Skip to main content

गुजरान

लेखक हरिदास यांनी मंगळवार, 09/02/2016 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरान माझी होईल कशी गुजरान,कंठाशी आला प्राण कोण देईल आम्हाला दान,वणव्यात अडकल रान डोक्यावर कसले भार,कोणी देईना जीवा आधार फक्त उरल्या घटका चार,लांबला प्रवास फार चार घासांचे हे दुखणे,पोटात तिडिक उठणे काट्यावर सदैव निजणे,अश्रुंनी रातभर भिजणे धीर करुनी पसरीला हात,केविलवाणे बोल तोंडात लाज सुटली होती आघात,भीक मागतो माणसात कटोऱ्यात पडती नाणे,मुखात देवाजीचे गाणे असे जीवन लाजिरवाणे,श्वानापरी काय राहाणे पोटाला मिळे भाकर,साऱ्या जगाचा मी चाकर झोप नसते रात्रभर,श्वास माझे तुमचे आभार कुठल्या कर्माची ही शिक्षा,दारोदारी मागतो भिक्षा शरीराची होते रक्षा,मनास देई काही दीक्षा कप
काव्यरस

कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 09/02/2016 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

मिपात जरा ऊदासच वाटलं...

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 09/02/2016 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिपात जरा ऊदासच वाटलं लाटकरांची लाटी आणि जिलेबी नाही डांगे ह्यांचा स्कॉर्पियो चा प्रवास संपत नाही गुरुजींचा एक वर्ष पूर्तीचा धागा संपत नाही ट. का. चं लग्न जमल्याची बातमी नाही बरेच दिवसांत आस्तिक नास्तिक वाद नाही कोणाची छायाचित्र स्पर्धेतला पुरस्कार वापसी नाही दीपक कुवेतची पनीर रेसिपी नाही छ्या … पूर्वीचं मि .पा. आता राहिलं नाही मिपात आल्यावर जरा ऊदासच वाटलं

एका गावातिल बस - रुपक कथा

लेखक सुज्ञ यांनी मंगळवार, 09/02/2016 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाव होते , त्या गावात एक खुप मोठी बस होती. बस मधे वर जाण्यासाठी ( त्या गावातील बाकीच्या लोकांच्या दृष्टीने वर जाण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी म्हणा ) एक शिडी लावलेली असून अनेक लोक प्रयत्न करून ती शिडी चढुन बस मधे जागा मिळवत असत. अडचण ही होती की लुळ्या लोकांना ती शिडी चढ़ण्यास धडधाकट लोक मदत करण्याऐवजी कायम त्रास देत (गंमत ही होती की ते लुळे नसत फक्त धडधाकट लोकांनी त्यांना मानसिक दृष्ट्या तसे बनवले होते. आपल्याला वर जायला मिळावे म्हणून हो ! ही त्या धडधाकट लोकांनी चूकच) .

कुकुचकू - रुपये १२,०००/- फक्त !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 08/02/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी : ह्या बाईची एक मुलगी मुंबईत बांद्रा इथे राहते.

धर्मासाठी...........

लेखक एकप्रवासी यांनी सोमवार, 08/02/2016 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म जाणताना किती चुकामूक झाली धर्माच्याच नावे किती कत्तले पाहिली धर्मासाठी माणसा माणसात अंतरे माणुसकीच्या नात्यांची उरली वेशीवर लक्तरे धर्म सांगतो प्रेम घ्यावे वाटावे प्रेमाचीच दुनिया सारी मर्म त्याचे जाणावे महोत्सव धर्माचा भवती जरा थांबून पाहावे निसंकोचपणे त्यातून चांगले ते घ्यावे प्रेम वजा जगती अंती उरतेच काही तिमिरातून तेजाची मग वाट भेटत नाही
काव्यरस

लदाख सायकल ने : शो-कार मोड ते तंगलंग-ला (भाग १०)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी सोमवार, 08/02/2016 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
चीन ची सीमा रेषा पण इथून जास्त लांब नाही. त्यामुळे परमिट घ्यावेच लागतं. १५ ते २० मिनिट थांबून परत निघालो. येताना थोडासा उतार होता पण जाताना तोच थोडासा उतार थोडासा चढ झाला. रस्त्या मधेच गाढवांची झुंड पाहायला मिळाली. मी आल्यावर जोरात पळाले. आकाश्यात ढग होते. त्यामुळे खूप थंडी होती. साढे सात वाजता जेव्हा मी आपल्या ठीकाण्यावर पोहोचलो तर थंडीनं कापत होतो. जेवण करून गोधडीत घुसलो, तरी पण कापत होतो. इथली उंची ४६३० मीटर आहे. ह्याच्या पेक्षा जास्त उंचीवर झोपलो होतो तेव्हा थंडी वाजत नव्हती, आज काय झाले कुणास ठाऊक?

चिनाब रेल्वे पूल - भाग २

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 08/02/2016 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: लवकरच येत आहे - चिनाब रेल्वे पूल नावाचा चमत्कार काश्मीर रेल्वेच्या चिनाब पुलाबद्दल इथे पूर्वी लिहिलं होतं. नुकताच तिथे पुन्हा जाण्याचा योग आला. या पुलाचे काम अजूनही सुरू आहे. पुलाचे तीन पडाव (कृपया Span ला मराठी शब्द सुचवावा) टाकण्यात आले आहेत. तिथे पोचण्याचा रस्ता आधी कच्चा होता, तो आता पक्का करण्यात आला आहे. पण काश्मीर रेल्वे सुरू व्हायला अजून बरीच वर्षे लागतील असे कळले. कारण कटरा ते बनिहाल या सुमारे २०० किमीपैकी तीस किमीचे कंत्राटच अद्याप प्रलंबित आहे.

घायल, वन्स अगेन

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 08/02/2016 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
घायल. १९९० मधे आलेला राजकुमार संतोषी यांचा पिक्चर. बॉक्स ऑफिसवर सेकंड हायएस्ट ग्रॉसर. नायक - सनी देवल घायल वन्स अगेन. २०१६ मधे आलेला सनी देवल याचा पिक्चर. सनी देवल लिखित आणि सनी देवल दिग्दर्शित. सनी देवल. मूळ नाव अजय सिंग देवल. १९ ऑक्टोबर १९५७ चा जन्म; म्ह्णजेच आजमितीस वय ५८ वर्ष. १९८३ पासून हिंदी चित्रपटक्षेत्रात सक्रीय. प्रामुख्याने साहसपट, अ‍ॅक्शनपट यात काम. नावाजलेले चित्रपट - बेताब, त्रिदेव, अर्जुन, घायल, डर, दामिनी, जीत, घातक, बॉर्डर, मा तुझे सलाम, ज़िद्दी, गदर इत्यादी. हा माझा आवडता हीरो. आमचा; खरं तर. आमचा म्हणजे मी आणि माझा एक शाळेतला मित्र. आम्ही सनी देवल चे पंखे.

मेक इन इंडिया - इलेक्ट्रिक मोटारसायकल

लेखक मम्बाजी सर्वज्ञ यांनी सोमवार, 08/02/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
लहान पणा पासून इतिहासातली आणि शास्त्राच्या पुस्तकातली व्यक्तिचित्रे शिक्षकांनी कोळून पाजल्यामुळे असे होते कि त्यांच्या 'मोठे'पणाचा अर्क निघून जातो आणि 'अभ्यासू' मन फक्त त्यांनी लिहिलेले नियम आणि आकडे लक्षात ठेवायला लागते. अशा वेळी लक्षात राहतात ते स्वतः ला पटलेले, याची देहा याची डोळ्या पाहिलेले आणि महत्वाचे म्हणजे अगदी आपल्यासारखे वाटणारे, सामान्य माणसातले एक असणारे 'नमुने'. सेड्रिक लिंच - जन्म डिसेंबर १९५५, शिक्षण वयाच्या १२व्या वर्षी सोडून दिले. आवड/छंद : इलेक्ट्रिक/मेक्यानिकल मोटर्स.