Skip to main content

लंडनवारीची तयारी

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 11/07/2016 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
जै लंडनातले मिपाकर :) आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे. १) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :) २) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल? ३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :) ४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय?

एक संघ मैदानातला - भाग १७

लेखक शि बि आय यांनी सोमवार, 11/07/2016 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही रूमवर पोचलो तेव्हा दोन हरलेल्या संघानी बोजा-बिस्तर आवरला होता. त्यांना हैदराबादची कनेक्टेड टूर असल्यामुळे ते उद्या पहाटे निघणार होते. एकूण काय तर शाळेतली कावकाव जरा कमी होणार होती. रोज रुमवर आल्यावर झालेल्या जखमा साफ करणे हा एक मोठा प्रोग्राम असायचा. हात पाय स्वच्छ केल्यावर प्रत्येक जण आपापले मेडिकल किट समोर ठेऊन जखमांची रंग-रंगोटी करायचा. तळपायाची निघालेली सालटी, फुटलेले गुढघे, कोपरं, खरचटलेले हात-पाय आणि लागलेलले मुके मार ह्यावर प्रयोग करताना इतर मुलींच्या तोंडाची चक्की अखंड चालू होती. मी आणि रूपा मात्र उद्या काय करावं आणि कस करावं हा विचार करत होतो.

ती - ५

लेखक खटपट्या यांनी सोमवार, 11/07/2016 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती" - २ "ती" - ३ "ती - ४" "ती" - ५ रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा गाडी गावात पोचली होती आणि लोक खाली उतरुन आपापले सामान खाली उतरवण्याच्या मार्गाला लागले होते. नेहा दीसत नव्हती. अतुल अजून झोपलाच होता. झोपून माझा चेहरा भुतासारखा झाला होता.

कोडमंत्र

लेखक तिमा यांनी सोमवार, 11/07/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
कालच 'कोडमंत्र' हे मराठी नाटक पाहिले. 'ए फ्यु गुड मेन' या अमेरिकन नाटकावर ते आधारित आहे, हे सुरवातीलाच सांगितले. हेच नाटक गुजराती रंगमंचावरही चालू आहे. लष्करी शिस्त ही कधीकधी कशी अतिरेकी होऊ शकते , हे या नाटकांत फार चांगल्या तर्‍हेने दाखवण्यांत आले आहे. लष्करातील अनेक गोष्टी सामान्य लोकांपर्यंत येत नाहीत आणि लष्करी गुपिते शत्रुच्या हाती पडू नयेत, या दृष्टीने ते बर्‍याचवेळा आवश्यकही असते. पण कधीकधी अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यालाही होतो आणि मग ते निस्तरताना तो कोणाचा तरी बळी देतो. रवी शेलार हा मराठा रेजिमेंटचा एक जवान असतो.

अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 11/07/2016 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
http://vivekpatait.blogspot.in/2016/07/blog-post_7.html अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय? नकारात्मक लढा (अंधविश्वास विरुद्ध लढणार्या संस्थांच्या विषयी माझ्या मनात आदर आहे, पण त्यांच्या हातून काय चुका होतात त्या वर हा लेख आहे. हे माझे आकलन आहे) एकदा नागपूरला एका लग्नात गेलो असताना, एक पुणेरी ग्रहस्थ मला भेटले होते. सहज अंधविश्वासावर चर्चा सुरु झाली. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पुण्यात एका संस्थेने, अंधविश्वास विरोधात कार्य करणार्या एका संस्थेच्या महानुभावला बोलविले होते.

ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 11/07/2016 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे. Consumer जागतिकीकरणाच्या रेटयामुळे या देशातही अनेक बदल घडले, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. उत्तम शिक्षण मिळू लागले. तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या.

कमाई

लेखक सुंड्या यांनी सोमवार, 11/07/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे आपण एखाद्या व्यक्तीस त्याच्या कमाई बद्दल विचारपुस करतो तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती काय काम करते आणि त्या कामापायी त्याला दर महिन्याकाठी किती आर्थिक मोबदला मिळतो, असे असते. माझे मत सुद्धा काही वेगळे नाही पण माझ्या मित्रासोबत झालेल्या एका प्रसंगावरुन “कमाई” या शब्दाचा एक वेगळा अर्थ मला समजला, तोच प्रसंग इथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतोय- मी २०१३ मध्ये हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करत होतो, जून मधल्या एका रात्रीच्या शिफ्टमधे एका फ्लाईटमधून आलेल्या संयुक्त संस्थानातल्या प्रवाश्यांचे इमीग्रेशन-इन क्लिअर करणे चालू होते.

कवितेपलिकडील कविता

लेखक आनन्दा यांनी रविवार, 10/07/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता एका धाग्यावर हा उल्लेख वाचला
हा मोगाखान निदान जसा आहे तसा दाखवतो. त्याच्यापेक्षा मुंह में राम बगल में छुरी असले लोक जास्त डेंजरस. वरनं संभावितपणाचा आव आणतात आणि आपणच मिपाचे हितकर्ते म्हणून बोंबा मारतात. स्वतः डझनावारी आयडी काढणारे आणि त्याचे सार्वजनिक वाटप करून सहकारी तत्वावर वापरणारे लोक आहेत. ते सुद्धा डुप्लिकेट आयडींच्या नावाने शिमगा करतात. ही मोठी गंमत आहे.

सुलतान

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 10/07/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय??

भोज धरण आणि कोंडेश्वर

लेखक कंजूस यांनी रविवार, 10/07/2016 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
भोज धरण २ ) भोज धरण पावसाने चांगली सुरुवात केली, मागच्या वर्षाचा राग दूर केला आणि तीन आठवड्यात निसर्गाचं रूप बदलून टाकलं.पाऊस पाहण्यात सह्याद्री पर्वतरांगात जी गम्मत आहे ती दुसरीकडे कुठेही येत नसेल.सुरुवात केली यावेळच्या भटकंतीची राजमाची गडावर ती आनंदाची झाली.पण इकडे भटकायचं तर दोन दिवस हाताशी हवेतच.आता महिन्याभरात बदललेला निसर्ग पटकन पाहायचा तर पर्वत पायथाच योग्य.भातशेतीची तयारी चाललेली असते.यासाठी बदलापुरचे भोज -