Skip to main content

स्क्रिन शॉट भाग - ६

लेखक राजू यांनी सोमवार, 18/07/2016 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत..... विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे." हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना. विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे?

एक संघ मैदानातला - भाग १८

लेखक शि बि आय यांनी सोमवार, 18/07/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याने चालताना इतरांच्या चेहऱ्यावर ‘चला सेमी फायनलपर्यंत तर आलो’ असा भाव होता आणि आमच्या चेहऱ्यावर मात्र बळीला चालेल्या बोकडाचा ! चहा घ्यायला मेसमध्ये गेलो. चहा घेत असताना मुद्दामुन उसवलेल्या टी- शर्ट कडे रेश्माचं लक्ष गेलं. " अरे रेवा... तुझ किट उसवले आहे वाटतं... जा बाथरूममध्ये बदलून ये.. " आता हिला काय सांगू मला मुद्दाम ग्राउंडवर दुसऱ्या टी शर्टमध्ये बसायचं आहे म्हणून हा उद्योग मी करून ठेवला आहे ते.. " आं... अरे हो गं... जाऊ दे आत्ता नको ग्राउंडवर गेल्यावर बदलते आणि तिथेच बसून टाके घालून टाकते. " अगं.. कशाला अशी ग्राउंडवर येत आहेस बदल आधी.. " " नको ना.. जाऊ दे ना..

P2V2016 - स्पेशल २४ (प्रकाश चित्रांसकट )

लेखक विअर्ड विक्स यांनी सोमवार, 18/07/2016 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
भारतास मिळालेले स्वातंत्र्य हे अहिंसावादी लढ्याने मिळाले असे शालेय इतिहासात वाचल्याचे स्मरते, याउलट हिंदवी स्वराज्याच्या अग्नीकुंडात अनेकांनी प्राणांतिक आहुत्या दिल्या. त्यापैकीच दोन वीर बाजीप्रभू देशपांडे नि शिवा काशीद ! जिजाऊ प्रतिष्ठान गेली सतत ९ वर्षे "पन्हाळा - विशाळगड पदभ्रमंती - एक दिवसीय मोहीम (P2V2016 ) " त्या शूरवीरांच्या स्मृती प्रितर्थ्य आयोजित करते. या वर्षी ही मोहीम ९ जुलैला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 18/07/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

बलुचिस्तानची तोंडओळख

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 18/07/2016 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
बलुचिस्तानची तोंडओळख लेखक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com) हा लेख ई-सकाळच्या पैलतीर या सदरात १७ मे २०१६ रोजी प्रकाशित झालेला आहे. दुवा आहे http://www.esakal.com/Tiny.aspx?K=C6EBSx ‘बलुचिस्तानमध्ये भारताला इतके स्वारस्य का असावे‘ या प्रश्‍नाचे उत्तर ज्यांना पाकिस्तानचा इतिहास व भूगोल माहीत आहे, त्यांना सहज देता येईल. पण ज्यांना या इतिहासाची व भूगोलाची माहिती नाही त्यांना ‘असं काय वेगळं आहे बलुचिस्तानमध्ये?‘ असे वाटेल.

भर पावसातला चांभारगड, शेवते घाट आणी उपांड्या घाट

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी सोमवार, 18/07/2016 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
चांभारगड - शेवत्या घाट - उपांड्या घाट दोन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. शेवटचा ट्रेक करूनही ६ महीने लोटले होते. मनाला आणी शरीलाला जणू घाण्याच्या बैलाप्रमाणे एकाच चक्रात फिरायची सवय झाली होती. ह्या चक्रातून बाहेर पडून नेहेमी सह्याद्रीकडे जायची ती सवयही सुटल्या गत झाली होती. काहीतरी करणे गरजेचे होते. सप्टेंबर उजाडला आणी अश्यातच ट्रेकींग कायप्पा ग्रूपवर कुणी तरी विचारले की जायचे का कुठेतरी? पावसाळा पुर्ण जोमात होताच, मनाने उचल खाल्ली की बास झाले शहरी घाण्यातले रगडणे आता बुस्टर म्हणून कुठेतरी जायलाच हवे होते. पण कुठे?

आतां आमोद सुनांस जाले

लेखक Anand More यांनी सोमवार, 18/07/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.

<भग्न शरीरे>

लेखक अनुप ढेरे यांनी रविवार, 17/07/2016 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस श्रवंती शेखरला भेटायचा प्रयत्न करत होती. दर तासाला फोन करत होती पण साहेब काही फोन उचलत नव्हते. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या शेखरला असं अचानक काय झालं हे तिला काही केल्या कळत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेला. आता घरी जाऊन खात्री केल्याशिवाय चैन पडणार नाही असा विचार करून श्रवंती ऑफिसमधून बाहेर पडली. काकांनी दार उघडलं आणि त्यांना वाटलं कुणी सेल्समन आलिए की काय म्हणून त्यांनी "कसली औषधं विकायला आलायत?" असं विचारलं. "काका, एक मिनिट.

अर्नळगुंडू

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 17/07/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
"इधर ना रातको शैतान लोग आते है" रेलींगजवळ उभारलेली बाई म्हणाली. "अच्छा, तो?" फुटपाथवर खुर्च्यांची माळ पसरली होती. नावालाच छप्पर असलेल्या बसस्टॉपवर मी बसलो होतो. सोबतीला होता अंधार. अन अचानक पुढे आलेली ती बाई. "नै, तुम अच्छा आदमी लगता है, इधर क्या कर रा है?" डोक्यावर पडलीय काय ही? मग मीच तिला उलटं विचारलं, "तू क्या कर रही है इधर?" "अरे मेरा तो रोजका है, इधरीच होती है ना मै" "तो मै क्या करू? पागल तो नै हो?" "नै" हसली का ती? "तो फिर भाड मे जाव" मी सिगारेट काढली. ती बाई जरा वेळ उभारली आणि बाजूलाच बसली कोपऱ्यात खाली. नसती कटकट तिच्यायला. शहराच्या बदनाम गल्लीत हा बसस्टॉप पडतो, त्याला इलाज नाही.