Skip to main content

मार्कर

लेखक ए ए वाघमारे यांनी शनिवार, 04/06/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
(कविता करण्याची सुरसुरी प्रत्येकालाच कधी ना कधी कधी येते.मग आम्हीही त्याला अपवाद कसे? अशीच एक तुरळक कविता)

मार्कर

एकूण एक केस उपटलाय बघ छातीवरचा घे, हे नाव कोर आता पण जरा थांब वापरू नकोस तो परमनंट मार्कर नाहीतर, याच नावाची दुसरी शोधावी लागेल मला हिनेही नाही म्हटलं तर (पूर्वप्रकाशन:http://aawaghmare.blogspot.com)

घर क्रमांक – १३/८ भाग - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 04/06/2016 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
घर क्रमांक – १३/८ भाग - १ घर क्रमांक – १३/८ भाग - २ घर क्रमांक – १३/८ भाग - ३ .......काही क्षण मी तसाच विचार करत उभा राहिलो. ‘जावे का त्याच्या मागे ?’ पण शेवटी बुद्धीनिष्ठतेची घमेंड आणि त्या घरात जे काही चालले होते त्याची भेद करण्याच्या इच्छेने मला थांबवले. मी परत माझ्या खोलीत शिरलो व दरवाजा बंद केला. प्रणवने त्याच्या खोलीत काय पाहिले असावे बरे? ते पाहण्यासाठी मी त्याच्या खोलीत गेलो. मला तरी त्याला घाबरविण्यासारखे त्या खोलीत काही दिसले नाही.

गारवा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 04/06/2016 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
झोंबू लागे सुखद गारवा, मंदसा पाऊस झाला जाऊ या लोणावळ्याला, सखीस इशारा केला . मारली दांडी ऑफिसला, अन तिने हि कॉलेजला ठरे भेटायचे ,सकाळीच, जिमखान्याच्या स्टॉपला . लो वेस्ट जीन वर, स्लीव्हलेस टॉप शोभत होता तिच्या मधाळ स्मिताने ,मूड रोम्यान्टीक होता . नेली फटफटी पंपावर, म्हटले कर टाकी फुल्ल सुटे गाडी भन्नाट,बुंगाट .असे वातावरण कूल . चाले रस्ता ,धावे रस्ता, गावे मागे पडू लागली टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली. . लय भारी, क्षण भारी, रक्त तारुण्याचे सळसळे. पुणेमुंबई रस्ता आहे , थांबव हे यौवनाचे चाळे . घालून हातात हात ,मस्त हिंडलो लोणावळ्याला केले, न सांगण्याजोगे, माहीत आमच्याच मनाला . परतिचा

..तुझे टाळतो मी अताशा शहर..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 04/06/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
++तुझे टाळतो मी अताशा शहर++ --------------------------------------------------- सुशोभीत केली जुनीशी कबर.! स्वतः मीच केली स्वतःची कदर. जसा बोललो आरश्याशी जुन्या तशी घेतली मी स्वतःची खबर! किती जीव घेतील शस्त्रे तुझी कधी ओढणी वा कधी तो पदर म्हणे फार होती पवित्र अधी तिची मग बनवलीच नंतर गटर ठरवताच पार्टी मनाने कधी तिथे सर्व दु:खे सुखेही हजर तसा तोच रस्ता जवळचा तरिहि तुझे टाळतो मी अताशा शहर दवा बनुनी येताच मृत्यु असा उतरते तिथे जीवनाचे जहर कळाली तुझी मज खुशाली जशी किती छान आला मनाला बहर तुझे रुप आहे तसे देखणे. तुझे हास्य त्याहुनि तौबा कहर + कानडाऊ योगेशु

अझहर...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शनिवार, 04/06/2016 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
कथाकथनाचं सगळ्यात प्रभवी माध्यम कोणतं असेल तर नक्किच चित्रपट हेच आहे यात दुमत नाही. मात्र चित्रपटातुन कथाकथन करताना बर्‍याच गोष्टिंच्या अनुशंगान, त्यांच्या ढंगानं कथेत आणि कथनाच्या पद्धतीत बदल करायचे असतात आणि ते आवश्यकही असतच.

नेते

लेखक आनंद कांबीकर यांनी शनिवार, 04/06/2016 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक तर तो कधेमधेच कॉलेजला येतो आणि दुसरं म्हणजे वर्गात आल्यावर तो एखाद्या राजकीय पक्ष्याच्या कार्यालयात आल्यासारखा वागतो. म्हणजे त्याची एंट्रीच कशी जबरदस्त असते पहा; वर्ग चालु होऊन चांगला अर्धा तास झालेला असणार, एखादा पॉइंट घेऊन शिक्षक रंगात आलेले असणार, आणि तेवढ्यात हा उपटतो; "आत येऊ, सर" खरं तर त्याचे विचारणे कधी प्रश्नार्थक नसतेच कारण हे वाक्य संपेपर्यंत त्याचा संबंध देह वर्गात घुसलेला असतो. आणि शिक्षकांना "या! या! या!" म्हनुस्तव्हर याने पहिल्या बेंचवरच्या पोराच्या हातात हात देऊन, कोपऱ्यात बसलेल्या पोराला डावा हात उंचावून 'सलाम' करत, पहिला बेंच मागे टाकलेला असतो.

उपनिषदे (४)

लेखक शरद यांनी शुक्रवार, 03/06/2016 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 03/06/2016 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच! अनेक वेळा खूप वैताग येई.

सापडला पठ्ठ्या एकदाचा!!

लेखक बाजीप्रभू यांनी शुक्रवार, 03/06/2016 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
Yamato सापडला पठ्ठ्या एकदाचा!! आई-बाप, अख्खा जपान आणि थायलंडमध्ये माझ्या सारख्याच्या जिवाला घोर लाऊन तब्बल ६ दिवसांनी एका मिल्ट्री कॅम्पच्या शेल्टरमधे सापडला. असल्या प्रकरणात माझे बाबा असते तर कानाखाली एक जाळ काढला असता आणि एका सेकंदात मॅटर क्लोज केला असता, पण इकडे जपानमधे आपल्या भारतातल्या सारखं मुलाच्या कानपटवायची सोय/मानसिकता नसल्यामुळे 'ताकायुकी तानुका' नावाच्या जापनीस बापाने मध्यम मार्ग स्वीकारला.