Skip to main content

पाहुण तुमी कोण गावचं?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 20/07/2016 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? लाल गावचं कि हिरव्या गावचं पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं. निळ्या गावचं कि टोपी गावचं. पाहुणं म्हणे, ऐका राव मान मोठा मिळे ज्या गावात चरायला मिळते सारे रान तोची आहे आमुचा गाव. सरडा आमचा गुरु भाई त्याच्या सवे रंग बदलतो. शिकारीच्या गावी मुक्काम ठोकतो. या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? टीप: या कवितेचा राजनेत्यांशी काही एक संबंध नाही.
काव्यरस

भारतरत्न सचिन....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी बुधवार, 20/07/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच..

बऱ्याचदा वाटतं....

लेखक वटवट यांनी बुधवार, 20/07/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याचदा वाटतं.... वागावं अगदी बावळटासारखं.... शर्टाच्या वरच्या दोन गुंड्या लावूच नयेत... लागली असावी खूप भूक...

मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 20/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियरला रास्त भाव भेटला काय, न भेटला काय पिणार्‍यांच्या मनांत असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! पिणार्‍यांना नशा चढली काय, न चढली काय पिणार्‍यांना भरपुर रिचवायची सवयच हाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय या पिणार्‍यांना उपजत अक्कलच नाय बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियर विकून सत्तेत येता येते बियर पिणार्‍यांना उधार देणारा ख

बलात्कारी मी: गरज आत्ममंथनाची

लेखक मार्गी यांनी बुधवार, 20/07/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.

(मी बी संत्री खाईन म्हन्तो) : सावजी रस्सा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 20/07/2016 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. गंगाधरजी मुटे ह्यांचा 'मी बी मंत्री होईन म्हणतो' हा नागपुरी तडका लावून आम्ही केलेला सावजी रस्सा सादर आहे.

गणित प्रज्ञा आणि पेढे!

लेखक रुपी यांनी बुधवार, 20/07/2016 05:32 या दिवशी प्रकाशित केले.
"सारख्या तुझ्या मुलांच्या परीक्षा!" आजोबा आईकडे तक्रार करत होते. झालं असं होतं, की मेच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मामेबहिणीचं लग्न होतं. आईच्या लग्नानंतर तिच्या माहेरी पहिलंच लग्न. ती सगळ्या भावंडांत लहान त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी! त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या, साहजिकच तिने लग्नाच्या बरेच दिवस आधीपासून माहेरी यावे अशी आजी-आजोबांची इच्छा होती. पण माझ्या चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेचं कारण आलं. आईच्या माहेरी तेव्हा तरी असल्या(!) बाहेरच्या परीक्षेंचे कुणाला महत्त्व नव्हते - खरे तर फारसे अभ्यासाचेच महत्त्व नव्हते. आजोबांसाठी तर ते अगदीच फुटकळ कारण.

चॅाकलेट आणि काजू लाडू

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 19/07/2016 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:२०० ग्रॅम किसलेले चॅाकलेट,२०० ग्रॅम काजूची पावडर, ३ टेबलस्पुन साखर, १ टीस्पुन कोमट दुध, थोडस केशर, पाव कप तूप,५ हिरव्या वेलायचीची पावडर, ८-१० पिस्ताचे उभे काप कृती:एका पैन मध्ये ५० मिलीलिटर पाण्यात साखर विरघळवा, याचा एकतारी पाक तयार करा, केशर एक चमचा कोमट दुधात खलून घ्या. आता साखरेच्या पाकात काजूची पावडर घाला, गैसवर ठेवून हे मिश्रण एकजीव झालं की गैस बंद करा, यामध्ये दूधमिश्रित केशर घाला, या मिश्रणाच्या गुठळ्या होउ देऊ नका, हे मिश्रण पुन्हा गैसवर ठेवून यामध्ये तूप आणि वेलचीपूड घाला यातील तूप वितळलं की गैस बंद करा, हे मिश्रण थंड होउ द्या आता हाताला तूप लावून घ्या मिश्रणाचे एकसमान भाग कर

चॅाकलेट आणि काजू लाडू

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 19/07/2016 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:२०० ग्रॅम किसलेले चॅाकलेट,२०० ग्रॅम काजूची पावडर, ३ टेबलस्पुन साखर, १ टीस्पुन कोमट दुध, थोडस केशर, पाव कप तूप,५ हिरव्या वेलायचीची पावडर, ८-१० पिस्ताचे उभे काप कृती:एका पैन मध्ये ५० मिलीलिटर पाण्यात साखर विरघळवा, याचा एकतारी पाक तयार करा, केशर एक चमचा कोमट दुधात खलून घ्या. आता साखरेच्या पाकात काजूची पावडर घाला, गैसवर ठेवून हे मिश्रण एकजीव झालं की गैस बंद करा, यामध्ये दूधमिश्रित केशर घाला, या मिश्रणाच्या गुठळ्या होउ देऊ नका, हे मिश्रण पुन्हा गैसवर ठेवून यामध्ये तूप आणि वेलचीपूड घाला यातील तूप वितळलं की गैस बंद करा, हे मिश्रण थंड होउ द्या आता हाताला तूप लावून घ्या मिश्रणाचे एकसमान भाग कर