Skip to main content

'माज' आणि 'मान'!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 28/07/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
'माज' आणि 'मान'! गाडी सुटतासुटता धावत येऊन त्याने डबा पकडला आणि धापा टाकत एका रिकाम्या सीटवर बसून त्याने आसपास नजर फिरवली. बहुधा फर्स्टक्लासचा प्रवासी असावा. हातात आयफोन, मनगटावर चकचकीत ब्रेसलेट, गळ्यात जाडजूड 'चैन', बोटात अंगठ्या आणि चेहऱ्यावर चोपडलेला चकचकीतपणा! नजरेत तुच्छ तुटकपणा ओघानेच आला... गाडीनं वेग घेतला आणि त्यानं हातातली 'मिन्ट'ची घडी उलगडली. बॆग उघडून लहानसा टप्परवेअर बाहेर काढला, आणि मिन्ट वाचत डब्यातला एकएक तुकडा चघळू लागल्या. जगाला फाट्यावर मारतो, असे इतरांना वाटण्यासाठी जे जे करायचे असते, तसंच करू लागला.

मी आर्ची बोलत्येय.

लेखक आंबट चिंच यांनी गुरुवार, 28/07/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला. शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.

बापाचा गुण

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 28/07/2016 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली आम्हा बापलेकीचं बरंच गुळपीठ जमलयं, एक तर, आम्ही तिघेही आपापल्या दिनक्रमात अडकल्यामुळे, पुरवठा कमी झाला की मागणी वाढते, या नियमाने असेल कदाचित. मग काल एक नविन फर्मान निघालं, इथुनपुढे घरातील सगळे निर्णय मतदानाने घ्यायचे. विषय होता, पुढच्या दाराला अजुन एक लोखंडी दरवाजा बसवण्याचा. पहिले प्रदीर्घ चर्चा, दरवाजा बसवण्याची आवश्यकता, उपलब्ध पर्याय आणी उपयुक्तता यावर. आम्ही राहतो तिसर्या मजल्यावर, इमारत जुनी असल्यानं लिफ्ट नाहीय.

मला आवडलेला शायर- राहत इंदोरी

लेखक सुंड्या यांनी गुरुवार, 28/07/2016 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं- उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब, चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है, तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब मै कब डूबुंगा फिक्र किया करते है, कश्ती-वश्ती, दर्या-वर्या लंगर-वंगर सब... “वा वाह!!.....गजब” -मी “जियो क्या ब

आरोळ्या फेरीवाल्यांच्या

लेखक जागु यांनी बुधवार, 27/07/2016 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्‍या वस्तूंसाठी दारावर येणार्‍या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची.

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण

लेखक Anand More यांनी बुधवार, 27/07/2016 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे.

एक्सेल एक्सेल - भाग ११ - कस्टमाइझिंग चार्ट्स

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 27/07/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १० भाग ११ अकरावा

जागली स्पंदने नवी नवी

लेखक रातराणी यांनी बुधवार, 27/07/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं. बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले.
काव्यरस

बौद्धधर्मप्रसारक... भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 27/07/2016 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
फो बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ धर्मरक्षाबद्दल आपल्याला माहिती मिळते ती त्याच्या चरित्रावरुन. हे चरित्र हे सहाव्या शतकाच्या सुरवातीस लिहिले गेले व अजुनही सेन्गीयु येथे जपून ठेवले आहे. त्याचे नाव आहे ‘‘झु फाहू झुआन’’ म्हणजेच ‘‘धर्मरक्षाचे चरित्र’’.