Skip to main content

एक पावसातली भेट ... !

लेखक एकप्रवासी यांनी बुधवार, 29/06/2016 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या माझ्या ठरलेल्या भेटीला आधी पावसाने भेट दिली भिजलो आधीच चिंब मी समोर तुला भिजताना पाहिली पाहत होतो पळत येत होती तू तोल सावरत वर पाहताना मला क्षणभर वाटलं पाहता आलं असतं तर SLOW MOTION मध्ये येताना तुला पावसात भिजली जमीन गंध मातीचा आला सजली फुले सभोवती जशी तुझ्या स्वागताला वेले लपेटावी कोण्या निपर्ण झाडाला अन रंगत यावी त्याच्या जगण्याला कृष्ण धवल जगण्यात माझ्या उमटवलस तू इंद्रधानुला हातात माझ्या हात तुझा नयन नयनाशी भिडले होते मिठीत माझ्या तुला घेताना वाटे हात तोकडे होते........

मसाले पोहे

लेखक उल्का यांनी बुधवार, 29/06/2016 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वाना कांदा बटाटा पोहे परिचित असतीलच. त्याचंच हे भावंडं आहे. माझी आई बेळगावची. आजोळी नाश्त्याच्या पदार्थांची खूप विविधता होती. तर हा खास बेळगावी पदार्थ म्हणायला हरकत नाही. माझ्या सासरी हे पोहे माहीत नव्हते.

ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. म. म. प्रा. ब्रह्मानंद देशपांडे स्मृती-व्याख्यानमाला

लेखक Parag Purandare यांनी बुधवार, 29/06/2016 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंंडळात ३री ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. म. म. प्रा. ब्रह्मानंद देशपांडे स्मृती-व्याख्यानमाला शनिवार,दि. ६ व रवीवार,दिनांक ७ अॉगस्ट २०१६ या दिवसांत आयोजित केली आहे. या वर्षी धारवाड येथील प्रा. डॉ. श्रीनिवास पडिगर, प्राचीन इतिहास, शिलालेख, मंदिरे व मूर्ती या विषयांतले तज्ञ, माजी विभाग प्रमुख, कर्नाटक विद्यापीठ, हे मंडळात दोन व्याख्याने देणार आहेत. दोन्ही व्याखांनांना ज्येष्ठ इतिहास संशोधक, मंदिर व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर अध्यक्ष स्थानी असणार आहेत. ही व्याख्याने इंग्रजीमधुुन होणार आहेत.

एयर फ्रायर पाककृती

लेखक केडी यांनी बुधवार, 29/06/2016 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या लेखात एयर फ्रायर पाककृती आणि गेल्या दोन वर्षांच्या माझ्या अनुभवांन बद्दल लिहिणार आहे. पुढील लेखांन मध्ये एयर फ्रायर पाककृती टाकण्याचा मानस आहे. वाढते वजन, आणि चमचमीत खाण्याची जिभेची ओढ, ह्याचे गणित केव्हाच चुकलेले होते. टीव्ही वर असंख्य वजन कमी करायचे उपाय, साधने हे घेऊन त्या भंगारात देऊन झाले होते. त्यामुळे जेव्हा एयर फ्रायर बद्दल च्या जाहिराती बघितल्या तेव्हा मी फारसा उत्सुक नव्हतो. पण शेवटी, एकदा घ्यावा बघून, म्हणून मग एकदाचा फिलिप्स कंपनी चा एयर फ्रायर घरी आणला, आणि माझ्या प्रयोगांना सुरुवात केली. जे काही धडे मिळाले, तेच इथे मांडायचा एक प्रयत्न.

पडवळाची सुकी भाजी (भाजणी पेरून)

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 29/06/2016 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पडवळ अर्धा कि., थालिपीठाची भाजणी किंवा चण्याचे पीठ वाटीभर, दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट, दोन टेबलस्पून, ओले खोबरे, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा साखर, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला एक चमचा, तेल पाव वाटी, फोडणीचे साहित्य, मीठ चवीनुसार. कृती: पडवळ धुवावे, बिया काढून पातळ काचय्रा कराव्या. कढईत तेल घेऊन नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. पडवळ फोडणीत घालून परतावे. झा़कण ठेवून दहा मिनिटे मंद गॅसवर वाफ काढावी. तोपर्यंत एका डीशमध्ये भाजणी, दाण्याचे कूट, ओले खोबरे, आमचूर, गोडा मसाला, लाल तिखट, पीठापुरते मीठ घालून सर्व नीट एकत्र करावे.

बँकॉक: धावती भेट : ४ : सुवर्णमयी वट

लेखक आतिवास यांनी बुधवार, 29/06/2016 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
भाग , , साधारण अर्ध्या तासाचा प्रवास झाल्यावर मी ‘महाराज’ धक्क्यावर उतरले. इकडेतिकडे पाहतापाहता अचानक मुख्य रस्त्यावर आले. इथं प्रश्न आला – डावीकडे वळावं का उजवीकडे? एका टूरिस्ट वाटणा-या गटाच्या मागे चालायला लागले.

वणवा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 29/06/2016 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचा संसार फुलवु नये कुणी एखाद्याच आयुष्य माती मोल करुन . . नर्सरीत सुरक्षित जीवन जगण्या-या गुलाबाला काय तमा? जंगलातल्या वणव्यात भाजणा-या रान फुलांची

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -16 अंतिम

लेखक मेघना मन्दार यांनी बुधवार, 29/06/2016 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - सोळावा (अंतिम) धन्यवाद मिपाकरांनो !! मला तुमचे सर्वांचे आभार मानायचे आहेत. ते अशासाठी की वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही लेखमाला वाचलीत आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिलात आणि माझा लिहिण्याचा उत्साह वाढवलात त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. मी हाडाची लेखिका नाही त्यामुळे माझं लिखाण थोडं घरगुती स्वरूपाचं वाटलं असेलही पण माझ्या मनात जे आल ते मे लिहिलं. माझं लिहिण्यात काही चुकलं असेल तर माफ करा. आणि हो मला सांगा की माझ्या लिखाणात मी काय दुरुस्ती करू शकते. व्यनि केलात तरी चालेल. कोणाला लंडन मध्ये फिरण्याबद्दल काही माहिती हवी असेल तर जरूर व्यनि करा.

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक

लेखक मोदक यांनी मंगळवार, 28/06/2016 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - तयारी सगळी तयारी झाल्यानंतरकी काही किरकोळ कामे राहिलीच होती म्हणून पहिल्या दिवशी फक्त पुणे ते ठाणे असा पल्ला मारायचे ठरले. दुपारी दोन वाजता सर्वजण रोहितच्या घरी जमलो.. पुन्हा बॅगा नीट बांधल्या.