Skip to main content

मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही,

लेखक जगप्रवासी यांनी मंगळवार, 14/06/2016 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल जुनी अडगळ साफ करताना कॉलेज मध्ये असताना ट ला ट जोडून लिहिलेली कविता सापडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि रात्री ४ वाजेपर्यंत बायकोशी गप्पा मारत बसलो. सहज तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून इथे टंकली. पहिली कविता मी लिहिलेली, माझ्या बायकोला (तेव्हा गर्लफ्रेंड होती) एका साध्या कागदावर लिहून गुलाबा सोबत दिलेली.
काव्यरस

सफर ग्रीसची: भाग २ - प्राचीन कोरिंथ

लेखक निशाचर यांनी मंगळवार, 14/06/2016 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन केप सूनिअनचा सूर्यास्त मनात साठवून पहिल्या दिवशी मुक्कामासाठी कोरिंथला आलो. हे खरं तर नवं कोरिंथ. साधारण साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती असलेलं प्राचीन कोरिंथ (ग्रीकमध्ये Archaia Korinthos) १८५८ साली भूकंपामुळे उध्वस्त झाल्यावर जुन्या शहरापासून दूर नवं कोरिंथ वसविण्यात आलं.

सार्थक जन्म-समर्पण अर्थात नर्मदाख्यान लोककथा.

लेखक खुशि यांनी मंगळवार, 14/06/2016 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
असूर संहारा नंतर थकून बैसले त्रिपुरारी। निढळावरचा घर्मबिंदू एक टपकला भूमिवरी॥ त्या बिंदूतुन प्रगटली एक कन्या सुंदरी। कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥ मी तर असे आपुलीच तनुजा बोले नमस्कारुनी। घर्मबिंदूमधुन आपुल्या जन्म माझा पावनी॥ दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती उरी। तुझ्या जन्माने सुरसे आज तीही झाली पुरी॥ आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी। येई गे मुली बैस अंकी हसून बोले शर्वरी॥ दोन बंधू एक भगिनी मोदे खेळती अंगणी। सुखी गृहस्थी पाहून डोलती उमा आणि मदनारी॥ स्कंद गजानन लपून बैसती शोधतसे मंदाकिनी। कोठे लपले बंधू दोघे खूणे दाखवि
काव्यरस

चॉकलेट

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 13/06/2016 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
पक्याला वाईट सवय. स्टेशनवर घेऊन जायचा मला. आगगाड्यांचा खडबडाट नुसता. गर्दी म्हणजे नुसती चेंगराचेंगरी. थांबलेल्या मालगाड्या बघण्यात काय हशील? स्लीपर कोचात जावून झोपणं, असले उद्योग त्याचे. एकदा एसी डब्यातून हाकललं आम्हाला, साल्या झाडूवाल्याने, छ्या. चकमक चकमक रात्र होती. अशीच खडबडत एक रेल्वे आली. थांबली. आणि निघून गेली. जगाचं ओझं पाठीवर वाहीलेला माणूस दिसला. अगदीच थकलेला. माझ्या शेजारी येऊन बसला. म्हणजे बाकड्यावर. मी सिगारेट काढली. अन उगाचच्या उगाच त्याला माचीस मागितलं. हे पक्याचे आवडते उद्योग. पण आज तो कुठे उलथलाय? तो टकलू माणूस माझ्याकडे भांबावून बघतच राहिला. साल्या माचीस मागितलं रे.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -१०

लेखक मेघना मन्दार यांनी सोमवार, 13/06/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग दहावा - आज आम्ही Tower of London आणि Tower Bridge बघायला जाणार होतो. या दोन्ही गोष्टी माझ्या बाहेरून पाहून झाल्या होत्या आता आतून पहायच्या होत्या. दोन्ही गोष्टी पहायला तिकीट आहे. याची सविस्तर माहिती देण्याआधी एक गोष्ट मी सांगू इच्छिते. ही सगळी आकर्षणं बघायला त्यांनी साधारण १० पौंड ते ३५ पौंड पर्यंत तिकीट दर ठेवलेले आहेत. दोघांचे मिळून प्रत्येक वेळी डबल खर्च होत होता. माझ्या नवऱ्याच्या एका मित्राने आम्हाला सांगितलं की लंडन मधील कोणत्याही National रेल चे तिकीट काढ आणि त्या आकर्षणाच्या तिकीट खिडकी वर ते रेल्वे तिकीट दाखव तर तुला एकावर एक तिकीट मोफत मिळेल.

'कोसला'सोबत एक दिवस

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 13/06/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"कोसला"विषयी खूप काही ऐकून होतो. विकत घ्यायचे मनात होते. पण शनिवारी (दि. ११-जून-२०१६) दुपारी माझ्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलो. तिथे सोफ्यावर कोरेकरकरीत "कोसला" दिसले. दादाने नुकतेच मागवले होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत काही कामांमुळे वेळ मिळाला नाही. संध्याकाळी "कोसला" हातात घेतलं. रात्रीचं जेवण घेतल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि "कोसला"वर झडप घातली. त्याआधी दादाला 'कसे आहे' म्हणून विचारले. त्याने सुरुवातीची काही पाने वाचली होती आणि नंतर त्याला वेळ मिळाला नाही. तो म्हणाला "तू वाच आणि ठरव. वाटल्यास घरी घेऊन जा.

मला त्या गावी जायचेय...

लेखक हृषिकेश पांडकर यांनी सोमवार, 13/06/2016 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
शहराच्या मध्यात साठ कुटुंबांची एक चाळ असावी... स्क्वेअर फुटाचा हिशोब नको, फक्त पाठ टेकवायला एक खोली असावी.. श्रीमंती घरात नसली तरी बेहत्तर, संपूर्ण चाळ मात्र गडगंज असावी.. महिना अखेरच्या पगाराची आस नसावी.. meeting, appraisal, onsiteचा गंध नसावा.. मला त्या गावी जायचेय... उजव्या भिंतीपलीकडल्या खोलीत पु.ल.

पेडगावची भग्न मंदिरे: भाग १

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 12/06/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिलअखेरचे दिवस. उन अगदी रणरणतंय. अशाच एका पेटत्या दुपारी मी पेडगावला पोहोचतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी औंरगजेबाचा सेनापती बहादूरखानाला हूल देऊन वेड्यात काढल्यापासून पेडगाव जास्तच प्रसिद्धीला आलंय. ह्या पेडगावनं थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतर केवळ नऊ वर्षातच एक दुर्दैवी घटना पाहिलीय. ह्याच बहाद्रूरखानाच्या किल्ल्यात, बहादूरगडात संभाजी महाराजांना विदूषकासारखी टोपी घालून तसेच त्यांचे दोन्ही हात लाकडी फळ्यांना बांधून त्यांची धिंड काढण्यात आली. त्यानंतर येथेच तापती सळई खुपसून डोळे काढण्यात आले तसेच तरवारीने जीभ छाटण्यात आली. काहीच दिवसांनी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्त्या करण्यात आली.