Skip to main content

४ तासाचा ट्रेक - ४४ तासांचा प्रवास…….दुधसागर धबधबा

लेखक जगप्रवासी यांनी बुधवार, 27/01/2016 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
चेहरापुस्तकावर कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे फोटो आले होते त्यात दुधसागर धबधब्याचे फोटो होते. याचे शुभ्र दुधाच्या रंगाचे पाणी पाहून दुधसागर हे नाव शोभत होते. ज्याने कोणी हे नाव ठेवलं त्याच्या बुद्धीला सलाम. दुधा सारखा असणारा त्याचा रंग पाहून मनात म्हटलं होत कि राव एकदा तरी हा बघावा, नंतर चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटात परत याची झलक दिसली. हा चित्रपट फक्त त्या एका दृष्यापुरता पाहायचो. नोव्हेंबर महिन्यात दुधसागर ला जायचा योग जुळून आला. परत शिवशौर्य संस्थेसोबत दुधसागर ट्रेक करायचा प्लान केला. ट्रेक फी भरून नोंदणी केली आणि दुधसागर बद्दल जितकी माहिती जमवता येईल तितकी जमवायला सुरुवात केली.

हुंकार वेदनेचे

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 27/01/2016 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या या स्वगताला कविता म्हणायचे धाडस करु नका हे फ़क्त हुंकार आहेत ! एका अतृप्त आत्म्याचे नाकारलेल्या जीवाचे ज्याला शरीरच मिळाले नही.......... हे आक्रंदन आहे तडफ़डणा-या मनाचे, ज्याचे संचित संपले आहे! याला कवितेचा दोष देऊ नका! हा शाप मी शब्दानी भोगतोय! अश्वत्थाम्याचे प्राक्तन घेऊन स्वत:ला शोधतोय! वसंतात फ़ुले फ़ुलतील आषाढात मेघ बरसतील हि नियती आहे! माझे शब्द अवेळी येणा-या पक्षांप्रमाणे आहेत, जो थवा सोडुन भरकटलाय! मी एवढेच सांगीन जे दु:ख मी भोगतोय! त्या वेदना इथे उमटतायेत! ह्या आहेत, अपुर्णतेच्या, वांझपणाच्या खुणा, ह्याला लेणी म्हणु नका!

मदत हवी आहे - मायक्रोव्हेव ओवन खरेदी

लेखक अमृत यांनी बुधवार, 27/01/2016 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर वा इतरही ठिकाणी बर्याच पाककृती बघुन करण्याची इछा होते पण बरेचदा काही पाकृ मायक्रोव्हेव नसल्याने करता येत नाहीत. तरी नविन मायक्रोव्हेव खरेदी करण्याचा विचार आहे तेव्हा थोडं मार्गदर्शन मिळू शकेल काय. मित्र परीवारात थोडी चर्चा केली असता अगदी टोकाची मतं ऐकायला मिळालीत उदा. कुणी सल्ला दिला की सोलो प्रकारातील घ्यावा तर कुणी कोन्वेक्शन धेण्याचं सुचविलं.मला खालील शंका आहेत १. कोणता प्रकार घ्यावा. सोलो/ग्रील/कन्वेक्शन? २. कंपन्यांची प्राधान्य क्रमवारी ३. मासिक वीजबिलात किती वाढ अपेक्शित आहे? समजा रोज १५मि वापर केल्यास ४. एकंदरीत उपयोगीता व फायदे/तोटे ५. बजेट - १२ हजार पर्यंत ६.

सह्याद्री वाहिनी वरील नाटकांच्या कार्यक्रमाबाबत

लेखक अभिनव यांनी बुधवार, 27/01/2016 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
१. फार पुर्वी सह्याद्री वाहिनीवर रात्री एक नाटक लागले होते. त्यात नीना कुलकर्णी आईच्या भुमीकेत होत्या. त्यात या आईच्या व्यक्तिरेखेचा आपल्या अंध मुलावरील प्रेमापोटी आंधळे होऊन व अती सुरक्षीत ठेवण्यासाठी त्याला त्याची स्पेस न देणे असा काहीसा प्लॉट होता. हे नाटक कोणते आहे? कुठे मिळेल? २. हे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी सह्याद्री वाहिनीवर असेच एक नाटक लागले होते. तुषार दळवी आणि किशोरी शहाणे होते त्यात.

चंद्रास्तं! - शिवनारायण चँडरपॉल निवृत्त!

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 27/01/2016 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर चंद्रास्तं झाला! कधी ना कधी तरी हे होणारच होतं म्हणा! तशी चिन्हं तर गेल्या वर्षभरापासून दिसत होती. पण तरीही कुठेतरी असं वाटत होतं की हे चंद्राला लागलेलं तात्पुरतं ग्रहण आहे. आजवर अनेकदा अशा छाया-प्रकाशाच्या खेळातून तो तावून-सुलाखून बाहेर पडला होता. त्याला ते अजिबात अशक्यं नव्हतं! प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजूबाजूला फडफडणार्‍या मिणमिणत्या दिव्यांच्या तुलनेत ग्रहण लागलेला चंद्र कधीही श्रेयस्कर, कारण कधी ना कधी तरी तो छायेतून बाहेर येऊन पुन्हा एकदा तो पूर्ण तेजाने तळपून उठेल अशी किमान आशा तरी करता येते! काळ ही अशी एक गोष्टं आहे जी कधीही कोणासाठी थांबत नाही.

विज्ञान लेखमाला : २ : स्पेस जंक

लेखक Keanu यांनी मंगळवार, 26/01/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
१२ मार्च २००९, पृथ्वीवर नेहमीचाच दिवस. मागच्या पानावरून आयुष्य पुढे चालू. पण दूर.. थेट अवकाशात वेगळंच घडत होतं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अंतराळवीर दैनंदिन दिनक्रमात गुंतलेले असताना, अचानक कंट्रोल रूममधून संदेश आला - "We are having red conjunction!" जे घडतं होतं, घडणार होतं, ती धोक्याची नांदी होती. Red Conjunction - अंतराळात निरुद्देशीय, दिशहीन वेगाने फिरत असलेले धातूचे तुकडे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आदळले असते, तर त्यातून होणारी हानी अपरिमित होती. Red Conjunction अर्थातच स्पेस जंक - अंतरिक्षातला कचरा. ### दुसरं महायुद्ध संपलं आणि शीतयुद्धाची नांदी झाली.

आपण किती हसतो!

लेखक सुमेध रानडे यांनी मंगळवार, 26/01/2016 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
रोज आपण पुष्कळ हसतो, कधी योग्य कधी वायफळ हसतो. आईच्या भोळ्या प्रश्नावर प्रेमाने हसतो, बाबांच्या लहानशा चुकांवर जोमाने हसतो. मित्रांच्या घोळक्यात एकत्र हसतो, मोबाइल मधे बघून दिवसरात्र हसतो. साहेबाच्या जोकवर टाळी मारुन हसतो, आणि नंतर साहेबावरंच मागे चोरुन हसतो. कधी मोठ्याने तर कधी हळुवार हसतो, एकाच विनोदावर शतवार हसतो. कधी उशिराने तर कधी तात्काळ हसतो, कधी निरागस कधी खट्याळ हसतो. निर्लज्ज होऊन कोणाच्या तोंडावर हसतो, कधी तोंड लपवूनही अनावर हसतो. कधी मोजून मापून कधी मुक्त हसतो, कधी गालातल्या गालात लुप्त हसतो. नावडीच्या व्यक्तीवर पोटभर हसतो, स्वतःवरच्या टिकेवर मात्र वरवर हसतो. कोणाला तरी चि

पॉपकॉर्न ची गरज आहे का?

लेखक सुरवंट यांनी मंगळवार, 26/01/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
पॉपकॉर्न ची गरज आहे का? पॉपकॉर्न म्हणजे 'मक्याच्या लाह्या' असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. लाह्या म्हणजे यात वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे असे सगळेच खमंग दाणे अध्याहृत आहेत. सोबतीला कोक, पेप्सी, वेफर्स असे वेस्टर्न प्रोडक्ट अॉप्शनल आहेत . पॉपकॉर्न गरज पडते(च) का? आणी का पडते? - पहिली गोष्ट म्हणजे खवैय्यांच्या तोंडाला आलेली सपक चव. कित्येक दिवसांत वशाड खायला न मिळाल्याने आलेली हतबलता. रोजचे वरणभात खाऊन चालू झालेले अपचन. यावर ऊतारा म्हणून हे लोक पॉपकॉर्नच्या 'आहारी' जातात. पॉपकॉर्न खाणारे लोक आळशी असतात असा एक समाजमान्य ग्रह रुढ झाल्याचे ऐकिवात आहे.

एका सूर सम्राज्ञीला विनम्र अभिवादन

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 26/01/2016 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
सुमन कल्याणपूर ............ एक अनभिषिक्त सूरसम्राज्ञी. आपल्या अवीट स्वरांनी गेली अनेक दशके भारतीय मनांवर राज्य करणाऱ्या सुमनताई म्हणजे संगीताच्या सम्राज्ञीच! उद्या २७ जानेवारीला त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ! "समाधी घेऊन जाई ज्ञानदेव सोहळा अपूर्व जाहला गे माये " या त्यांनी गायलेल्या गीताने माझ्या बालपणात मला त्यांच्या आवाजाची ओळख झाली.

नवीन सल्लागार व व्यवस्थापक

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 26/01/2016 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना. आज मिसळपाव संबंधीत दोन महत्वाच्या घोषणा करीत आहोत. काही मिपाकरांचे खाते शिस्तभंगामुळे काही काळासाठी गोठवले होते त्यांची खाती आज पुन्हा सक्रिय करीत आहोत. मिपाच्या सल्लागार मंडळात यापुढे प्रा.डॉ. दिलीप बिरूटे, पैसा, आणि आनंदयात्री सहभागी होत आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा मिपाला आता पर्यंत फायदा झालाय. यापुढील काळात यांच्या सहकार्याने मिपाची प्रगती होईल अशी आशा आहे. यापुढील सहा महिन्यांसाठी मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार प्रशांत यांचेकडे असतील. मिपाच्या संबंधीत कुठलाही व्यवस्थापकीय, धोरणात्मक निर्णय प्रशांत घेतील.