Skip to main content

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग 1

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 25/12/2023 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच वर्षांपासून सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर पहावयाचे मनात होते. श्री.वल्ली यांचा लेख आल्यावर तर इच्छा अजूनच प्रबळ झाली होती. पण योग येत नव्हता. गेल्या बुधवारी मात्र हा योग जुळून आला. आमचे पारिवारिक मित्र सौ.व श्री. मुजावर यांच्यासोबत त्यांचीच गाडी घेऊन गोंदेश्वर आणि हरिश्चंद्र गड पहायचे ठरले. ठरल्याप्रमाणे पहाटे बरोबर साडे पाचला नव्या मुंबईतून प्रवास सुरु झाला. ठाणे, शहापूर, इगतपुरी मार्गे नऊ वाजता घोटीला पोहचलो. येथे उजवीकडे वळण घेत जुन्या मार्गाने सिन्नरला पोहचायचे होते. भूक लागली होती आणि सकाळच्या औषध गोळ्याही घ्यायची वेळ झाली होती .

लंडनमधील संग्रहालये (भाग १) - कुठे रहावे ?

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 20/12/2023 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, 'लंडनमधील संग्रहालये' असे शीर्षक जरी इथे दिलेले असले, तरी मला अजून लंडनला जायचे आहे. येत्या मार्च मधे आठ-दहा दिवस तिथे राहून बघितलेल्या संग्रहालयांबद्दल लिहावे, अशी इच्छा आहे. लंडनला प्रथमच जाणार असल्याने तिथली काहीच माहिती नाही. airbnb खोली घेऊन उभयतांनी मुक्काम करावा, असा बेत आहे. दररोज मेट्रो /बसचा प्रवास कमित कमी व्हावा, या दृष्टीने हुडकत असता कोणत्या भागातील घरे शोधावीत असा प्रश्न पडला आहे. यावर जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन केल्यास खूप मदत होईल. मला मुख्यतः कलासंग्रहालयेच बघायची आहेत.

मुझको ठंड लग रही है..

लेखक आजी यांनी मंगळवार, 19/12/2023 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजे थंडीचा. पावसाळा आणि उन्हाळा मला अजिबातच आवडत नाहीत. मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लोकलनं कामावर जाणं म्हणजे अग्निपरीक्षाच! पावसाच्या तपकिरी रंगाच्या गढूळ पाण्यात काय काय गलिच्छ वस्तू वाहात येतील आणि आपल्या पायाला स्पर्श करतील सांगता येत नाही. कुठं खड्डा असेल, कुठं सरळ रस्ता असेल.रस्त्याची सीमारेषा संपून कुठं गटार लागेल सांगता येत नाही. वाहत्या पाण्यात रस्ता अजिबात दिसत नसताना त्याचा अंदाज घेत चालणं महाकर्मकठीण काम. मला रस्त्यातल्या खड्याची एक महाभयानक आठवण आहे.

२०२३ : वैद्यकीय संशोधनाची झेप

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 18/12/2023 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
२०२३ ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षातील आधुनिक वैद्यकातील संशोधनाचा वार्षिक आढावा घेणारे हे सदर यंदापासून चालू करतोय. त्यात आपण वैद्यकाच्या काही महत्वाच्या क्षेत्रातील संशोधनांवर नजर टाकू. अशा विविध संशोधनांची ३ गटांमध्ये वर्गवारी करतो : • रोगनिदान पद्धती • रोगोपचार व प्रतिबंध • वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणे • रोगनिदान पद्धती १. कर्करोगाचे अत्यंत लवकरच्या अवस्थेत(शून्यावस्था) निदान झाल्यास त्यावरील उपचार प्रभावी ठरतात आणि रुग्णाचे आयुष्य सुसह्य होते. असे निदान करण्यासाठी सोप्या व सुटसुटीत चाचणीचा शोध गेली काही वर्षे चालू आहे.

सप्रेम द्या निरोप

लेखक शरद यांनी रविवार, 17/12/2023 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रहो, आता निरोप घ्यावयाची वेळ आली आहे.फार वर्षांपूर्वी येथे लिहावयास सुरवात केली आणि सुटलोच म्हणावयास पाहिजे.निरनिराळ्या विषयांवर मनसोक्त लिहले. याचे एक कारण म्हणजे मी जमा केलेली नाना विषयांवरची पुस्तके. त्यांत फार निवड होती असेही नाही. पण आपण वाचलेले जर आपणास आनंद देते ते इतरांनाही देईल या कल्पनेने त्यावर लिहले. सभासदांना आवडले असावे (ही एक मनाची गोड समजूत्)पण प्रत्येक गोष्टीला शेवट पाहिजेच नाही कां ? तेव्हा आंता लेखनाला पूर्णविराम. पण जातांना एक गोष्ट करावयाची इच्छा आहे. जमवलेली पुस्तके येथील मित्र-मैत्रिणींना सप्रेम भेट म्हणून द्यावित. यांत बरेच काही आहे.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 17/12/2023 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

वेगळा अनुभव देणारी एक गोष्ट!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 16/12/2023 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
✪ शारीरिक पातळीवर आई न होऊ शकण्याची वेदना ✪ घटस्फोट, ताण आणि सामाजिक चाको-या ✪ रक्तापलीकडच्या भावनिक नात्याची गुंफण ✪ डिप्रेशनमधून पुढे येणारी मुलगी- एक्स्प्रेशनची बॉस तेजश्री प्रधान ✪ बेस्ट सीईओ पण नापास बाबाचा प्रवास ✪ चाको-या मोडणारी "प्रेमाची गोष्ट" ✪ छोट्या "सईचा" अप्रतिम अभिनय नमस्कार. सामान्यपणे टीव्हीवरच्या मालिका म्हंटल्या की ठराविक मांडणी असते. त्याच त्या गोष्टी दाखवल्या जातात. क्वचितच काही उल्लेखनीय असं बघायला किंवा अनुभवायला मिळतं. पण सध्या असा एक अनुभव अनेकांनी घेतला येत असेल. स्टार प्रवाहवरची "प्रेमाची गोष्ट" मालिका!

पाहू

लेखक नाहिद नालबंद यांनी बुधवार, 13/12/2023 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू क्रोध, मत्सर, मद वगैरे षडरिपू टाळून पाहू पावतो बाप्पा म्हणे हा चल नवस बोलून पाहू बस जरा साथीस 'नाहिद' ही गझल गाऊन पाहू
काव्यरस

एक वाट पहाणे.

लेखक भागो यांनी बुधवार, 13/12/2023 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक वाट पहाणे. आज हॉस्पिटलचा दिवस. थोडी तयारी केली. एक जुनी फाईल शोधून जवळ घेतली. त्यात कुणा डॉक्टरच्या गिचमिडी हाताने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन होते. कसलीतरी टेस्ट करायची होती. का? डॉक्टरला काहीतरी संशय आला होता म्हणून. हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर त्याला कुणा स्वागतिकेला विचारायची गरज नव्हती त्याला सगळे प्रोसिजर माहित होते. लिफ्ट पकडून तो ज्या मजल्यावर जायचे होते तेथे गेला. काऊंटरवर जाऊन पैसे भरले. फी दणदणीत होती. रोग होताच तसा. काऊंटरवालीने सांगितले, “ह्या रूममध्ये जाऊन थांबा.” एकूण चार तास वाट पहावी लागेल म्हणाली. पाण्याची बाटली आणली आहे?” “हो ही काय.” “छान. वाट पहा.