Skip to main content

मिल्क एण्ड कुकिज! (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक इडली डोसा यांनी सोमवार, 25/04/2016 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
Header मिल्क एण्ड कुकीजचा आणि पुस्तकांचा काय बरं संबंध ? वर वर बघता काही संबंध नाही पण आमच्या गावातल्या वाचनालयात हा उपक्रम आहे. वयोगट ३ ते ६ वर्षाच्या मुलांना आठवड्यातून एकदा संध्याकाळी वाचनालयात घेऊन जायचं. आपलं काम म्हणजे फक्त मुलाची त्या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करणे आणि नेमून दिलेल्या वेळात आपल्या मुलाला तिथे घेऊन जाणे.

पाठलाग करणारे पुस्तक (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक पिशी अबोली यांनी सोमवार, 25/04/2016 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header पुस्तक दिनाचा विषय निघाला आणि मला एक पुस्तक परिचय तरी लिहावासा वाटू लागला. कोणत्या पुस्तकावर लिहावं असा विचार करताना सतत एकच पुस्तक समोर दिसू लागलं, ते म्हणजे मारा अँड डॅन. आता यात गोम अशी होती की मी हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेलं असल्याने तपशील काहीच आठवत नव्हते. पण अगदी मनापासून तर त्यावरच लिहावंसं वाटत होतं. मग पुस्तकशोध सुरू झाला.

सैली - १३ सप्टेंबर (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 25/04/2016 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
Header मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाची फार मोठी परंपरा आहे. व्यंकटेश माडगूळकरांची 'माणदेशी माणसं', जयवंत दळवींचं 'सारे प्रवासी घडीचे', ग्रेस, सुरेश भटांसारख्यांचं वेधक वित्रण असणारं मधुकर केच्यांचं 'विदर्भातली माणसं', अनेकांचं खुल्लमखुला वस्त्रहरण करणारं दुर्गाबाईंचं 'जसे आठवते तसे' ही चटकन आठवणारी नावं!

आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 25/04/2016 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही?

झाडीबोली गझल - " बदल "

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 25/04/2016 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
किती कोसावर कोनाची कहानी बदलते नदी वाह्यत जाते सयरात पानी बदलते कई बदलन का रस्ता आपला वैनगंगा? बदलते चुलबन, चन्दन अन् कठानी बदलते तुयी ताकत काउन त्याच्या गुलामीत जाते? इस्यारा कर तू बाप्पू, राजधानी बदलते उधारीची जिनगी जगला तई थो समजला उधारीच्या जिनगीवर का जवानी बदलते? इस्यारा समजन का थो पारधी, जंगलाचा? निस्याना हुकला होता, थो मचानी बदलते * कई = कधी * थो = तो * चंदन, कठानी आणि चुलबन(चुलबंद) ह्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. बाकी सगळे सोपे आहेच.

तेव्हा मला तू फार फार आवडतेस...!

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 24/04/2016 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं म्हणणं.. मी तुम्हाला मुळीच आवडत नाही.. अन माझा मुद्दा.. तु मला कधी आवडत नाहीस ते सांग..! बोलताना असे बोलुन गेलो.. तु जशी घरात आवडतेस.. तशी तू प्रवासातही आवडतेस..! ती मग अडुनच बसली...

बेधुंद (भाग ५ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी रविवार, 24/04/2016 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
बेधुंद (भाग ५ ) 'सुऱ्याने' केलेल्या तक्रारीने विद्यापीठाचे सगळे वातावरण तापले .सगळीकडे उदासी पसरली होती . सेनिअर्स जुनिअर्स कडे बघेनासे पण झाले ! ' फर्स्ट एअर ' मधेच तीन प्रकारचे ग्रुप बनले .पहिला - जो सुऱ्या ला तक्रार मागे घ्यायला सांगत होता , दुसरा - जे नित्या अन सुऱ्या च्या बाजूने होते अन तिसरा - जे कोणाच्याच बाजूने नव्हते . रेक्टर ने 'अजीत' ला एका आठवड्याची मुदत दिली होती , की जर सुऱ्या ने तक्रार मागे घेतली नाही तर अजित ला कॉलेज मधून काढलं जाईल ! अन ताकीद दिली कि जर नित्या किंवा सुऱ्या ला कोणी काही केले तर सरळ त्याच दिवशी त्याला काढून टाकले जाईल . सिनिअर्स ने लगेच सभा बोलावली .

बीज

लेखक gsjendra यांनी रविवार, 24/04/2016 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या बीजाला अंकूरायचे असते प्रसवायचे असते ते पाहत नाही तापमान किती डिग्री हवेत आर्द्रता किती पावसाची काही शक्यता वा मातीचा ओलसरपणा ते मातीत ढेकळात खडकाच्या फटीत इवल्या पालवीने उभारते अस्तित्वाची दखल आपल्या जगाला घ्यायला लावते भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह
काव्यरस

नाटक - कुछ मिठा हो जाये

लेखक वेल यांनी रविवार, 24/04/2016 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
तसं बर्‍याच दिवसांनी नाटक पाहायला गेले होते. खरं तर मी नाटक सिनेमा कितीही पाहिले तरी त्याबद्दल फारसं लिहित नाही, पण ह्या नाटकाबद्दल जरा खासच वाटतय म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावं. "कुछ मिठा हो जाये" ह्या नाटकाने सुरुवात एका अभिनव जाहिरातीने केली. नाटकांच्या आणि सिनेमांच्या जाहिरातीत नेहमी अभिनेत्यांचे फोटो असतात पण ह्या नाटकाच्या पहिल्या काही जाहिरातींमध्ये त्यांनी नाटकाच्या लेखकांचे फोटो छापले. आणि ह्या संकल्पनेचं श्रेय निर्मात्याचं. निर्माता संतोष घाणेकर आणि सहनिर्माती मोनिका धारणकर ह्यांचे समस्त लेखक मंडळींकडून आभार. त्यांनी लेखकांचा चेहरा पुढे आणला.

निमगाव केतकी : ५०-७० वर्षापासूनचा “पान-बाजार”

लेखक १००मित्र यांनी रविवार, 24/04/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
जगप्रसिद्ध “पूना” पानाचे माहेरघर तुम्ही जर पानाचे शौकीन असाल, तर कलकत्ता,मघई,बनारस ह्याप्रमाणे पूना पानही खूप प्रसिद्ध आहे-होते.मला लहानपणी आठवतं की मी वडिलांनी “जारे पानपट्टी वरून सगळ्यांना पानं घेऊन ये” म्हटलं की “पूना मसाला” च घेऊन यायचो.आताही मी पान खातो, पण कलकत्ता किंवा तत्सम.