Skip to main content

मिसळपाव... आपले राज्यखाद्य..!!

लेखक वझेबुवा यांनी शनिवार, 11/06/2016 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव वरील लिखाणाचा पहिलाच प्रयत्न... तेव्हा शीर्षकापसुनच सुरुवात करावी असे वाटले.. मिसळपाव... आपले राज्यखाद्य..!! मिसळपाव.. महाराष्ट्रात सर्वत्र मिळणारा पदार्थ.. मिळेल सगळीकडे..पण सर्वत्र त्याची विविध रूपे पहावयास मिळतात... फरक पडतो तो मुख्यतः ३ गोष्टीनी.. फरसाण , रस्सा आणि पाव... ज्या मिस्सळ प्रसिद्ध आहेत.. त्यांच्या कडील फरसाण त्यांच्या मिसळी मधेच छान लागेल. एके ठिकाणच फरसाण आणि दुसरी कडचा रस्सा असा प्रयत्न केला तर भट्टी काहीतरी चुकल्या चुकल्या सारखी वाटेल, जरी दोन्ही ठिकाण मिसळी साठी प्रसिद्ध असतील तरीही... रस्सा.. यातही विविध रूपे पाहायला मिळतात ती त्यामधील साहित्यांनी..

शृँगार १६

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 11/06/2016 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस वाईट गेला , रात्री झालेल्या खराब झोपेमुळे मूडही खराब होता . दुपारी मंजूला फोन केला पण फारसं काही बोलली नाही ती . नेहमी इतकी बोलते , काही नाही तरी राग राग करते तस आज काहीच नाही . एकदम चुकल्या-चुकल्यासारखं वाटल . अशी का वागली असेल ती ? या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हतं . दिवसभर याच विचारामुळे कामातही लक्ष लागलं नाही . याच विचारात घरी पोहोचलो . मंजूला एक-दोनदा फोन केला तर तिने काही उचलला नाही . त्यामुळे मला आता जास्तच काळजी वाटू लागली . याच विचारात होतो तेव्हढ्यात मागे कोणाचीतरी चाहूल जाणवली म्हणून मागे वळून पाहीलं तर राधिका उभी होती . " अग तू ? कशी आहेस ? " " तुम्ही ठीक आहात ना ?

कशी सांगावी मी वेदना प्रिये....

लेखक सुंड्या यांनी शनिवार, 11/06/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
गर्मीचे दिवस होते, फाल्गुन महिन्याच्या तेव्हढ्यातच बादशहा-सलीमाचा नव-विवाह झाला होता. नव्या नवरीसह आनंदाचे क्षण घालविण्यासाठी बादशाह राजकारभाराच्या जंजाळापासून दूर काश्मीरच्या दौलतखान्यास आले होते. रात्रीचा दुसरा प्रहर संपत आला होता, बाहेर रात्र चंद्रप्रकाशात भिजून निघाली होती. त्या चांदण्यांत दूरवरची हिमशिखरे काळोखात अधिकच शुभ्र होऊन सुंदर दिसून राहिली होती. आरामबाग महालाच्या खालच्या बाजूस असलेली पहाडी नदी वळण घेत वाहत होती. मोतीमहालाच्या एका दालनात शमादान जळत होते आणि त्याच्या एका उघड्या गवाक्षाजवळ बसलेली सलीमा त्या चांदण्यारातीच सौंदर्य निरखून राहिली होती.

घर क्रमांक – १३/८ भाग - ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/06/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
घर क्रमांक – १३/८ भाग - १ घर क्रमांक – १३/८ भाग - २ घर क्रमांक - १३/८ भाग - ३ घर क्रमांक – १३/८ भाग - ४ ..... त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की मी भेटल्यानंतर ते एकदा त्या घराला भेट देऊन आले होते व तेथे त्यांना ती दोन पत्रे सापडली. त्यांनी ती वाचली देखील. ती वाचल्यानंतर त्यांनी त्या बाईबद्दल थोडीफार सावध चौकशीही केली.

काजवे दिसले...

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 11/06/2016 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी डोळे खाजवले, आणि काजवे दिसले! काजवे शेवटी कधी बघितलेले आठवतय का!? एका मागोमाग एक, डाटा फोल्डरच्या बाहेर... ओव्हरफ्लो... अंगावर पडलेला सुरवंट! रस्त्यावरचं सुखलेलं शेण, धो धो पावसानंतर च्या लक्ख सूर्य प्रकाशात... सूरुच्या बनातला कुज्लेला पानांचा सुगंध... वाडीतल्या चिखलात पडलेले जाम, फुटलेल्या कौलातुन आलेले सूर्यकिरण, चालता चालता डोळ्याच्या कोपर्यातुन दिसणारा... कवळ्यानी अर्धवट टोचून खाल्लेला आंबा... गंजलेल्या खिडकीतल्या बार मधली जळमटं, सारवलेलं अंगण त्यात दीवाळीतल्या नागिणिचा काळा ठिपका...

अप्सरा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 11/06/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
तलम साडीतुनी डोकावे, तुझा खांदा गोरापान पडता नजर त्यावरी होइ ,मन खट्याळ व बेभान कापलेले रेशमी केस रुळति, तुझ्या गो~या पाठिवर अवखळ रेशमी बटा येती, तव डोळ्यावर वारंवार हिरेजडित कर्ण भूषणे डुलती.वा~यासंगे आनंदून ओशाळला गुलाव.. तव गौर गुलाबी तनू पाहून मोहक गुलाब लाली, गालावरची लाजविते लज्जेला रती रूप असे देखणे ,का तू लाजवितेस अप्सरेला लवता नेत्र पापणी,तेजस्वी नेत्र प्रभा अशी फाके विलगता अधरपाकळ्या. शुभ्र दंतपंक्तीची रांग झळके नाजुक सोनसाखळी रुळते ,तव वक्षस्थळांच्या घळी भाग्यवान धनी,नावाने ज्याच्या कुंकू लावशील भाळी

.मला मात्र पत्नी गोरी हवी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 11/06/2016 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
..मला मात्र पत्नी गोरी हवी.. ------------------------------------- तशी शक्यतोही कोरी हवी. मला मात्र पत्नी गोरी हवी जरा घेऊ वीम्याचा फायदा. घरी एक साधी चोरी हवी. ( मला चोर अट्टल मानेन मी. तिच्या स्पंदनांची चोरी हवी..) असे एक संधी निसटायची. जवळ फक्त बळकट दोरी हवी. तुला भोगतो मी की तू मला? कशाला हि मग शिरजोरी हवी? हुश्श..आत घुसलो मी शेवटी नको आणखी घुसखोरी हवी किती प्रेम त्याचे काट्यांवरी सरण म्हणुन बाभळिबोरी हवी. --------------------------- + कानडाऊ योगेशु

हतबुद्ध

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 11/06/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसात असे वीर भेटले कि ज्याचे नाव ते. परवा एक गरोदर रुग्ण स्त्री रक्तस्त्राव होत होता म्हणून सोनोग्राफी साठी आली होती. ती अतिशय भयभीत होती आणि तिची सासू आणि नवरा तिला धीर देत होते. तिच्या लग्नाला सात वर्षे झाली होती आणि बर्याच उपचारानंतर ती पहिल्यांदाच गरोदर होती. माझी स्वागत सहायिका तिला आत घेत असताना तिचा नवरा मला "टेचात" म्हणाला डॉक्टर काहीतरी "रिझनेबल" रेट लावा. हे ऐकून माझं डोकं सणकलं. मी त्याला रठ्ठ शब्दात विचारलं म्हणजे माझे रेट "अन रिझनेबल आहेत" असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पाहिजे तेथे तुम्ही जाऊ शकता.

वाट पहात आहे.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 11/06/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पक्ष्याची वाट पहात आहे..... बसेन ते झाड माझे, शिटेन ती फांदी माझी, असले त्याचे आक्रमण नाही! घरटोघरटी माझी पिले माझ्याच पिढ्या, माझेच वंश असली माणुसकी त्याची नाही! मैत्री कधी कुणाशी केली नाही, पण बुडत्या मुंगीसाठी पान टाकायचे विसरला नाही! चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि तोऱ्याने मान फिरवणे नाही! पंखांचे मिटणे केवळ सुंदर जणू मौनाचे शिल्प पुरातन! पाय कधी दिसू नयेत इतके त्याचे असणे प्रगाढ, युगायुगांची पौर्णिमा उजळावी इतके त्याचे पंख सतेज! स्थलांतरावर जगत रहावे इतकी त्याची तकतक नाही, घिरट्या घ्याव्यात एकाच किनाऱ्यावर इतके उड्डाण तोकडे नाही! किनाऱ्या किनाऱ्या

चिअर्स सुंदरीची व्यथा कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 11/06/2016 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
(या लेखाचा उद्देश्य कुणाची भावना दुखविण्याचा नाही. आधीच क्षमा मागतो). अत्यंत तोडके कपडे घातलेल्या, ३६-२४-३६ कमनीय देहयष्टीच्या या चिअर्स सुंदरी त्यांच्या टीमच्या फलंदाजाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारा सोबत मंचकावर येऊन आपल्या देहाचे प्रदर्शन करत नृत्याचे हावभाव करतात. दर्शक त्यांचे नर्तन पाहून शिट्या वाजवितात, टाळ्या पिटतात. जो पर्यंत टीम जिंकत राहते, चिअर्स सुंदरी हि टीम सोबत विमानात प्रवास करतात, उंची हॉटेलात राहतात, बोनस, उपहार आणि अन्य अनेक पुरस्कारांचा वर्षाव या सुंदरींवर होत असतो. पण एकदा टीम हरली कि चिअर्स सुंदरीं हि बेरोजगार होतात.