Skip to main content

बेवजह

लेखक भरत्_पलुसकर यांनी रविवार, 22/05/2016 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका मित्रान हे गाणं पाठवलं. पहिल्यांदा वाटलं काहीतरी रॉक ढिन्कच्याक असेल. पण आश्चर्याचा धक्का बसला. पूर्ण गाणं ऐकून झालं तेव्हा तर अगदी शांत वाटतं होतं. मग हेच गाणं लूप मधे सुरू आहे सध्या. पहिल्यांदा सगळ्याच शब्दांचे अर्थ नाही कळले. पण जे ऐकतोय ते काहीतरी भारीये एवढ कळत होतं. गाण्याचा पहिलाच शब्द हिज्र ए यारा हाच कितीतरी वेळ कळत नव्हता. पण त्याने गाण्याची मजा काहीच कमी नाही झाली. शेवटी रेखतावर त्याचा अर्थ सापडला. प्रिय व्यक्तीपासून दुरावा. म्हणजे मला वाटत होतं की हे गाणं प्रिय व्यक्तीला उद्देशून आहे पण हा तर पठ्ठा त्या दुराव्यालाच उद्देशून गाणं म्हणतोय! अगदी साधीशी गोष्ट.

निषेध!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 22/05/2016 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच सुचत नसेल तर खुशाल कविता लिहायला घ्या.. कवितेला नसतं विषयाचं बंधन पण, पण म्हणून काहीही लिहायचं का? असल्या कवितांचा मी निषेध करतो - जव्हेरगंज

उप संपादकाची व्यथा- असत्यं वद धनं चर

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 22/05/2016 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९८५ची गोष्ट असेल. नागपूरहून दिल्लीला परत येत होतो. गुप्ता (टोपणनाव) नावाच्या एका इसमाशी परिचय झाला. २७-२८ एक वर्षाचे वय असेल, माझ्या वयापेक्षा थोडे जास्त. लवकरच आमची गट्टी जमली. तो धंद्याच्या कामानिमित्त दिल्लीला चालला होता. त्याने पत्रकारिताचा अभ्यास केला होता. विदर्भात एका हिंदी वर्तमानपत्रात काही महिने त्याने उपसंपादक या पदावर काम केले होते. परंतु त्याला ती नौकरी सोडावी लागली. मी त्याचे कारण विचारले. तो म्हणाला सत्यं वद धर्मम चर असे शास्त्रात म्हंटले आहे, पण असत्यं वद, धनं चर असे कुठेच म्हंटलेल नाही. शास्त्र नियमांचे पालन केले, त्याचेच परिणाम भोगावे लागले.

सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 22/05/2016 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी - भाग २ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु --- एक झोकदार वळण घेउन बस गढीच्या मुख्य दारापाशी येउन थांबली . बाहेरुन दिसणारी गढीची भव्य तटबंदी पाहुन सर्व प्रवाशांची उत्सुकता चाळवली गेली . गढीचा मुख्य दरवाजाही चांगलाच भव्य , बुलंद दिसत होता . "चला मंडळी . आपले मुक्कामाचे ठिकाण आले . सरदार दिठेरीकरांची गढी ." कारेकरांनी सुचना दिली . सर्व प्रवासी लगबगीने खाली उतरले .

चालवायचंच म्हटलं तर...

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 21/05/2016 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर सगळंच चालवलं जातं चालून चालून बिघडल्यावर मात्र चालण्यासारखं काहीच नसतं बिघडवायला काय हो अगदी काहीही चालतं बिघडून पुन्हा चालनं मात्र चालण्यासारखं नसतं

दिवेआगार / मोडलेली कंबर / दोन निर्मनुष्य समुद्रकिनारे

लेखक बाबा योगिराज यांनी शनिवार, 21/05/2016 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २२ जानेवारी २०१६ रात्रीचे सव्वा दहा वाजलेत, केदार, श्रीहास, अमोल आणि विशाल पुण्याला पोहचत आहेत. मी सुद्धा दुकान वाढवून घरी पोहोचलोय. इतक्यात केदारचा फोन आलेला, केडी :- निघालास का रे? मी :- आत्ताच घरी पोहोचलोय, जेवनार आणि निघणार. आणि .......... धप्प. धडाम. केडी :- का रे कसला आवाज येतोय? मी :- काही नाही. बारा वाजता निघेन, सकाळी ६ वाजेच्या आसपास शिवाजीनगरला घ्यायला या. फोन बंद. च्यामारी असा कसा पडलो? दिवे लावून बघितल, पायात मोज़े आणि गुळगुळीत फरशीवर पडलेल्या कपड्या वरुण पाय सटकला आणि जोरात पडलो. ठीक आहे, पडलो आणि उठलो. काय झाल?

त्या मंतरलेल्या रात्री होत्या...

लेखक महामाया यांनी शनिवार, 21/05/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या मंतरलेल्या रात्री होत्या... काय सांगता राव...! हो, त्या मंतरलेल्या रात्री होत्या. कारण रात्रभर समोर हालीवुडचा भूतकाळ आपल्या शाही लवाजम्यासह घरातील ड्राइंगरूम मधे थाटामाटात अवतरित होत असे.