Skip to main content

इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 16/02/2016 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले.

बेधुंद (भाग २ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी सोमवार, 15/02/2016 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षला ने त्याचा हात झटकला , आपले डोळ्यावर आलेले केस बाजूला करत ती बोलली - 'नको ना नितेश , प्लीज …. जसा हर्षला ने त्याचा हात झटकला , तस नितेशच मनही त्याला झटके देऊ लागले , अन त्या झटक्याने त्याला २ महिन्यापूर्वीची त्याची आयुष्याला कलाटणी देणारी घटनेत अडकवले . अन तो काही क्षणासाठी स्तब्ध झाला . साधारण दोन महिन्यापूर्वी : जवळपास एक वर्ष 'चोरून' सुरु असलेल 'त्याच अन हर्षला'च प्रेम प्रकरण आता 'जगजाहीर' झालं होत . काही गोष्टी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी लपत नाहीत !

प्रेम !!! ???

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 15/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण! आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो. मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते.

शृँगार २

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 15/02/2016 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत . पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा .

बोबींलचा वास

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/02/2016 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (या वेळी ब्लॉग म्हणून माझी एक कथा देत आहे. ‘रोखठोक’ 2015 च्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा.) निर्मलाबाई आणि सगुणाबाई या तश्या मैत्रिणी नव्हत्या. बालपणापासूनच्या माहितीतल्या- ओळखीतल्या नव्हत्या, म्हणून वर्गमैत्रीणीही नव्हत्या. दोन्हीही नोकरी करीत नसल्यामुळे कार्यालयातील सहकारी नव्हत्या. निर्मलाबाई आणि सगुणाबाई या दोन्ही आर्थिकदृष्य्या विचार करता वेगवेगळ्या वर्गातल्या होत्या.

'रोमा', अगदी जुने परदेशस्थ भारतवंशीय

लेखक माहितगार यांनी सोमवार, 15/02/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
पहीले परदेशस्थ भारतवंशी कोण ? हा तसा अद्यापही संशोधनाचा विषय असावा. जमिनीवरून आणि सागरी आशिया ते युरोप दोन-चार हजार वर्षापासून असावा -नेमका काळ हा आर्किऑलॉजी आणि इतिहास संशोधकांचा विषय आहे- ज्याला प्रेमळ चिनी लोक कदाचित सिल्करूट म्हणतात. हा व्यापार करणार्‍या समुदायात चिनी, अरब, उत्तर आफ्रीकन, मध्य आशियातील आणि युरोपिय सुद्धा अनेक व्यापार्‍यांचा या व्यापारात सहभाग राहीला असेल तर नवल नाही. पण हजार वर्षापुर्वीच्या काळात नेमके कोणते भारतीय बाहेर गेले असतील त्यांचे वंशज कुठे असतील हा इतिहास आजतरी माहित नाही.

मिपा सदस्यांना भेटण्याविषयी.

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 15/02/2016 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
सदस्य मित्र मैत्रिणींनो, मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो. मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच! मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल. मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते. सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का? मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो.

लदाख सायकल ने : मुलबेक ते शम्शा (भाग १६)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी सोमवार, 15/02/2016 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
मुलबेक मध्ये बुद्ध ची एक विशालकाय मूर्ति आहे जी मोठ्या दगडावर बनवली आहे. नसीब धर्मांतराच्या वेळेस लद्दाखी मुसलमानांनी याला सोडून दिलं. मुलबेक याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. गेस्ट हाउसला जाताना माझ्याच रस्त्यावर दिसली होती. विचार केला कि सकाळी निघताना बघू. आज ५९ किलोमीटर सायकल चालवली ज्या मध्ये दोन घाट फोतूला आणि नामिकला पण पार केले. दोघान मध्ये अंतर जास्त नव्हते. पण सायकल वरून ४१०० मीटर आणि ३८०० चे दोन घाट पार करणे म्हणजे चेष्टा नाही.

दिवस अठरावा

रोजच्या प्रमाणे आरामशीर उठलो.