मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोनाड (जानवल) ची बौद्ध कालीन लेणी आणि शिवमंदिर .

शान्तिप्रिय · · भटकंती
मित्र मैत्रिणींनो, मिपावरील आजकाल होत असलेले वितंडवाद पाहुन मन खिन्न होते. म्हणून असे पर्यटनाचे लेख लिहितानाच बरे वाटते. असो . मागील शनिवारी लोनाड येथे जाउन एक छोटे डोंगरात कोरलेले शिवमंदिर पाहण्याचा योग आला. या मंदिरात छोटी बौद्ध लेणीही आहेत. लोनाड हे मुंबई नाशिक महामार्गावर ठाण्याच्या ईशान्येला भिवंडीपासून १२ किमी आहे. पिसे किंवा भातसा धरणापासून मुंबईला पाणी पोहोचवणारी पाइप लाइन या मार्गावर दिसते. या ठिकाणी जाण्यास भिवंडीतील वंजारपट्टी येथून रिक्षाची सोय आहे (लोनाड किंवा जानवल येथे उतरणे) . किंवा अगदी मर्यादित बसॆस भिवंडी स्थानकातून मिळतात. येथून पिसे धरणाला जाणारी बस पकडून लोनाड किंवा जानवल (लोनाड पासून पिसे धरणाच्या दिशेने केवळ १०० मीटर अंतरावर) येथे उतरावे . याशिवाय लाल चौकी कल्याण येथे उतरून सावदे येथे रिक्षाने जाऊन नंतर दुसऱ्या रिक्षाने जानवल येथे जाता येते. येथे उतरून एका छोट्याश्या टेकडीवर चढून गेल्यावर हे मंदिर आहे. हे अतिशय छोटे मंदिर असून , याच्या पायथ्याला बहुधा व्हर्लपूल कंपनीचे गोडाऊन आहे. वारसा स्थळाची औपचारिकता पूर्ण न केल्यास हे मंदिर अतिक्रमणाच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती आहे. मंदिराबाहेर जातककथा हे लेणे असून काही लेणी मन्दिराच्या सभामंडपावर कोरली आहेत. मंदिराबाहेर एक छोटे कुंड पाहावयास मिळते. प्रकाशचित्रे डकवत आहे. शांत परिसर ! L1 l2 l3 l4 l5 l6 l7 l8 l9 l10 l11 l12 l13 l14

वाचन 13404 प्रतिक्रिया 28