Skip to main content

बचपन के दिल भुला न देना . २

लेखक शान्तिप्रिय यांनी गुरुवार, 21/04/2016 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
बचपन के दिन भुला न देना ......१ मागील भागात प्राथमिक शाळेतील बालपणीच्या आठवणी झाल्या. आता त्यानंतरचा भाग खेळत बागडत प्राथमिक शाळेची ४ वर्षे कशी गेली ते समजलेच नाही. आणि मग एक दुसरे पर्व म्हणजेच ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात माध्यमिक शाळेचे दिवस सुरु झाले. वस्तुत: आमच्या आधीच्या शाळेत ही ५ वी ते ७वी ची सोय होती पण मोठ्या शाळेचे आकर्षण म्हणुन मी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी आधीची शाळा सोडू नका म्हणुन तेथील शिक्षकांनी खूप विनवण्या केल्या.

येते आठवण अधून -मधून ....

लेखक अविनाश लोंढे. यांनी गुरुवार, 21/04/2016 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
येते आठवण अधून -मधून , पहिल्या भेटीची , तहानलेल्या स्पर्शाची , तुझ्या नाजूक हातांची , अन त्यावर कोरलेल्या स्वप्नांची … येते आठवण अधून -मधून , पहिल्या चुंबनाची , निसटलेल्या ओठांची , तुझ्या डोळ्यातील आसवांची , अन एकाचवेळी बघितलेल्या चंद्राची ….
काव्यरस

बेधुंद (भाग ४ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी गुरुवार, 21/04/2016 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
बेधुंद (भाग ४ ) : (बऱ्याच दिवसाने लिहितोय, कामाचा व्याप जरा जास्त वाढलाय - टायपिंगच्या चुका पोटात घ्या :P ) मार्च २००६ : चौघही विद्यापीठाच्या मुख्य गेट समोर बाहेर आली . रस्त्यावर मिळेल त्या गाडीची वाट बघत उभी राहिली . गेट च्या बाहेर वडापाव , मिसळ , भेळ , चहा इ . चे गाडे लागले होते . बऱ्याच विद्यार्थ्यांची वर्दळ होती , परीक्षेची वेळ असल्याने काही 'हुशार' विद्यार्थी हातामध्ये 'नोटस' घेऊन 'खाता -खाता' वाचत होते . चंद्यानेही हातामध्ये 'नोटस' आणल्या होत्या , तोही 'टोपर्स' पैकी एक होता . काही वेळाने एक वाळूचा ट्रक उभा राहिला अन ते सगळे मागे बसले .

मी अश्व!!

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 21/04/2016 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

वेगानी पसार

लेखक सुजल यांनी गुरुवार, 21/04/2016 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
"नारिता" एयरपोर्ट वर एजंट माझ्या नावाची पाटी घेऊनच उभा होता त्यामुळे त्याला ओळखण सोप्प गेल. मी त्याला माझी ओळख पटवून दिली आणि "तुडतुड्या" चालीने त्याने माझ्या ब्यागा उचलल्या आणि पूर्णपणे आम्ही एयरपोर्ट च्या बाहेर. ताबडतोब त्याने योकोहामा पोर्ट ला जायला ट्याक्सी बुक केली आणि पाच मिनिटात ट्याक्सी हजर. पटापटा त्याने ट्याक्सीत सामान ठेवलं आणि ट्याक्सीचा पुढचा दरवाजा उघडून माझ्या स्वागतार्थ वाकून वाकून त्यांच्या पद्धतीने नमस्कार केला.मला तर पूर्ण पणे गडबडायला झाल. तो इतका वाकून वाकून मला नमस्कार करत होता तर आता आपण पण त्याच्या समोर असाच वाकून वाकूनच नमस्कार करायचा का?

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १७: रस्ता: मतदान

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 21/04/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धकांबरोबर त्यांना प्रोत्साहन देणार्‍या सर्वांचेच विशेष आभार. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ३० तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे. क्र.

असा ही एक क्लायंट

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी बुधवार, 20/04/2016 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. बारा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा कॉलेजला प्रवेश घेतला, D.C.A. केलं. वर्गामधली मुलं मुली मला आंटी म्हणायचे! नवीन शिक्षण संपल्यावर डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला. कोणत्याही नवीन उद्योगाप्रमाणेच हा देखील पडंत, धडपडंत, टक्केटोणपे खात, पुस्तकांपेक्षाही जास्त परिस्थितीकडून आणि गिर्‍हाइकांकडून शिकत शेवटी स्थिरावला. प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक ठरलेली त्रिज्या असते.

पूर्णान्न अप्पे (अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा प्रथम पारितोषिक विजेती पाककृती)

लेखक पूर्वाविवेक यांनी बुधवार, 20/04/2016 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
खरतरं 'वन डिश मील' यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या जास्त योग्य समजते. विविध भाज्या, वेगवेगळ्या डाळी तसेच कधी दलीया तर कधी ओटस वापरून मी खिचड्या करते. पण हि स्पर्धा आहे आणि काहीतरी नाविन्यपूर्ण हवा. असंही बऱ्याचदा माझ्याकडे अप्पे असतातच. कमी वेळात आणि कमी तेलात होणारा हा पोटभरीचा प्रकार, माझ्या घरात खूपच प्रिय आहे. एकच पदार्थ करायचा तर तो पूर्णान्न हवा. कर्बोदके, प्रथिने खनिजे इत्यादी गोष्टींचा समतोल असणारा हवा. मुख्यत: रात्रीच्या जेवणासाठी आपण 'वन डिश मील' चा पर्याय स्वीकारतो. त्यामुळे हा पदार्थ फारसा कटकटीचा नको. माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे पौष्टीकते बरोबर चटपटीतही हवा.

प्रकाशन व्यवसाय - व्यवसायातील तंत्र आणि मंत्र (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक भुमी यांनी बुधवार, 20/04/2016 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
Header  सर्व वाचकांना पुस्तकदिनाच्या शुभेच्छा! पुर्वीच्या काळी पोथ्या ,पुस्तके तयार करण्यासाठी लिथोग्राफी तंत्राचा वापर करत असत. हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम असे .तसेच कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक असे.

सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

लेखक मार्गी यांनी बुधवार, 20/04/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.