Skip to main content

सैराट : माझीही एक भर

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 07/05/2016 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा सैराटचा रिव्ह्यू नाही. या सिनेम्यामुळे आलेले मनातले असंबद्ध विचार तितक्याच असंबद्ध रितीने मांडायचा प्रयत्न समजा. असंबद्ध का तर.. सिनेमाबद्दल लिहायचं तर त्यातले कुठलेही कोर्सेस केलेले नाहीत. स्वयंपाक जमत नाही पण खायला जमतं, त्यामुळे मीठ मसाला कमी जास्त झालाय हे कळतं त्याच कुवतीने सिनेमाबद्दल लिहीणार आहे. सिनेमाबद्दल लिहीलं की सिनेक्षेत्राशी संबंधित काही जण अगदी वेड्यात काढत असतात. खरं म्हणजे इतकी वर्षे सिनेमा पाहत आल्यावर समोर जे दिसतं त्याबद्दल आपणही बोलावं असं वाटतंच की. पण त्या त्या व्यक्तीचा त्या क्षेत्रातला अधिकार मान्य असतो.

दुष्काळ निर्मुलनासाठी ग्राम स्वराज्य अभियानचा खारीचा वाटा व आवाहन

लेखक विशाल चंदाले यांनी शुक्रवार, 06/05/2016 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, सध्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. मराठवाड्यात तर फार विदारक परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. यावर काही करावं म्हणून ग्राम स्वराज्य अभियान टीम चे दुष्काळावर आणि एकंदरीतच जल/मृदा संधारणावर कामे करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या दोन ते अडीच वर्ष्यापासून लोकसहभागातून बोरवंड, परभणी येथे काम सुरु आहे. ग्राम स्वराज्य अभियान टीमने गावकऱ्यांना ग्रामसभेचं महत्त्व पटवून देऊन सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला चांगलंच यश मिळालं. आता गावात दर महिन्याला ग्रामसभा होते आणि गावासाठीचा प्रत्येक निर्णय हा ग्रामसभेत घेतला जातो.

..तुला पाहण्याचा मला छंद राणी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 06/05/2016 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
..तुला पाहण्याचा मला छंद राणी.. दिव्यांना नको तू करु मंद राणी तुला पाहण्याचा मला छंद राणी पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी मला घे मिठीच्याच कैदेत आणि नको गे करु तू खुले बंध राणी तुला मी मला तू असे प्राशवावे.. पुरी रात व्हावी मधू धुंद राणी.. तुला लागला सावळा रंग माझा तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी - कानडाऊ योगेशु

आधी सोसायचे ,मग हासायचे

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 06/05/2016 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
आधी सोसायचे ,मग हासायचे आधी रुजायचे, मग फुलायचे स्वप्न पेरायचे, अश्रू वेचायचे अश्रू पाजायचे, स्वप्न पोसायचे खेळ मांडायचे, जरी मोडायचे मांडणे-मोडणे, एक मानायचे तारे माळायचे, नभ नेसायचे आपलेच रूप, मग बघायचे वाट चालायचे, तुला शोधायचे स्वत्तःला हळूच , मागे सोडायचे

बेधुंद (भाग ९ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी शुक्रवार, 06/05/2016 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षा जवळ आल्याने अक्षाने 'शिवेकाला' भेटायचे अन अमित चे फोन उचलायचे सोडून दिले ! तसाही काहीही फायदा नव्हता ! त्याच काळात 'MPSC' चा निकाल लागला होता . त्याच्याच जिल्ह्यातील त्याचा एक M.Tech करणारा सिनिअर - सचिन MPSC परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाला होता , वर्ग- २ ची 'पोस्ट' मिळाली तरी त्याचे काही वाईट वाटत नव्हते . त्याचबरोबर M.Sc चे विद्यार्थी ढिगाने पास झाले होते . काहीजण उपजिल्हाधिकारी ,काहीजण मुख्याधिकारी तर काहीजण जिल्हा पोलिस अधिक्षक ! M.Tech करणाऱ्या ११ पैकी ७ जन पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले होते . विद्यापीठात नुसता धिंगाणा होता !

आप की आखों में कुछ .......!

लेखक १००मित्र यांनी शुक्रवार, 06/05/2016 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
आप की आखों में कुछ मेहेके हुएसे राज हैं आप से भी खूबसूरत आप के अंदाज हैं ! काय म्हणावं यार ह्या गाण्याबद्दल ! रेखाला सुरेख म्हणावं , कि विनोद मेहराला ! चित्रीकरणाची तारीफ करावी , की आर डी सारख्या संगीतकाराची ! किशोरच्या सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ ,उमद्या तरीही भाऊक अशा अस्सल मर्दानी आवाजाची तारीफ करावी कि लता बाईंच्या स्वर्गीय पण लाडिक (तशी त्यांची अशी लाडिक गाणी कमी आहेत) आवाजाची !

भारतीय भौगोलीक अवकाशी माहिती (नकाशां) प्रसारणांवर अतीकडक निर्बंधाचा कायदा येताना

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 06/05/2016 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने भारतीय भौगोलीक अवकाशी माहिती (नकाशां) प्रसारणांवर अतीकडक निर्बंध घालण्याच्या उद्देशाने The Geospatial Information Regulation Bill, 2016 हा मसुदा विचारार्थ (पिडीएफ) ठेवला असून jsis@nic.in या इमेल पत्त्यावर ३० दिवसांचे आत फिडबॅक मागवला आहे. वृत्तपत्रांनी बातम्यांमध्ये मुख्यत्वे गूगल मॅपची चर्चा केली असली तरीही कायद्याचा मसुदा अभ्यासल्यास कायदा अत्यंत व्यापक स्वरुपाचा असून कळत नकळत प्रसारीत केलेल्या भारत विषयक बहुतांश सचित्र भौगोलीक माहितीस

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) - फोटो - हाइड पार्क

लेखक मेघना मन्दार यांनी गुरुवार, 05/05/2016 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
हे फोटो Hyde park चे आहेत आणि एक फोटो Marble Arch चा आहे. आज इतकेच फोटो टाकता आले त्याबद्दल मी दिलगीर आहे. याच्या पुढच्या भागात आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व भागातील फोटो टाकेन. आणि त्यानंतर क्रमाक्रमाने फोटो टाकत राहीन. पुन्हा एकदा फोटो उशिरा टाकल्याबद्दल मी आपली दिलगीर आहे. तुम्ही सर्वांनी फोटो संदर्भात केलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. फोटो मोबाईल वरून काढले आहेत त्यामुळे clarity म्हणावी तितकी चांगली नाही तरी हे गोड मानून घ्यावे हि विनंती :) लौकरच पुढचे भाग आणि फोटो सुद्धा टाकेन.

'सह'ज जमेल

लेखक उल्का यांनी गुरुवार, 05/05/2016 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना - मनातलं ब्लॉग्वर लिहायला लागले तेव्हा दोन महिन्यांपूर्वी हे दोन लेख लिहिले. लेखाचा सूर उपदेशात्मक आहे हे मान्य! पण ते माझे विचार मंथन आहे. सद्य परिस्थितीत काही खटकणार्या गोष्टींमुळे/वागण्यामुळे मनात आलेले विचार लिहिले आहेत म्हणुन तसा सुर त्या तमाम लोकाना उद्देशून आहे. कदाचित तुम्हालाही ह्या गोष्टी खटकत असतील असे वाटले म्हणुन तुमच्या बरोबर शेअर करते आहे. आणि म्हणुनच हे 'जनातलं मनातलं' ह्या सदराखाली लिहित आहे. :) पहिला लेख - सहज जमेल असे Kevin Abosch हा एक आइरिश फोटोग्राफर आहे. सध्या त्याचा २०१० सालचा एक फोटो चर्चेत आला आहे. फोटोचे मॉडेल आहे एक बटाटा!

आता वाटली ना काळजी ?

लेखक श्वेताली कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/05/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले , त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते .. ती ऑफिसला पोहचली आणि त्याचा मेसेज आला, "reached n u ? " ती त्याला उत्तर देत होती तोच तिला client call आला त्यात ती बिझी झाली , मेसेज करायला विसरली .