Skip to main content

बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/05/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी "त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.'' बालगंधर्व.... भाग - १ पहिला... बालगंधर्व....

एक संघ मैदानातला - भाग ८

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 12/05/2016 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उशिरा उशिरा म्हणतानासुद्धा ८ ला जाग आली. अजून एवढेचं वाजतायत म्हणजे काकांना निघायला अजून २ तास आहेत. मी परत पांघरुणात डोक खुपसलं. ते आईने पाहिलं आणि मला उठवलं. मी तिला खुणेने गप्प बस सांगायचा प्रयत्न करत असताना बेडरूममध्ये काका शिरले आणि मोठ्या आवाजात मला उठवायला लागले. आता काही इलाजच नव्हता. गपचूप उठून बसले. तोंड धुवून चहा घेईपर्यंत शांतपणे ते पेपर वाचत होते. माझा चहा पिउन झाल्याबरोबर मला हाक मारून मला समोर बसायला लावले. मला वाटलं झालं आता हे लग्नाचा वैगरे विषय काढणार पण त्यांनी तस केल नाही. त्यांनी त्यांच्या कुळाची माहिती द्यायला सुरुवात केली आणि मग हळूहळू गाडी सतीशकडे वळवली.

“पता नहीं. कुछ हो रहा हैं अन्दर...”

लेखक पथिक यांनी गुरुवार, 12/05/2016 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
अकोल्याला (माझं शहर) आलो कि मी नं चुकता शहरातल्या त्या भागात फिरायला जातो जिकडे शहरातले मोठे मार्केट, भाजी बाजार आणि बरीच दाट वस्ती आहे. हिंदू, मुसलमान, सिंधी, मारवाडी असे प्रामुख्याने काही ना काही व्यवसाय करणारे लोक तिकडे राहतात. तिकडली दाटीवाटीने उभी असलेली दुकानं, होटेलं, लोकांची गर्दी, गोंगाट, खरेदी-विक्रीची, जाणाऱ्या-येणाऱ्यांची गडबड, ई सगळं फिरून फिरून, त्या गर्दीत मिसळून पाहायला फार आवडतं मला.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 12/05/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका मागच्या लेखात आपण बघितलं की, निसर्गाच्या नियमानुसार सर्व सृष्टी चालते. त्याची एक व्यवस्था असते. जर ह्या व्यवस्थेवर ताण पडला, तर निसर्गही बदलतो. जसं गुरुत्वाकर्षण हा एक नियम आहे. जर आपण वाकडे तिकडे चाललो तर आपण ह्या नियमामुळेच पडतो. त्याच प्रकारे आपण आणि निसर्ग ह्यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

व्यक्तिगतता नी व्यावसायिकतेचे नाते

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 12/05/2016 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा सदस्या अतिवास यांचे यशस्वी माघार हे रोचक अनुभवकथन वाचनात आले. त्या लेखात त्यांनी त्यांचे विवीध व्यक्तिगत दृष्टिकोण मांडले आहेत त्यातल्या एका दृष्टीकोणाने विशेषत्वाने लक्ष वेधले.
...'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे....

बालगंधर्व.... भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 12/05/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनानिमीत्त बालगंधर्वावरील हा लेख लिहिण्यास घेतला होता. उशीर झाला आहे मान्य ! यातील माहिती बर्‍याच जणांना माहीत असेलच पण मी लिहिले कारण मला या भारी माणसाला आदरांजली वहायची होती... लागोपाठ येणार्‍या माझ्या लिखाणाला तुम्ही सहन कराल अशी आशा आहे. यानंतर मात्र लगेच लेख टाकणार नाही याची खात्री बाळगा.... खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी "त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.'' बालगंधर्व....

अळवावरचे पाणी (नागपूर डायरी)

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 12/05/2016 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधी अरिझोना, नंतर पूर्व अमेरिका आणि कॅनडामध्ये थंडीत दोन महिने कुडकुडलो. मग एकदम पलटी खाऊन नागपूर नावाच्या धगधगत्या भट्टीत दाखल झालो. नुसतेच दाखल व्हायला नाही, तर चक्क काही महिने मुक्काम ठोकायला! नागपूर! माझे जन्मगाव! लहानपणी खेळताना गुढगे खरचटल्यानंतर इथल्याच धुळीचे त्यावर लेप चढले होते. इथल्याच उन्हाच्या पोळणाऱ्या झळांनी मला घडविले असेल! आज पंचेचाळीस वर्षांनंतर देखील काही फारसे बदलेले नाही! लहानपणी विनयकाका नेहमी “नागपूर म्हणजे एक मोठे खेडे आहे” असे म्हणत. ह्या खेडेगावच्या मानसिकतेला कंटाळून ते नागपूर सोडून मुम्बईला गेले होते. आता खूप बदलले आहे सगळे. मोठाले मॉल आहेत. पॉश रेस्तरॉं आहेत.

पहायचं होत ग तुला एक नजर...!!!

लेखक kunal lade यांनी बुधवार, 11/05/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या भावाच्या लग्नात हे घडल होत....!!!!! पहायचं होत ग तुला एक नजर त्यासाठीच आलो होतो उन्हात फरफटत पण नशीब खोट नाही होता आल हजर.... म्हणून परत तुझ्या घरी आलो पण तू निघालीसाच नाही बाहेर.... म्हणून मित्रांच्या घोळक्यात पुन्हा शिरलो आणि तुझा भाऊ आला समोर.... म्हंटल परत करावा प्रयत्न म्हणून पोट भारलेल असताना देखील मुद्दाम पंगतीत घुसलो आणि जेवण संपल पाहून स्वतावरच हासत बसलो.... पहायचं होत ग तुला एक नजर पण नाहीच ग पाहता आल मग शेवटी काय गेलो बारवर मारली चार बिअर आणि झोपलो ढाराढूर....!!!!.
काव्यरस

माझा पहिला परदेश प्रवास - (लंडन) भाग 5

लेखक मेघना मन्दार यांनी बुधवार, 11/05/2016 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पाचवा हा भाग टाकायला जरा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व !! हा भाग जरा जास्तच मोठा झाला आहे पण फोटो सुद्धा खूप आहेत आणि एका दिवसात खूप फिरणं झालेलं असल्यामुळे शक्यतो एकाच भागात सर्व लिहिण्याचा प्रयत्न होता. पुढच्या भागांची लांबी एवढी असणार नाही याची काळजी घेईन. आज मी Hyde पार्क चालत फिरायला नाही गेले. दिवसभर एकतर चालणं खूप होत होतं. त्यामुळे सकाळी १ ते दीड तास चालून पुन्हा फिरायला बाहेर पडल्यामुळे जास्त दमायला होत होतं म्हणून ठरवलं की आता रोज Hyde पार्कला नाही जायचं. आज सुद्धा बाहेर ढगाळ वातावरण होतं. सकाळी थोडा पाऊस पडून गेला होता त्यामुळे बाहेर जरा जास्तीच थंड होतं.

सैराट - काव्यांजली

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 11/05/2016 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
==================================== "सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा.... °°°° झुडपात जाऊन तोंडाला लय फासलाय साबण चाललू हिरीत मुटका मारायला तर आरची म्हणली " हु म्हागं" - लंगडा प्रदीप °°°°°° केळीच्या बागा तुडवून पाय दुखतात सारखे आसं काय करती येड्यावणी "घरची उठत्याल की आरचे" - परश्या ================================== "सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !!