Skip to main content

आमची बोळाची ( काळोखी ) खोली

लेखक मनीमोहोर यांनी सोमवार, 15/08/2016 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं कोकणातल घर आहे जुन्या पदध्तीचं..... कौलारु.... ओटी, माजघर, देवघर, सैपाकघर आणि परसदार अशी रचना असलेलं. घर खूप मोठ असलं तरी त्या वेळच्या पद्धती प्रमाणे या घराला खोल्या तशा जास्त नाहीत. मुख्य घराच्या लेवलला एकच आहे खोली. तीच ही बोळाची खोली. बाकीच्या सगळ्या खोल्या चार पाच पायर्‍या खालच्या लेवलला आहेत. या खोलीला माजघरातुन आत जायला दार आहे. एका बाजुला ओटीची भिंत आणि एका बाजुला माजघराची भित असल्याने हिला फक्त एकाच बाजूने दोन छोट्या छोट्या खिडक्या आहेत, ज्या उघडल्या तरी खोलीत फारसा प्रकाश येत नाही.माजघराच्या दारातुन प्रकाशाचा काय कवडसा येइल तेवढाच प्रकाश.

वाट वेगळी तिथेच नक्की झाली

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 15/08/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
जगात साऱ्या ओळख पक्की झाली या देशाची खूप तरक्की झाली हाती मोठे घबाड आल्यावरती नियत आपली चोरउचक्की झाली दोन दिशांनी आलो होतो आपण वाट वेगळी तिथेच नक्की झाली दाणादाणा जमवीत आली जनता: पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली पाउल माझे तेव्हा चुकले आहे नजर तुझी जेव्हाही शक्की झाली डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

‘मिसळपाव’चं रहस्य: भाग १: खबर

लेखक आतिवास यांनी सोमवार, 15/08/2016 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: संदीप डांगे यांचा ‘प्रस्ताव: मिसळपाव बॅज’ हा धागा आणि कैक ‘कट्टा’ धागे ***** “साहेब, भावड्या आलाय. बसवलंय मी त्याला. कधी आणू तुमच्याकडं ते सांगा.” “पाटील, विचारपूस केलीत का तुम्ही?” “होय साहेब, काहीतरी गडबड आहे असा मला सौशय होताच गेले काही महिने. तुम्ही पर्वानगी दिलीत तर लागतोच मागं. भावड्या सांगतोय ते माझा सौशय वाढवणारं आहे साहेब.” “हं, बोलवा त्याला.” ***** “रामराम, सायेब.” “रामराम. बस भाऊ. काय नवीन?” “काय न्हाई सायेब, परवा आपल्या त्या ह्या मॉलला गेल्तो.” “मॉलला?

बादलीयुद्ध ७

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 15/08/2016 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा ------------------------------------------------------------------------------- तुफान वारे वाहते आहे. अंधारातल्या वाड्यावस्त्या धुळीने भरुन गेलेल्या.

मिपा प्रतिज्ञा

लेखक लीना कनाटा यांनी रविवार, 14/08/2016 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा माझे संस्थळ आहे. सारे मिपा सदस्य माझे वाचन बंधू आणि भगिनी आहेत. माझ्या मिपावर माझे वाचनीय प्रेम आहे. माझ्या मिपा वरील विविध धाग्यांचा मला अभिमान आहे. असे धागे पाडण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी सगळ्या मिपा सदश्यांचे धागे वाचीन आणि प्रत्येकावर पिंक टाकेन. माझे मिपा आणि माझे मिपासदस्य यांच्याशी मैत्री राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद यातच माझे वाचनसौख्य सामावलेले आहे. जय मराठी. जय मिपा. तळटीप : या ठिकाणी माझ्या परम प्रिय देशाचा किंवा अन्य कोणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही.

द स्टार्क स्टोरी-१

लेखक क्षमस्व यांनी रविवार, 14/08/2016 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षात पहिलाच लेख सांभाळून घ्या द स्टार्क स्टोरी-१ "जग बदलणार.... आपणही बदलायला हवं.... तुम्ही लोक शांततेचा पुरस्कार करतात, पण शांतता नेमकी काय असते? जर तुमच्या शेजाऱ्याकडे व तुमच्याकडे प्रत्येकी वीस एकर जमीन आहे, तर तुम्ही ती वीस एकरपेक्षा जास्त होण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत....आणि जर तुम्ही एकमेकांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न कराल तर काय होईल? कशाला शांतता उरेल? पण जर माझ्याकडे हजारो एकर जमीन असली आणि समोरील व्यक्तीकडे एक एकर असली तर तो माझी जमीन हडपण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही....

बेशिस्त

लेखक शैलेन्द्र यांनी रविवार, 14/08/2016 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
पाहून वाट शेवटी पुढे निघून गेलो मी माझे आयुष्य थोडे जगून गेलो थांबण्याचा शब्द होता जरी दिलेला पावलांचे ऐकून बेवफा वागुन गेलो गुस्ताख आठवणींचे वादळ आंधळे आधार काडीचा घेऊन तगून गेलो शब्दांत माझी शिस्त मी सांभाळलेली पण आज बेशिस्त थोडी भोगून गेलो - शैलेंद्र
काव्यरस

१४ ऑगस्ट २०१६

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 14/08/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं.... सुचलं तेव्हडं लिहावं दिसलं त्तेव्हडं वाचावं रुचलं तेव्हडं ऐकावं आवडलं तेव्हडं बोलावं विचारलं तेव्हडं सांगावं दिलं तेव्हडं घ्यावं पचलं तेव्हडं खावं जमलं तेव्हडं चालावं जीवन तृप्त असावं आणि कुणी म्हटलं तसं "ह्या जन्मावरं ह्या जगण्यावरं शतदा प्रेम करावं" शुभेच्छा देण्यार्‍यांचे आणि न देण्यार्‍यांचेही आभार. श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

आयुष्य

लेखक अभिषेक पांचाळ यांनी रविवार, 14/08/2016 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात सुख दुःख , जणू किनाऱ्याची लाट गुलाबाच्या छोट्या छोट्या , झाडांची ती वाट कधी दुःखाची ती ओहोटी , कधी सुखाची भरती कधी वास त्या फुलाचा , कधी पाय काट्यावरती आता दुःख म्हणून रडायचं , कि सुखी होऊन हसायचं फुल ठेवून बाजूला , नुसतं काट्यातच पडायचं निर्णय आपलाच , कसं आयुष्याकडे बघायचं सारं आपल्या हाती , कसं आयुष्य जगायचं - अभिषेक पांचाळ

मी आयफोन-कर

लेखक विश्वेश यांनी रविवार, 14/08/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर ... आता तुम्हाला आयफोन-कर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक फोन च्या फिचर वरून मतभेद करायला शिका. म्हणजे आपल्या फोन मध्ये आहे का, आपल्या फोनमधील फिचरचा दर्जा काय, एकूण उपयोग काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.