Skip to main content

माझ्या मनाचे कपाट....

लेखक फुंटी यांनी शुक्रवार, 05/08/2016 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनाच्या कपाटात टांगवले आहेत अनेक ह्यांगर्स... भावना टांगवून ठेवल्यात मी त्यावर.. ते बघ गुलाबी रंगाच बायकोवरच प्रेम, हल्ली सणासुदीलाच काढतो मी बाहेर.. तो पहा माझा रागाचा ब्लेझर .. त्याच्या आतमध्ये लटकलेला अहंकाराचा शर्ट नि नेकटाय .. सहज कळू देत नाही मी कुणाला मी सुद्धा वापरतो ब्लेझर... समोरची माणस बघून ... तो द्वेषाचा घामट ,कुबट सदरा.. सभ्यपणाच सेंट मारून वापरावा लागतो . ते वेगवेगळ्या रंगाचे २ ह्यांगर्स दिसताहेत आहेत ना? . खरे तर त्यावर आहेत कामभावनेची अंतर्वस्त्रे ... सहज लक्षात नाही येत पण वापरतो मी रोजच ... कुणालाही नकळत..

खादाडरावांची झाली फजिती

लेखक विप्लव यांनी शुक्रवार, 05/08/2016 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता छबु भलताच ढबू बुद्धिचा जड पण करी बडबड एकदा झाली गम्मत बसली होती पंगत जेवायला होते लाडू छबु किती वाढू लाडू खाल्ले अठ्ठावीस जीव झाला कासाविस पोट आले फुगून मग गेला भिऊन पोट लागले दुखायला तसा लागला लोळायला रडला ओरडला तरी किती खादाडरावांची झाली फजिती -- संग्रहित
काव्यरस

शेंगोळ्याचे लाडू

लेखक विप्लव यांनी शुक्रवार, 05/08/2016 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी मिपावर नवखि आहे. कृपया काही चुक झाली तर सांभाळून घ्यावे. शेंगोळ्याचे लाडू हा माझा जिव की प्राण आहे. मी कोल्हापूरची आहे.हा प्रकार फक्त कोल्हापूर, सांगली जिल्हातील फक्त जैन लोकच बनवतात. मी हॉस्टेलला असताना माझी आई हे लाडू करुन द्याची. पोरी अक्षरशः तुटून पडायच्या डब्ब्यावर आणि फडशा पाडायच्या माझ्या हाती एकादा लाडू लागायचा. दिवाळीला फक्त हाच लाडु बनतो आमच्या घरी. आता बाप्पांचे आगमन होणार आहे. नवनविन खाद्य पदार्थ आणि प्रसादांची रेलचेल असेल. म्हणुन आपणही एक नविन पदार्थ सर्वाना सांगावा असे मला वाटले. मी अजून हे लाडू नाही बनवले माझी आई किंवा सासुबाई बनवतात.

पुन्हा पाऊस

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 05/08/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... चांगली उन्हाची सवय झाली होती ... तो डबडबणारा घाम ते काळवंडलेले शरीर तो कोरडेपणा ... ती रखरख यांना चांगली लय आली होती ... कुठून हे काळे ढग आले ... आता सगळ बेताल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ... सगळा चिखल होणार ... आता पुन्हा तो ओलावा पुन्हा तो हिरवेपणा पुन्हा त्या कोरड्या डोंगरावर उमटणार झर्यांच्या रेघा ... बुजणार पुन्हा ... पडलेल्या त्या सगळ्या भेगा ... पुन्हा नव्या आशेनी ... आता मन चल बिचल होणार ... आता पुन्हा पाऊस येणार अन ...
काव्यरस