Skip to main content

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

लेखक राघवेंद्र यांनी मंगळवार, 15/03/2016 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear) मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting) मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation) मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech) या वरील एखादे वाक्य तुम्हाला लागू होत नसेल तर पण लागू व्हावे असे वाटत असेल तर जगभरात या विषयावर एक संस्था कार्यरत आहे आणि तिचे नाव Toastmasters International. ही ना नफा - ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे.

काही अपूर्ण कविता....

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 14/03/2016 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला ना काही कळतच नाहीये काय करू त्या अर्धवट राहिलेल्या कवितांचं . . . आता हेच बघ ना त्या दिवशी माझ्या जवळून जाताना तुझ्या अोढणीचा झालेला तो निसटता स्पर्श.... कागदावर उतरवून तर घेतलाय पण पुढे काय करू त्याचं ?? काही कळतच नाहीये मला . . . आणि नविन कानातलं घालून एकदा मान किंचीत तिरपी करून आरश्यात पाहत होतीस तेव्हा, ते तुझं तसं बघणंही लिहून ठेवलंय मी माझ्या कवितेच्या वहीत... अगदी आरश्यातल्या तुझ्या सकट पण मग त्या मीटरमधे बसणारं काही सुचलंच नाहीये अजून पुढे त्यामुळे ती पण एक अपूर्ण राहिलीये सुचेल कधीतरी... कारण, तुझ्या पर्स मधे एक छोटासा आरसा असतो ना नेहमी ठाउक आहे मला! . . . आपलं भांडण झाल्यावर हक्
काव्यरस

जसजसे जगणे सुखासिन होत आहे..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 14/03/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
जसजसे जगणे सुखासिन होत आहे दु:ख अधिकाधीक नमकिन होत आहे सोसले मी जे,मला ना खंत त्याची पण पहा दुनिया उदासिन होत आहे केवढी शहरात आता शिस्त आहे बोलणे अपराध संगिन होत आहे घेतला आश्रय जिथे कोठे मिळाला देवही आता पराधिन होत आहे तू किती सांभाळ आता तावदाने ते पहा वादळ दिशाहिन होत आहे पांढरे काळे प्रतीदिन होत आहे अन तुझे भवितव्य रंगिन होत आहे डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

बोट - वादळवारा

लेखक स्वीट टॉकर यांनी सोमवार, 14/03/2016 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते? लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब. यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी). तसं ‘बोट’ म्हटलं की भूवासियांच्या मनात लगेच ‘वादळ’ हे येतंच. आणि त्यात चूक काहीच नाही. वादळाबद्दल उत्सुकता आणि भीती सगळ्यांना असतेच. आपल्या वाचण्यात येतं की आन्ध्र प्रदेशला किंवा बांगलादेशला चक्री वादळाचा तडाखा बसला. समुद्रकिनार्‍यापासून दीडशे कि.मी. पर्यंत हानी झाली. दीडशेच्या पुढे का नाही?

पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 14/03/2016 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
।। जय शिवराय ।। मित्र मैत्रिणीनो येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती. कट्ट्यावर: १. सर्वांचा संक्षिप्त परिचय २. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा ३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ ४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा ५. अनौपचारिक गप्पा ६. बालगंधर्व कलादालनास भेट कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया. आपला शांतीप्रिय भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.

माझे आजोळ

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 14/03/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जात असे. मामाचे गाव आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे आहे. मी, आई, ताई व लहान बहिण असे चाैघेजण प्रथम परभणीला मावशीकडे जात असू. तेथून मावशी व मावशीच्या ३ मुली, १ मुलगा असे ९ जण पुर्णा जंक्शनला रात्री मुक्कामाला जात. रात्री भुरटे चोर असल्यामुळे पाळीपाळीने एकेक जण जागत असू. पुर्णा येथून सकाळी ४ वाजता आदिलाबादला रेल्वे असे. रेल्वे कोळशावर चालणारी होती. रेल्वे नांदेड, मुखेड, किनवट मार्गे दुपारी २ वाजता आदिलाबादला पोहचे.

आर्ट ऑफ लिव्हिंग

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 14/03/2016 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : आणीबाणीची काळ : प्यायला उठलेला स्थळ : जागतिक खंड्या पक्षी पालक श्री श्री विजु भौ आपल्या भव्य राज प्रासादात चकरा मारताना विजु भौ : ए कोण आहे का रे तिकडे ???? इकडे आमचा ग्लास रिकामा झाला तरी कोणाच लक्ष नाही. खंड्या ग्लास भर माझा जरा, श्या आजकाल बियर पण गोड लागत नाहिये.... खंड्या : ओ बाबा ते नाही जमणार आता!!!! विजु भौ : (बुचकळ्यात पडून) का म्हणून ??? का म्हणून नाही जमणार, हाय रे दैवा काय आमच नशीब ज्यांना आम्ही मोठ करण्यासाठी दिवसाची रात्र करू खस्ता खाल्ल्या. जिथे पाण्याची बियर करून समस्त तहानलेल्या जनतेची तृष्णा भागवली ते हे दिवस पाहण्यासाठी. अरे हेच का ते अच्छे दिन.

मदत

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 14/03/2016 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
"देवा ते प्रेस नोट झाली का हो तयार?" "करतोय साहेब" "ती कॉन्फरन्सची पावती फाडा काय असल ती. पाकीटासहीत प्रेस्नोट देऊन टाका" "हो साहेब" "ते आपलं ल्याबराडार कुठं खपलंय? फोटोसहीत कव्हरेज पाह्यजे म्हणाव. नुसती हाडकं चघळाया पाय्जेत" "सांगतो साहेब" "ते फाउंडेशनचं काय लागतय का पत्ता?" "साहेब तेनी बीड ला हायत म्हणं कार्यक्रमाला" "बघावं का सांगून दादासाहबाकडून?" "नको साहेब, कव्हरेज तेनीच खातेत, आकडा बी आधीच द्यावा लागतो म्हण" "राव्ह दे राव्ह दे. आपन हाव हितं.

तुळशीबाग

लेखक Dinesh Satpute यांनी रविवार, 13/03/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांतीचे दिवस..रविवारचे दुपारचे जेवण झाल्यावर मस्त झोपण्याचा विचार सुरु असताना बायकोने आपल्याला जेवणानंतर तुळशीबागेत जायचे असल्याची घोषणा केली. उणेकरांसाठी (जगातुन पुणेकर वजा केल्यानंतर जे उरतात त्यांना मी उणेकर म्हणतो ) तुळशीबाग म्हणजे काय प्रकार आहे हे प्रथम सांगतो..तुळशीबाग हि काही फुलांची बाग नाही. तुळशीची रोपे सुद्धा येथे मिळत नाहीत...

सोपी खेकडा करी.

लेखक निशांत_खाडे यांनी रविवार, 13/03/2016 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आजची पाककृती आहे सहज आणि सोप्या पद्धतीची खेकडा करी.