स्पॉटलाईट
चित्रपट पटकन समजण्यात मी थोडी मंदच आहे. पिक्चर बघितल्या बघितल्या सिनेमेटोग्राफी, बॅकग्राऊंड म्यूझिक इत्यादी गोष्टींबद्दल चर्चा करणार्यांबद्दल भयंकर आदर आहे मला. मला तर चित्रपटभर फक्त आणि फक्त कथा दिसत राहते. अतिशय चांगला चित्रपट असेल, तर एकसंध अशा कथेतून बाहेरच्या जगात आलं की एकदम हरवायला, बिचकायला होतं. काही दिवस ती कथा मनाच्या मागे रेंगाळत राहते, आणि मग एकदम कधीतरी अनपेक्षितपणे ती पूर्णपणे जाणवते.
स्पॉटलाईटबद्दल झालं असं, की ती खरीखुरी घडलेली गोष्ट आहे हे माहित होतं. इतकंच काय, त्या बॉस्टन ग्लोबच्या बातमीबद्दल पेपरात वाचलेलंही आठवत होतं.
मिसळपाव