Skip to main content

"आर्टिकल ३७० चा राजकीय थरार"

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 29/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक लोकांनी अलीकडे थिएटर कडे सिनेमा बघायला पाठ फिरवली आहे हे एव्हाना बॉलिवुडवाल्याना नक्की कळले असेल. पण तरीही सिनेमा बनविण्याचे काही धाडसी प्रयत्न होतात. काश्मीरला भारतापासून वेगळे पाडण्याचे सातत्याने प्रयत्न ज्या कलम ३७० मुळे होत होते, ते कलम रद्द करण्याचे अभुतपुर्व कार्य मोदी सरकारने केले. त्या रद्द करण्याच्या प्रक्रियेची माहिती देणारा - Article 370- हा सिनेमा आहे. इतका गुंतागुंतीचा आणि राजकीय वाटणारा पण सामाजिक सुद्धा असणारा हा विषय चित्रपट बनविण्यासाठी निवडला हे प्रचंड साहस आहे. ताबडतोब आव्हान असणार होते ते हा सिनेमा बनवायचा कसा या विषयीचे ; म्हणजे दिग्दर्शनाचे, कथा कथनाचे.

अपहरण - भाग ५

लेखक स्मिताके यांनी बुधवार, 28/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४ - https://misalpav.com/node/51970 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एकच गडबड उडाली. जहाजाच्या मूळच्या सुरेख पांढऱ्याशुभ्र रंगावर कळकट करडा रंग चढवण्यात आला. तोही कसा, कोणी नवशिक्या रंगाऱ्याने धब्बे घालून कसातरी फासल्यासारखा. किती गचाळ दिसू लागलं ते जहाज! त्यावर लटकवलेल्या छोट्या बोटी काळ्या-हिरव्या रंगवल्या गेल्या. त्यांचा अवतार एखाद्या कोळशाच्या खाणीतून आल्यासारखा झाला. सर्व उरलेले रंग एकत्र कालवून ते जहाजावरच्या लाँचला फासण्यात आले.. त्या रंगाचं वर्णन करणं केवळ अशक्य!पोकळ लाकडाचं एक खोटं धुरांडं बनवून ते जहाजावर बसवण्यात आलं.

डासबोध

लेखक रम्या यांनी मंगळवार, 27/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
गालावरी हसू, मुखावरी दाढी । राजकारणे गुढी, बांधू पाहे ।। दाढीचे वजन, दाढीचेच भजन । करू आम्ही नमन, दाढीचेच ।। दाढीचाच फोटो, दाढीचीच मूर्ती । सांगावी अपकीर्ती, नेहरूंची ।। पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त । करू मशागत, दाढीचीच ।। कपिला गाय, करोनिया माय । गळ्यातच पाय, आमच्याच ।। ईडीचाच टेकू, घेऊनिया फेकू । विरोधकांचे दमन, करू पाहे ।। जे का ईडीसी घाबरले, त्यांसी म्हणे जो आपुले । समीप येता म्हणावे, शुद्ध जाहले ।। चोरावे धनुष्य, लांबवावे घड्याळ । हाती द्यावे टाळ, जनतेच्या ।। प्राणप्रतिष्ठेचा कावा, विरोधकांचा चावा । दाढीतल्या उवा, ठेचू पाहे ।। मस्तवाल खोंड, पाळोनिया गुंड । निर्भयांचे तोंड, फोडू

कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 27/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता. . आम्ही पाणी गरम करून रूम मध्ये रेडी टू मेक चहा बनवला, विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. ऊरलेले पाच सहा खाकर्यांचे पॅकेट त्याने मला दिले. बॅग भरून खाली आलो. लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती तिने लॉकरमध्ये सामान ठेवले आम्ही निघालो, मिपाकर चित्रगुप्त काकांचा व्हिडिओ कॉल आला त्यांच्याशी बोललो.

मराठी : लेखन घडते कसे?

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन.

मनी वसे ते

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 26/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मनी वसे ते -------------------------------------------------------------------------------------------------------- २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होता. त्यादिवशी रात्री शाळेत थांबायचं ठरलं. सर असं म्हणल्यावर त्या कल्पनेने वरुणला धमाल वाटली. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन होता.त्याच्या तयारीसाठी मुलं काम करणार होती. मराठी भाषा गौरव दिन म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने तो दिवस साजरा करण्यात येतो. तर, विज्ञानदिन हा सर सि.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो.

अपहरण - भाग ४

लेखक स्मिताके यांनी सोमवार, 26/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ - https://misalpav.com/node/51961 कर्नल ऑडमिंटन. एक उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व. अगागागा काय त्यांची दाढी.. लांब, भरघोस.. असायचीच! रेझरचं पातं कधी पाहिलेलंच नव्हतं ना तिने! कर्नलचं वय असेल पंचेचाळीस. ते विधुर होते, आणि त्यांना पंधरा वर्षांचा एक मुलगा होता. आता कान इकडे करा. हे नुसते नामधारी कर्नल होते. मॅलार्ड बदकं मारताना घेतलेला बंदुकीच्या पावडरचा वास आणि चार्ल्सटन शहरात रस्त्यावरून शांतपणे मिरवणुकीने जाताना पाहिलेली सैनिकांची रेजिमेंट हेच काय ते त्यांचे युद्धविषयक अनुभव!

जरांगे निघाले.,,,,

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 26/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
वाढे माईक्स चा खणखणाट, पूढे कॅमेरांचा लखलखाट, गाड्यांच्या ताफ्याचा दणदणाट तोंडात शब्द कडक, जरांगे निघाले तडक... कडकलक्ष्मीचा जसा चमत्कार, शाब्दीक-चाबकांचा टणत्कार, मिडीयाला रेडी साक्षात्कार, आरक्षण-बुभूक्षूंचा नमस्कार ! मी तोडणार बामणी कावा, जातीयवादी झालास भावा, सिल्वर ओक चा का तू छावा, इलेक्शन अन तापला तवा ! तुला काय एम पी तिकीट हावा? थकले रे पोलीस, नको धरु ओलीस, विषय खूप खोलीस राजकारणी टोळीस जनतेस हा पोळीस निवडणूक होळीस. नको रे करु उपास, आपण करु तपास, नको बसू 'उग्र तपा' स, सांगू आपण 'शपा' स, आणा रे संत्रा रसा स.....

सांज

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 25/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते जरी रात्र असते तुझी दाट छाया छटांचा तुझ्या कारवा सांज असते दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन् पुन्हा जीवनी नाखवा सांज असते जुने तेच ते रंग लेवून परके समारंभ अवघा नवा सांज असते न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते - कुमार जावडेकर
काव्यरस

टुकार कविता: मामीचे गाणे

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मामीची अदा पाहा मामींचे गाणे ऐका. मर्दानी आवाज आहे छान छान छान. मामीचे गाणे ऐकून मामाची झोप उडाली. वेश बदलून मामा आता दिन - रात भटकतो. मामाच्या सभेत मामी गायली रिकाम्या खुर्च्यांनी सभा गाजवली. मामीच्या गाण्याला हजारों प्रतिसाद मामी मुळे होतो मामाचाच प्रचार.