Skip to main content

शब्द प्रेम!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 13/04/2016 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
लेखकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व: शब्द हेच शस्त्र, शब्द हेच अमूचे अस्त्र शब्द हेच युद्ध, शब्द हीच शांती शब्द हीच नीती, शब्द हीच अमुची मिती शब्द हेच कर्म, शब्द हेच फळ शब्द हेच दैवत, शब्द हेच अमुचे वैभव शब्द हीच दृष्टी, शब्द हीच सृष्टी शब्द हेच जग अमुचे, शब्द हेच जीवन अमुचे शब्द हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

-स

लेखक सुधीरन यांनी बुधवार, 13/04/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ओल्या केसांचा गंध करीत नाही मला धुंद- शॅम्पू का बरे लावतेस? तुझे डोळे तसे अगदी गहिरे वगैरे आहेत- लेन्सेस का वापरतेस? तुझ्या ओठांची लाली थोडी कडू बघ लागते- लिपस्टिक कसलं लावतेस? तुझ्या गोब-या गालांना कुस्करणं मला आवडतं- त्यांना क्रीम का फासतेस? कितीदा तुला सांगितले नटू नकोस उगाचच तू- अशीच मला आवडतेस!
काव्यरस

बळी

लेखक विजय पुरोहित यांनी बुधवार, 13/04/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
(अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील अगदी ग्रामीण भाग. एक छोटंसं शहर. सन 2016. गावापासून थोडंसं लांबच असलेलं एक उदासवाणं, काळोखं दिसणारं जुनाट पद्धतीचं घर.) दारावरची बेल वाजते. श्री. स्टीफन्सन जाऊन दार उघडतात. समोर एक हसतमुख, उमद्या व्यक्तिमत्वाचा डिलीव्हरी बॉय उभा आहे. तो त्यांच्या हातात तत्परतेने एक पार्सल देतो. श्री. स्टीफन्सन यांना अपेक्षित वस्तु पोहोचलेली आहे. त्याला पाहून ते मंदस्मित करतात. डिलीव्हरी बॉय पावतीवर त्यांची स्वाक्षरी घेतो आणि लगेच माघारी वळतो. लगोलग श्री. स्टीफन्सन घरात येतात आणि त्या वस्तूला लावलेली वेष्टणे अधीरपणे फाडून टाकतात.

चाहुली...(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न)

लेखक सुमित_सौन्देकर यांनी बुधवार, 13/04/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
काळजी वाटी मजला तुज्याच प्रीतीने-2 चाहुली दाटी भोवती तुझ्याच प्रीतीने-2 तुज्या वीन राहु कसा गीत हे गाऊ कसा स्वप्न हे पाहू कसा तुज्याच प्रीतीचे काळजी वाटी मजला तुज्याच प्रीतीने-2 चाहुली दाटी भोवती तुझ्याच प्रीतीने-2 भास सारे हे छळती भाव मजला न कळती साद का ऐकू येते सांग ना रे...... का कुठे मी हरवतो मीच मजला मिरवतो चाहुली का पुन्हा या सांग ना रे परतुनी ये तू ग पुन्हा... सांग वेडे माझा गुन्हा ये पुन्हा...तू प्रिये...वाट बघते ही मीठी... आज बेधुंद वारा साथीला गार गारा भान नाही मनाला साजणी ग... स्पर्श पुन्हा करुदे हात हाती धरुदे आज मिटूदे अबोला सजणी ग.... जिव माझा आतुरला ध्यान नाही माझे मला... ऐक

माझी पण मिपा सूक्ष्मकथा

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 13/04/2016 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी सगळे सूक्ष्म कथा टाकत असताना मी तरी का मागे राहावे म्हणून मी देखील एक सूक्ष्मकथा टाकत आहे. गोड मानून घ्या ही विनंती. -------------------------------------------------------------------- -- त्याने मिपावर प्रवेश केला.. मुख्य पान पाहिले, आणि "गमन" वर क्लिक करता झाला.. -- आले मोठी आमची बाजू घेणारे -- चपला पाहिल्या आणि त्याने तोंडाला कुलूपच लावले. -- आज काय टाकू? -- पुचुपुचु

शतशब्दकथा : दहशत!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 13/04/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्रीची वेळ .मित्राबरोबर दुकानाच्या पायरीवर गप्पा मारत बसलेलो. दुरूनच एक पांढरी स्कॉर्पिओ येताना दिसली."जरा जास्तच वेडीवाकडी चाललीये " मित्राला बोललो तोवर खाड ..माझ्या गाडीचा बंपर उखडून स्कॉर्पिओ पुढे गेलीसुद्धा.ताडकन उठून मित्राच्या बाईकला किक मारली आणि एकदोन चौक टाकून स्कॉर्पिओ गाठलीच. बाईक आडवी लावली आणि ड्रायव्हरला एकदोन शिव्या हासडल्या.तेव्हढ्यात मागची काच खाली झाली आतमध्ये एक दाढीवाला ,सफेद कपडे ,हातात,गळ्यात जाड चेन घालून ,तो पण फुल टाईट. "कोण रे? काय पायजे? " जरा फाटलीच .

वास्तुरचना

लेखक वैशाली अर्चिक यांनी बुधवार, 13/04/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टिव्हीवर एक मालिका चालू आहे. त्यातील एका प्रमुख पत्राच्या तोंडी सतत एक वाक्य दिले आहे “ परंपरेशी तडजोड नाही”. ह्या सीरिअलमध्ये आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक काही नियम,चालीरिती आखून दिल्या आहेत आणि त्या पाळणे किती गरजेचे आहे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत. गंमत म्हणून ती सीरिअल पाहताना जाणवले की, खरच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला होता. पण दुर्दैवानी त्या मागील शास्त्र आपण समजून न घेता परंपरेच्या नावाखाली आंधळेपणाने त्याला नको तो अर्थ देत आहोत. कॉलेजमध्ये असताना आम्हाला climatology किंवा ऋतुचक्र / हवामानाबद्दल लेक्चर्स असायची.

'सव्वा सहा' (लघू कथा)

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 13/04/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
डोळे चोळत चोळत उठलो, आज गजरच झाला नाही, की ऐकु आला नाही!? कदाचित टीवी बघता बघता हॉल मध्येच सॉफ्यावर आडवा झालो असेन, स्वतःशीच बडबड करत तब्बल अर्धा मिनिट सॉफ्यावर लोळत होतो, तेवढ्यात डोक्यात वीज चमकली >आज ओफ्फिसचा पहिला दिवस त्यात पावसाळा, ह्या पावसाळ्याच्या आईचा घो! नको तेव्हा नको तिथे धो-धो पडत असतो, मला त्याचीच काळजी जास्त, ताडकनी उठलो...

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.