Skip to main content

"पावसाळ्यातला दूधसागर. ."

लेखक गणामास्तर यांनी रविवार, 07/02/2016 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून, खरं तर महिन्यांपासून "दुधसागर" च्या भटकंती वर एक लेख लिहावा असे मनात होते. परंतु काही कारणाने जमत नव्हते. एक तर आम्ही येथे फक्त प्रतिसादा पुरते असतो आणि त्यात गेल्या काही दिवसांत येथील वावर देखील खुपचं कमी झाला होता. मध्यंतरी 'जगप्रवासी' यांच्या '४ तासाचा ट्रेक - ४४ तासांचा प्रवास…….दुधसागर धबधबा' या धाग्यामुळे परत एकदा दूधसागर ट्रेक च्या आठवणी जाग्या झाल्या आणि आता काही करून हा लेख पूर्ण करायचा निश्चयचं केला.

आठवणीतल्या बाई!

लेखक पी महेश००७ यांनी रविवार, 07/02/2016 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा : जीवन शिक्षण विद्यामंदिर गाव ः पिंपळगाव बसवंत पागे बाई आणि घोडके बाई.... पहिली ते चौथीच्या काळातील या दोन शिक्षिका माझं आयुष्य समृद्ध करून गेल्या. त्यातल्या त्यात घोडकेबाई मला खूप चांगल्या आठवतात. सुमारे तीस वर्षांपूर्वीचं मला सगळंच काही आठवणार नाही; पण त्यांचं शिकवणं मला अजूनही आठवतं. आता ते धूसर होत चाललंय. मेमरी डिलीट होण्याच्या आत कुठे तरी स्टोअर करावं म्हणतोय.. म्हणूनच मी ते कुणाला तरी सांगतोय. ‘आटपाट नगर होतं’ या वाक्याने सुरुवात होणाऱ्या गोष्टी आठवतात. हा पतंग की पाखरू म्हणे मज आभाळी चल फिरू... या कवितेची चाल किती छान बसवली होती त्यांनी...!

मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)

लेखक Anand More यांनी रविवार, 07/02/2016 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ___________________________________________________ मी शाळेत असताना मैत्रीण असणे ब्रम्हह्त्येइतके महापातक होते. आणि मी पापभीरू असल्याने माझ्यातील कुमारसुलभ भावनांना मुरड घालण्यात तत्कालिन समाजपुरुषाला यश आले होते. अनेक मुली मैत्रीण होण्याची क्षमता बाळगून आहेत आणि काही तर त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत हे कळत असून देखील मी ब्रम्हहत्या न करताच शाळेतून बाहेर पडलो होतो. त्याशिवाय मला शाळेत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मित्र होते. म्हणजे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी प्रत्येक वेळी मी नवीन मित्रांच्या घोळक्यात असे. घोळका पण छोटासा, मी धरून चार मित्र. दहावीनंतर ते पण सुटले. याचा अर्थ प्रत्येक वेळी मी आधीच्या मित्रांपेक्षा जास्त वेगाने सजाण होत होतो असा काढून मी स्वतःला समजावीत असलो तरी याचा अजून एक अर्थ दर तीन वर्षात माझे मित्र मला कंटाळत असतील असाही होऊ शकतो हे सत्य मी नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे मित्रांच्या गोड आठवणींपेक्षा मित्र सुटल्याच्या हुरहुर लावणाऱ्या आठवणी जास्त असल्याने, Reunion ला जावून कुणाशी काय बोलणार? कुणाला आपल्याशी बोलण्यात रस असणार? आणि आता तर एक गांधीबाबा पण गेले, अश्या विचाराने खिन्न होऊन घरी पोहोचलो.

लदाख सायकल ने : पांग ते शो-कार मोड (भाग ९)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी रविवार, 07/02/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेती जास्त प्रमाणात होत नाही म्हणून मांस जास्त खातात. लद्दाख सारख्या ठिकाणी तर हे गरजेचं आहे. ते तिघे यात्रेकरू होते. तिसरा शेजारच्या तंबू मध्ये खात पीत होता. त्यानंतर नाच गाणी सुरु झाली. एक गोलाकार चक्कर मारून नाच सुरु झाला. ती बाई इतके हळू हळू पाय उचलीत होती कि जशी काय झोपली नाचता नाचता. मी पण एक तास कार्यक्रम पाहिला आणि झोपायला गेलो. आज २८ किमी सायकल चालवली.

दिवस अकरावा

सकाळी साडे सातला डोळे उघडले. हॉटेल च्या मालकिणीने "जुले जुले" म्हणून आमचा स्वागत केलं.

पुण्यात जरा ऊदासच वाटलं

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 07/02/2016 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात जरा ऊदासच वाटलं शुक्रवार पेठेत एक माकड मारलं रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला चालत चालत मिरजेला गेलो वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला सांगोल्याला मावशीच्या घरी तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला पंढरपुरात जेव्हा पोहोचलो विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला चंद्रभागेत बुडी मारुन पुन्हा परतीचा रस्ता शोधला पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं _________________ (आधारीत )
काव्यरस

घरच्या घरी कचरा व्यवस्थापन

लेखक रम्या यांनी रविवार, 07/02/2016 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
      बरेच दिवस मिपावर read only मोड मध्ये राहिल्यावर आज काही तरी टाइपायचा योग आला. तर आजचा विषय "घरच्या घरी कचरा व्यवस्थापन". या विषयावर ढीगभर माहीती जालावर उपलब्ध आहे. पण मराठीतून तशी कमीच. पुस्तकेही बरीच उपलब्ध असतील पण त्यामधे सर्वसाधारण पणे हे असं करा, तसं करू नका अशा स्वरुपाचे लिखाण पहायला मला मिळालं. पण काय करायचं? आम्ही पडलो संशयी! लोकांच्या कपाळावर जसं गंध असतो तसा आमच्या डोक्यावर कायमचं प्रश्नचिन्ह असतं! आम्हाला कायम "का?" हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे सल्ल्यांनी भरलेलं पुस्तक सहसा माझ्या डोक्यात शिरतच नाही.

अ‍ॅडमिट किडा - कथा

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 06/02/2016 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
--- अ‍ॅडमिट किडा ----- कथा --- काल्पनीक -------------- "अ‍ॅडमिट किडा !!!! " "किसका घर ???? " "मेरा घर ? मेरा घर ? तो झोपाळा !!!" वाड्याच्या आवारामध्ये मुलांचा खेळ अगदी रंगात आला होता . या खेळात ज्याच्यावर राज्य आहे त्याने एखादी जागा किंवा ठिकाण घर म्हणुन सांगायचे आणी मग इतरांनी त्याला चुकवत त्या जागेपाशी जायचे . यामध्ये जो पकडला जाईल त्याच्यावर पुढचे राज्य यायचे . मुले या खेळात अगदी गुंग झाली होती. दुपार झाली , उन वाढू लागले तरी मुलांना त्याचा पत्ता नव्हता . वाड्याच्या गेटपाशी उभे राहुन एक अनोळखी मुलगा खुप वेळ हा त्यांचा खेळ टक लावुन बघत होता .

शेअर ब्रोकर्सची सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 06/02/2016 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. वर्गीस यांनी एका सार्वजनिक कंपनीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाला जोड म्हणून शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सुरवात केली. या व्यवहारात धोका गृहित असल्याने ते व त्यांची पत्नी मर्यादित रक्कम या व्यवहारात गुंतवण्याची काळजी घेत. परंतु "विनाश काले विपरीत बुद्धी " या न्यायाने मे. इंडिया बुल्स फ़िनान्शिअल सर्विसेसचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. चेरियन यांच्या सल्ल्याने भरीला पडून त्यानी म. टे .नि . लि. चे १०,००० शेअर्स प्रती शेअर रु. २१९/- या दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी इंडिया बुल्स कडून रु. २३/- लाखांचे कर्जही काढले.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)

लेखक Anand More यांनी शनिवार, 06/02/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो.

अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी

लेखक माहितगार यांनी शनिवार, 06/02/2016 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हवी तशी जमली नाही, इतरांनीही कविता करून कावळ्यांना न्याय द्यायला हरकत नाही, आम्ही आमच्या परीने पैजारबुवांच्या आवाहनाला खालील प्रमाणे दाद दिली आहे. अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, आम्हा कावळ्यांचा अन मानवी बायकांचा संबंधच काय तुमच्या बायांनी आम्हाला फुकाचं बदनाम केलं हाय अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुमच्याकडन हाय दंडाच येण आमच घर मेणाच का शेणाच तुम्हाला काय देण घेण अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुम्ही कर
काव्यरस