाचं वर्ष! माझ्यासवे ऐकल्यायेत तिने कितीतरी गोष्टी आणि, कितीदातरी लपवलंय माझ्या डोळ्यातलं पाणी! सकाळ झाली की गुंडाळून फेकून द्यायचो कोपऱ्यात, आणि रात्री मात्र त्याच कोपऱ्यातून काढायचो तिला तोऱ्यात. खुपसलं असेल, लाथाडलं असेल नको असेल तशी, पण माझ्या कित्येक आठवणींना दिली तिने कुशी! परवाच आई म्हणाली तू पांघर तीच दुलई, शोध शोध शोधली पण
काव्यरस

सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे, कोणती घ्यावी????

लेखक काकासाहेब केंजळे यांनी बुधवार, 20/01/2016 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे.हॅचबॅक प्रकारातली गाडी अपेक्षीत आहे.माझा वापर जास्त नसणार आहे, महीण्याला कमाल १००० कीमी वापर होणार आहे.माझे काही प्रश्न आहेत .जाणकारांनी प्रकाश टाकावा. १. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.? २. डीझेल घ्यावी की पेट्रोल.? ३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत? ४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ? ५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय? ६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे. धन्यवाद.

ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 20/01/2016 12:28 या दिवशी प्रकाशित केले.

ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन

मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.

मिपा नगरीची कहाणी!

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 19/01/2016 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर होतं, मिपा नावाचं! अत्यंत सुखी,समाधानी! व्यक्तिस्वातंत्र्य विचारस्वातंत्र्य या मूल्यांचा आदर करणारं! त्या मूल्यांना जपणारं! इथे लोक राजालाही विरोध करायचे, खड़े बोल सुनवायचे! पण राजा दयाळू होता.

गुलामी नात्यातली!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 19/01/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी भिडस्त व्यक्ती असेल जी कधी कुणाला "नाही" म्हणू शकत नसेल त्याची आजकालच्या जगात फारच परवड, कुचंबणा आणि गोची होत असते. अशा भिडस्त असलेल्या समोरच्या व्यक्तीची संमती न घेता त्याला गृहीत धरून अनेकदा काही गोष्टी केल्या जातात. समोरच्याने त्याबद्दल चकार शब्द काढायचा अवकाश की त्या अगोदरच त्याच्या तोंडावर "भावनिक धमकी" असलेली चिकट पट्टी लावली जाते आणि त्याला बोलू न देता व स्वत:चे मत व्यक्त न करू देता त्याचेवर अगणित स्वार्थी अपेक्षा, इच्छा, आकांक्षा कर्तव्याच्या वेष्टनात बांधून लादल्या जातात मग पट्टी काढली जाते. याला काहीजण संवाद म्हणतात.

लोनाड (जानवल) ची बौद्ध कालीन लेणी आणि शिवमंदिर .

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 19/01/2016 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मैत्रिणींनो, मिपावरील आजकाल होत असलेले वितंडवाद पाहुन मन खिन्न होते. म्हणून असे पर्यटनाचे लेख लिहितानाच बरे वाटते. असो . मागील शनिवारी लोनाड येथे जाउन एक छोटे डोंगरात कोरलेले शिवमंदिर पाहण्याचा योग आला. या मंदिरात छोटी बौद्ध लेणीही आहेत. लोनाड हे मुंबई नाशिक महामार्गावर ठाण्याच्या ईशान्येला भिवंडीपासून १२ किमी आहे. पिसे किंवा भातसा धरणापासून मुंबईला पाणी पोहोचवणारी पाइप लाइन या मार्गावर दिसते. या ठिकाणी जाण्यास भिवंडीतील वंजारपट्टी येथून रिक्षाची सोय आहे (लोनाड किंवा जानवल येथे उतरणे) . किंवा अगदी मर्यादित बसॆस भिवंडी स्थानकातून मिळतात.

Celebration

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 19/01/2016 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
फार क्लेशदायक आहे असं तुझ्याशिवाय जगणं, मी पर्यायांचा फारसा विचारच करत नाही ! कट केल्याप्रमाणे रात्री संगनमताने अंगावर येतात, तू जितकी हळुवारपणे यायचीस तितक्याच टोकाचा क्रूरपणा दाखवत ! दिवसाच्या उत्तरार्धात रात्रीच्या पुर्वार्धात अडकलेल्या कौमार्यवेळेत मनाचे पाखरू व्हरांड्यातल्या " फायरप्लेसवर" जाऊन बसते, गारठलेल्या गावातला गारठा, धुक्यासह माझ्या घरात शिरतो, तेवणार्‍या रोशनदानाचे तरंग घरात नाचायला लागतात ! आता मला कविता करावीशी वाटते, तू नसताना ? मी कवितेची कल्पनासुध्दा करू शकत नाही, तुझ्या नसण्याचे भान मला असले तरी, कल्पना अनभिज्ञ आहे ! पावसाळाभर दमट पडलेल्या तुझ्या वसनांनचा आवेगी सुगंध

जलमार्ग विकासाचे वरदान उद्योगांना

लेखक अनिकेत एस जोशी यांनी मंगळवार, 19/01/2016 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
“अमेरिकेचा विकास झाला म्हणून तिथे रस्ते चांगले नाहीत तर रस्ते चांगले होते म्हणून अमेरिकेचा इतका विकास झाला”, हे अब्राहम लिंकन यांचे वाक्य नितीन गडकरींनी आपल्या हृदयावर कोरून ठेवलेले आहे. ते वाक्य एका नक्षीदार पाटीव लिहून त्यांनी सेना-भाजपाच्या पहिल्या राजवटीत महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांच्या टेबलावर ठेवण्यासाठी मुद्दाम दिले होते. गडकरींच्या राहत्या घरातही ठळकपणाने ते वाक्य दिसत असे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना ते वाक्य हेच ध्येय मानून गडकरींनी कामाचा जबर झपाटा लावलेला होता.